समाजातल्या अनेक रूढी, परंपरा आणि प्रथा वर्षानुवर्षे चालत आल्यामुळे त्यांना एक प्रकारचं अमरत्व प्राप्त झालेलं असतं. काल बदलतो, वेळ बदलते पण माणसांच्या मनात त्यांचं स्थान अबाधित राहतं. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सगळ्या रूढी-परंपरांचं ओझं हस्तांतरित होत असतं. त्या रूढी-परंपरांचा मूळ उद्देश मधल्या मध्ये एक तर अर्धवट हस्तांतरित होतो किंवा पूर्णपणे विस्मृतीत जातो आणि एखाद्या पिढीत निपजलेला एखादा बंडखोर त्या सगळ्याला तर्कांच्या आधारावर आव्हान देतो. हा तर्कवादी दृष्टिकोन अनेकांच्या पचनी पडत नाही.
मी लहान होतो, तेव्हा माझ्या ज्या ज्या नातेवाईकांची लग्न मी पहिली आहेत, त्यांच्या अनेक सुंदर आठवणी आजही माझ्या मनाच्या एका खास कप्प्यात मी जपून ठेवलेल्या आहेत. मुळात तीस-पस्तीस वर्षांपूर्वी नात्यातल्या लोकांचं एकमेकांकडचं जाणं-येणं, सुट्टीच्या दिवसात महिना-महिनाभर मुक्कामाला येणं किंवा सणासुदीला आवर्जून घरी जाऊन एकत्र फराळ करणं हा सवयीचा भाग होता. घरात लग्नकार्य असेल तर नातेवाईक दोन-दोन आठवडे लग्नघरात तळ ठोकायचे आणि आपापला हातभार लावून ते कार्य निर्विघ्न पार पाडायला मदत करायचे.
जेरुसलेम हे शहर इतिहासात अनेक वेळा भरडलं गेलेलं एक अभागी शहर. ज्यू, ख्रिस्ती आणि मुस्लिम धर्माचा उगमस्थान असलेलं आणि त्यामुळेच सतत अशांत. या तीन धर्माच्या लोकांनी आपापसात इतक्या लढाया केल्या, कि इतिहासाची अनेक पानं त्यात रक्ताळली गेली.आज हजारो वर्षांनंतरही हा 'तिढा' कायम आहे आणि आजसुद्धा या तीन धर्माचे लोक या शहराच्या आणि आजूबाजूच्या प्रदेशावर निरंकुश सत्ता मिळवण्यासाठी आकाश पाताळ एक करत आहेत.
कधी कधी अनपेक्षितपणे जगावेगळी प्रेमकहाणी असलेल्या विलक्षण लोकांची गाठभेट घडते आणि प्रेम या संकल्पनेवरचा विश्वास अधिकाधिक दृढ होऊ लागतो. जात, धर्म, वर्ण, देश, भाषा, चालीरीती अश्या कोणत्याही कुंपणांना ना जुमानता प्रेम या एकाच गोष्टीवर ईश्वराइतकी निस्सीम भक्ती करणाऱ्या अशाच एका जोडप्याला भेटायचा योग आला आणि आजच्या जगात त्यांच्यासारख्या लोकांची कमी विधात्याने भरून काढली तर जगातल्या अर्ध्याहून जास्त समस्याच खरोखर चुटकीसरशी दूर होतील यावर माझा ठाम विश्वास बसला.
चित्रविचित्र गोष्टींचा नाद असणारी अनेक माणसं आपल्या आजूबाजूला आपल्याला दिसतात आणि त्यांच्या त्या विक्षिप्तपणातूनअनेक नवे नवे अनुभव आपल्याला येऊ शकतात. नाकासमोर बघून चालना या लोकांना मान्य नसतं. अशा लोकांबरोबर घालवलेले काही क्षण सुद्धा साधा सरळ जीवन जगणाऱयांना विलक्षण वाटू शकतात. इद्रिस नावाच्या या विचित्र माणसाबरोबर मला मिळालेले दोन दिवस माझ्यासाठी अतिशय वेगळ्या विश्वातले अनुभव देऊन गेले.
