घरात पंगतीचे जेवण असले की बसावयास एक तर आसने (बसकट) किंवा लांब सतरंजीचा पट्टा वापरतात. (ह्याला रनर म्हणतात का?) हा प्रकार जरीच्या जुन्या साड्यांपासून कुणी बनवते का? मुंबईत कुणाच्या ओळखीत असे बनवणारे आहेत का? किंवा मुंबईत रेडीमेड कुठे मिळतील काही आयडीया? नेहमीचे सतरंजी च्या कापडाचे नकोत. ते माझ्या घराच्या आसपास सहजी मिळतील. जरा हटके प्रकारातले हवेत.
मागे माझ्या आईच्या मैत्रिणीच्या ओळखीत एक बाई होत्या, ज्या जुन्या जरीच्या साड्यांपासून सुरेख सतरंज्या/ जाजम बनवून देत असत. माझ्या आईने एक जाजम बनवून घेतले होते. २ साड्यांचे सतरंजीच्या आकाराचे तुकडे घेऊन, दोन्ही मध्ये पातळ स्पंज किंवा तत्सम काहीतरी मऊसे घालून, छान दोर्याच्या डीझाईनने ते जाजम बनवलेले आहे. आता त्या बाईंचा कॉन्टॅक्ट गहाळ झाला आहे.
[
१) मध्यंतरी राजस्थानला जाणे झाले होते तेव्हा अगदी ठरवून असा प्रकार तिथल्या बाजारात मिळतो का ते पाहिले होते. मोर, कुयरी, पारंपरिक नक्षी, इ. व मारवाडी स्टाईल नक्षी असलेले फार सुंदर सुंदर मशीनेमेड रनर्स पहायला मिळाले. पण सगळेच्या सगळे फक्त २ माणसे बसू शकतील इतपतच होते. आणि किमतीही त्या मानाने फार होत्या. (७५० रु. ते १४०० रु.)
२) मोठ्या रीसॉर्ट्स मध्ये बेड वरती झोपलो की जिथे पाय टेकतात, त्या जागेवर एक लांबसा पट्टा अंथरलेला असतो. राजस्थानला असताना ज्या रीसॉर्ट्स ला राहिलो होतो. तिथला असला पट्टा पाहून आपल्याकडे तो पंक्तीत वापरायला किती बरे छान दिसेल, असे वाटून गेले.
]
मागे माझ्या आईच्या
मागे माझ्या आईच्या मैत्रिणीच्या ओळखीत एक बाई होत्या, ज्या जुन्या जरीच्या साड्यांपासून सुरेख सतरंज्या/ जाजम बनवून देत असत. माझ्या आईने एक जाजम बनवून घेतले होते. २ साड्यांचे सतरंजीच्या आकाराचे तुकडे घेऊन, दोन्ही मध्ये पातळ स्पंज किंवा तत्सम काहीतरी मऊसे घालून, छान दोर्याच्या डीझाईनने ते जाजम बनवलेले आहे. आता त्या बाईंचा कॉन्टॅक्ट गहाळ झाला आहे. >>>>
प्रत्येक सतरंजीमागे ८० ते १२० रु. घेतात. शिवाय ते आपण दिलेल्याच साड्याचे आपल्याला देतील याची खात्री नसते. त्याला थोडा वेगळाच वास येतो. सौ. ने घरी अशा २ करुन घेतल्या आहेत.
अकोल्यात अजुन ही ती माणसे आहेत बनवुन देणारी. पण करु नको
त्यापेक्षा हँडल्युम मधे छान भेटतील.
त्याला मराठीत आसनपट्टी म्हणतात. ईंग्रजीत माहीत नाही.
आसनपट्टी >>> छान शब्द आहे.
आसनपट्टी >>>
छान शब्द आहे. एका व्यक्तीचे असते ते एक आसन. अनेक व्यक्तींसाठी आसनपट्टी!
'रनर' शा शब्द मला राजस्थानमधल्या दुकानांतच कळला. पण हा शब्द आपल्या इथे प्रचलित आहे की नाही माहीत नाही.
आमच्या घराजवळ (कल्याणमध्ये) हँडलूमच्या दुकानांत मी पाहिले आहे. पण सतरंजी सारखाच प्रकार पट्टीच्या स्वरुपात मिळतो.
