
खूप भूक लागली तेंव्हा कागदं खाल्ली,
तहांनेणे जेंव्हा व्याकुळलो तेंव्हा रंग पियालो.
मोकळा श्वास जेंव्हा घेतला, फुफुसं भरली आकारांनी.
स्पेस हवाहोता तेंव्हा, तेंव्हा कुंपण घातली नियतीनी.
आणि स्पेस मिळाला तेंव्हा, तेंव्हा कुंपणच आपली वाटली.
to be or not to be च्या प्रश्नांत रोज ट्रेन पकडली,
गुलझार च्या कविता ऎकत ऎकत झोप ओढली.
नमस्कार मायबोलीकर्स,
मला मुंबई मध्ये चांगल्यापैकि लॉज ची सोय सुचवा please.
या वेळी अमेरिकेतुन मुंबई मधे गेल्यावर , नेहेमीप्रमाणे विमान्तळावरुन लगेचच पुण्याला न जाता, आम्हाला काही कामासाठी एक दिवस मुंबई मधे रहावे लागणार आहे.
मुलेही बरोबर आहेत. तर विमान्तळापासुन बर्यापैकी जवळ असा लॉज सुचवा.
१) स्वच्छ असावे. २ मुले आणि आम्ही नवरा बायको यांना पुरेसे मोठे rooms/beds असावेत.
२) सुरक्शित असावे.
३) तिथे विमान्तळा वरुन रात्री १ च्या सुमारास जाणे सुरक्शित आणि सोयिस्कर असावे. कसे जायचे आणि किती लांब आहे ते ही सांगा.आम्हाला मुंबई ची फार महिती नाही.
मुंबई लोकल ट्रेनने रोज प्रवास करणार्यांचा कधी कधी अंड्याला फार हेवा वाटतो तो याच करता की कान डोळे उघडे ठेवल्यास दुनियाभरचे अनुभव याच प्रवासात मिळतात. केवळ याच कारणा करीता अंड्या देखील बसचा प्रवास टाळून आधी ट्रेनला प्राधान्य देतो. कामानिमित्त वाशीला जाणे झाले होते. एकंदरीत ते शहर अंड्यासाठी नवीनच. तरीही अज्ञात प्रदेशात आल्यासारखे वाटावे असे काही नव्हते. वाशीहून सुटणारी ट्रेन पकडून कुर्ल्यापर्यंत यायचे अन तिथून ट्रेन बदलून दादरला, एवढे माहीत असणे पुरेसे असते मुंबईकरांना. बाकी सगळीकडे तीच तीच ट्रेन अन तेच तेच प्लॅटफॉर्म. अश्याच एका प्लॅटफॉर्मवर अंड्या पोहोचला तेव्हा ट्रेन नुकतीच लागत होती.
निर्सगाच्या गप्पा (भाग १३) या धाग्यावर दिनेशदा, हीरा, नंदिनी यांनी मुंबईबद्दल काही माहिती दिली. अशी या शहराबद्दलची छान, उपयोगी माहिती एकत्रित असावी म्हणून हा धागा.
कोणाकडे जुने फोटो, जुन्या आठवणी असल्यास सगळ्यांनाच त्यांचा लाभ घेता येईल. एखादी खास वैशिष्ट्यपूर्ण जागा असेल तर इथे नोंदवता येईल. इथे प्रकाशचित्रे टाकताना प्रताधिकाराचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन टाका.
घरात पंगतीचे जेवण असले की बसावयास एक तर आसने (बसकट) किंवा लांब सतरंजीचा पट्टा वापरतात. (ह्याला रनर म्हणतात का?) हा प्रकार जरीच्या जुन्या साड्यांपासून कुणी बनवते का? मुंबईत कुणाच्या ओळखीत असे बनवणारे आहेत का? किंवा मुंबईत रेडीमेड कुठे मिळतील काही आयडीया? नेहमीचे सतरंजी च्या कापडाचे नकोत. ते माझ्या घराच्या आसपास सहजी मिळतील. जरा हटके प्रकारातले हवेत.
" काय रे? काय झाले एकदम?" आश्चर्यचकित होत तिने विचारले. "एवढा दचकून काय पाहतो आहेस?"
" काही नाही ग. असाच एक विचार आला मनात." मी उत्तर दिले.
" मी हे सांगितले म्हणून तू एवढा दचकलास?का रे? एरवी तुझ्याशी बोलताना वाटले होते की तू एकदम frank असशील", पायल म्हणाली. मी काहीच बोललो नाही आणि चूक करून बसलो. कुणी असं बोलल्यावर गप्पं बसणं म्हणजे एका अर्थाने त्याला किंवा तिला दुजोरा देण्यासारखेच असते. आणि नेमके तेच झाले. मी काही बोलत नाही हे पाहून पायलसुद्धा काही सेकंद गप्पं बसली. शेवटी मीच तिला म्हणालो.
आमच्या बिल्डींगच्या चौथ्या मजल्यावर ती राहायची. सदैव आपल्या विश्वात. मी तिला बिल्डींगच्या इतर सदस्यांशी बोलताना कधी बघितलं नाही. तसेच बिल्डींग बाहेरचे कुणी तिच्या ब्लॉक मध्ये आल्याचे देखील मला स्मरत नाही. सकाळी ९ च्या सुमारास ती घरून बाहेर पडायची. बहुदा कामाला जात असावी. आणि संध्याकाळी ७ च्या सुमारास पायऱ्या चढताना दिसायची. पण त्या दिवसात तिने एकदाही माझ्याकडे पाहिले नाही. सदैव मान खाली घालून जात असे. जिन्यातच काय पण बिल्डींगच्या आवारात देखील ती कधीही कुणाकडे पाहून हसल्याचे मला आठवत नाही. एक मात्र होते. ती समोरून गेल्यानंतर वातावरणात एक अस्वस्थ शांतता पसरायची.
दि. २७ नोव्हेंबर २०११ रोजी लोकसत्ता-लोकरंग पुरवणीत प्रकाशित झालेला पुस्तक-परिचयपर लेख.
मूळ लेख इथे वाचता येईल.
----------
२६/११बद्द्ल सर्वकाही