जगाच्या पाठीवरच्या अनेक शापित देशांपैकी एक म्हणजे इराक हा अरबस्तानाच्या वायव्य टोकाला असलेला देश. तैग्रिस आणि युफ्रेटीस नद्यांमुळे या प्रांतात सुमेरियन, असिरिअन, बाबीलोनिअन, मेसोपोटेमियन अश्या अनेक समृद्ध संस्कृती नांदल्या. एकेकाळचा हा समृद्ध आणि संपन्न देश आज पाश्चात्य देशांच्या हातातल खेळणं झालेला आहे आणि मागच्या १०० वर्षातल्या सततच्या लढाया, वांशिक नरसंहार, शेजारच्या देशाबरोबरचे तंटे अशा अनेक कारणांनी पार खिळखिळा होऊन गेलेला आहे. ब्रिटिश आणि फ्रेंच राज्यकर्त्यांनी १०० वर्षांपूर्वी पेरलेली दुहीची बीजं आज इतकी अक्राळविक्राळ फोफावली आहेत की त्यात अक्खा देश पोखरून निघालेला आहे.
शारीरिक उंची हा विषय बऱ्याच लोकांचा अतिशय जिव्हाळ्याचा असतो. आपण उंच, सुदृढ आणि बांधेसूद असावं अशी कोणत्याही स्त्री अथवा पुरुषाची मनापासूनची इच्छा असते. मध्यम किंवा कमी उंचीच्या व्यक्तींना उंच व्यक्तींची काही वेळा असूया पण वाटत असते. पण काही व्यक्ती शारीरिक उंचीच्या पलीकडे जाऊन आपल्या कर्तृत्वाची अशी काही उंची गाठतात की त्या कर्तृत्वाच्या उंचीपुढे मग भले भले लोक खुजे वाटायला लागतात.
जगातले काही देश मुळात जन्माला येतानाच आपल्याबरोबर दुभंगाचा शाप घेऊन आलेले असतात. मोठ्या प्राण्यांच्या झटापटीत ज्याप्रमाणे छोटी छोटी झाडं झुडपं पायाखाली तुडवली जातात त्याप्रमाणे हे देश जगातल्या बलाढ्य देशांच्या पायाखाली अनेक वेळा सापडत जातात. पॅलेस्टिन हा असाच एक अभागी देश या जगाच्या नकाशावर एक भूप्रदेश म्हणून दिसत असला, तरी मागच्या अनेक वर्षांपासून तिथले चार-साडेचार कोटी नागरिक आयुष्य मुठीत धरून जगात आलेले आहेत.
महासत्तेच्या काळातल्या अक्राळ विक्राळ रशियाचा एक भाग असणारा आणि संपूर्ण रशियाची तेलाची गरज एकट्याने भागवू शकेल इतका तेलसंपन्न भूभाग म्हणजे आजचा चिमुकला अझरबैजान देश. बाकू ही या देशाची राजधानी पूर्वीपासून तेलसंपन्न भूमी म्हणून ओळखली जाते.
एकदा दुबईच्या एका क्लायंटने आमच्या ऑफिसला एका खास कामासाठी पाचारण केलं. एका भल्या मोठ्या 'पार्क' मध्ये त्याला ५०-६० मोर असलेलं एक उद्यान बनवायचा होतं आणि त्यासाठी आम्ही त्याला वेगवेगळे आराखडे बनवून द्यावे अशी त्याची इच्छा होती. अर्थात वास्तुविशारद व्यक्तींना मोर या पक्ष्याबद्दल सखोल माहिती असणं शक्यच नव्हतं; म्हणून आम्ही एका तज्ज्ञ व्यक्तीला आमच्याबरोबर त्या कामात सहाय्यक म्हणून नेमलं.