तसला प्रकार घरात आहे आधीच.
निंबुडा ते "पंक्ती' ऐवजी
निंबुडा ते "पंक्ती' ऐवजी "पंगती" असं लिहाल का? मला धाग्याचं नाव वाचुन आधी काही ़ कळलं नाही.
ऑर्कीड, धन्यवाद. लक्षातच आलं
ऑर्कीड, धन्यवाद. लक्षातच आलं नव्हतं.
मुक्तेश्वर कुलकर्णी, तुम्ही
मुक्तेश्वर कुलकर्णी, तुम्ही म्हणताय ते वेगळे आहे बहुदा!
त्या प्रकारात आपण दिलेल्या साड्यांचे लांब लांब धागे/पट्ट्या करुन विणतात.
मी ते पतंगी साठीचे रनर्स
मी ते पतंगी साठीचे रनर्स वाचलं होतं.
रच्याकने, ऑनलाईन किंवा गुगलून बघ.. भारी भारी डिझाईनचे टेबल रनर्स भेटतील तुला. अगदी थिम नुसार सुद्धा.
http://www.tenthousandvillages.com/products/tabletop/tablecloths-runners << गुगलने इथे सांगितलंय.
http://www.saffronmarigold.com/catalog/directory.php?cPath=43_29 << इथे
आणि इथे पण
http://www.tradeindia.com/Seller/Textiles-Leather-Products/Home-Textiles...
निंबे..इथेतरी टेबलावर
निंबे..इथेतरी टेबलावर घालायच्या पट्ट्यांना रनर्स म्हणतात....
खाली बसायला आसनपट्टी.. छान नाव आहे..
त्याला मराठीत आसनपट्टी
त्याला मराठीत आसनपट्टी म्हणतात. >>> हो. आम्ही पुण्याच्या खादी भांडारमधून खास जाऊन आणली आहे. त्यांच्याकडे पण एकच उरली होती. ती महाग असते. ६५० ला एक - ज्यावर ३ माणसं खेटून बसू शकतात. पण लहान मुलांना त्यावर बसवून रांगेत खायला खूप आवडते, असा अनुभव आहे.
पुर्वी महानगरपालिकेच्या शाळेत असायच्या अशा पट्ट्या... आताशा जास्त कुणी घेत नाही म्हणाले ते. त्यामुळे आसपासच्या खादी भांडार किंवा तत्सम थोडेसे पारंपारिक गोष्टी मिळणारे, सुती कपड्यांचे दुकान बघा. जाताना एकदम ५+ हव्या असतील तर ऑर्डर द्यायच्या तयारीने जा.
मी ते पतंगी साठीचे रनर्स वाचलं होतं. >>> मी पण!
मागे माझ्या आईच्या
मागे माझ्या आईच्या मैत्रिणीच्या ओळखीत एक बाई होत्या, ज्या जुन्या जरीच्या साड्यांपासून सुरेख सतरंज्या/ जाजम बनवून देत असत. माझ्या आईने एक जाजम बनवून घेतले होते. २ साड्यांचे सतरंजीच्या आकाराचे तुकडे घेऊन, दोन्ही मध्ये पातळ स्पंज किंवा तत्सम काहीतरी मऊसे घालून, छान दोर्याच्या डीझाईनने ते जाजम बनवलेले आहे. >>>>>>>>> असा प्रकार माझ्या लेकाला अंगावर पांघरायला, आईने दिलाय. आईच्या दोन साड्याची खोळ करुन आत पातळ स्पंज भरलाय. तीने ठाण्यातच ते करुन घेतलय. जर हवे असेल तर मी आईला विचारुन पत्ता किंवा फोन देवु शकेन्. तीने सुती साड्या वापरल्यात त्यामुळे स्पंज असला तरी गरम होत नाहि. किंवा थंड हि पडत नाहि.
असा प्रकार माझ्या लेकाला
असा प्रकार माझ्या लेकाला अंगावर पांघरायला, आईने दिलाय >>>
असे दुपटे किंवा सुती साड्यांची मऊ रजई इथे मला लोकली पण बनवून मिळेल. खास जरी वा जुन्या बेळगाव सिल्क वै. च्या साड्या असतात त्यांची आसनपट्टी बनवून देणार का विचार प्लीज!
हल्ली मुंबईत ठिकठिकाणी जुन्या
हल्ली मुंबईत ठिकठिकाणी जुन्या चादरींपासुन आसनपट्टी, गालीचे वै. हातमागावर विणुन देणारी मंडळी आली आहेत.. आम्ही त्यांच्यांकडुन गणपतीला गावी जातान लांबच लांब आसनपट्टी बनवुन गेतल्या होत्या..
के अंजली ने विपूतून दिलेली
के अंजली ने विपूतून दिलेली माहिती इथे डकवत आहे:
+++++++++++++++++++++++++++++++++++++
के अंजली
10 October, 2012 - 22:25
निंबुडे, तुला हव्या तश्या रनर्स मी मागच्या वर्षी दादरच्या ग्राहकपेठेत घेतलेल्या, कॉटनच्या छान आहेत, या वर्षीचा दादरची पेठ संपली आहे पण १ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर बोरीवली भाटीयावाडी हॉल, बाभईनाका, बोरीवली पश्चिम ला आहे, आनंदवनचा स्टॉल आहे तिथे, तिथे विचार कुणी असेल तर आनंदवनच्याच स्टॉलवरच्या मी घेतल्यात, त्या आवडल्या मला.
निंबुडा
11 October, 2012 - 11:47
ग्राहक पेठ संपली म्हणजे?? कळलं नाही!
मला वाटले की दादर मधल्या एका एरीयाचे हे नाव असेल.
के अंजली
11 October, 2012 - 21:52
अगो ग्राहक पेठ म्हणजे... तू व्यापारी पेठेत गेलीस का कधी? तशीच असते.. वेगवेगळे स्टॉल्स असतात एकत्र,
पण ग्राहक पेठेत चांगले असतात स्टॉल्स, साड्या, ड्रेस मटेरियल्स वगैरे वगैरे..तर ती वेगवेगळ्या ठिकाणी भरते, १ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर अशी..त्याच्यात आनंदवनचा स्टॉल पाहिलेला मागच्या वर्षी आणि खरेदी केलेली, म्ह्णून तुला सांगितलं, सहजासहजी मिळत असेल तर पहा.. आता ठाण्यात१० ऑक्टोबर ते १७ ऑ. अशी आहे पण तिथे आनंदवनचा नाहिये स्टॉल, बाकीचे आहेत, तिथे बघ यंदा जाता आलं तर..स्थळ शुभंकरोती हॉल नौपाडा ठाणे..(प.)
+++++++++++++++++++++++++++++++++++++
अच्छा, आसनपट्टीला रनर म्हणतात
अच्छा, आसनपट्टीला रनर म्हणतात होय?
मला वाटलं, स्वयंपाकघरापासून ते पंगतीपर्यंत खाद्यपदार्थांची झटपट ने-आण करण्यासाठी "धावते" रनर्स हवे आहेत!
सोलापूरला पूर्वी
सोलापूरला पूर्वी टेक्स्टाईलच्या कारखान्यात असे साधे रनर मिळत असे. आता माहित नाही. पण सतरंजी सारखेच पण कमी रुंदीच्या लांब पट्ट्यांप्रमाणे. धुवायला पण सोपे. अर्थात त्यात सिल्क, भरतकाम इ. केलेले नसायचे. पण मिळायला हरकत नसावी.
जुन्या साड्यांपासून गोधडी करून देणार्या बायका घरोघरी दुपारच्या वेळेत येत. आता ते बंदच झाले असेल. पण त्यांच्याकडे हव्या त्या आकारात पट्टया कापून शिवून मिळत.
मी तसला प्रकार कोरेगाव पार्क
मी तसला प्रकार कोरेगाव पार्क (पुणे) परिसरात बघितला आहे. तेथे असल्या प्रकारची कामे केली जातात. बहुदा त्या राजस्थानी स्त्रिया असाव्यात.
याला "भोजनवळ" असेहि
याला "भोजनवळ" असेहि म्हणतात....आमच्याकडे आहेत अश्या भोजनावळी...