बारीक रवा किंवा मैदा १/२ वाटी
साजुक तुप १/२ वाटी
साखर १ वाटी
थंड दूध १ वाटी
बदाम पिस्त्याचे काप आणि वेलची दाणे ऐच्छीक
वेगळे स्वाद आणि रंग यासाठी खाण्याचे रंग, मँगो पल्प, चॉकलेट सिरप आवडी प्रमाणे
एका जाड बुडाच्या पॅन मध्ये तुप, मैदा, (किंवा बारिक रवा जे घेतले असेल ते) साखर आणी दूध घालून ढवळून, गुठळ्या मोडून चांगले एकत्र करावे.
मग स्टोव्ह मिडियम हाय वर उकळायला ठेवावे. उकळी येताच लगेच आच कमी करून मिश्रण शिजवावे. एकसारखे ढवळावे लागते नाहीतर खाली मिश्रण लागु शकते. साधारण पंधरा विस मिनिटे लागतात.
एकीकडे अॅल्युमिनियन फॉइल ला तुपाचा हात फिरवून प्लॅटफॉर्म वर पसरवून ठेवावी.
जरा मिश्रण बाजूने सुटून जवळ येउ लागले की त्यात अर्धा चमचा तुप टाकावे. तुम्हाला जर रंगीत हलवा हवा असेल तर ह्या स्टेज ला मिश्रणात रंग अथवा इसेन्स घालावा. मी बदाम पावडर घातली.
मिश्रणाचा गोळा व्ह्यायला लागला की.. म्हणजेच.. ज्या चमच्याने तुम्ही मिश्रण धवळत आहात, त्या भोवती गोळा जमून आला कि स्टोव्ह वरुन पॅन उतरावे.
लगेच तुप लावलेल्या फॉईल वर पसरून. वरुन प्लॅस्टीक शीट टाकून भराभर पापडासारखे लाटून पसरावे.
मध्ये एकदा प्लॅस्टीक शीट उचलून हलव्यावर वेलची दाणे, काजू बदामाचे काप पसरवुन टाकावे. पुन्हा पॅस्टिक टाकून निट लाटून हलवा एकसारखा पातळ करावा.
प्लॅस्टिक काढून थोडा थंड करावा. मग हव्या त्या आकाराचे काप कापून. मध्ये मध्ये बटर पेपर टाकून ठेवावा.
लाटायचे काम भराभर आणि पापडासारखे ताकद लाउन करावे लागते.
असा मस्त हलवा खायला थोडी एक्सरसाईझ हवीच ना
सुरवातीला जरा नरम वाटला तरी थंड झाल्यावर एकदम खुटखुटित मस्त होतो अगदी माहीम सारखा.
वर लिहिल्या प्रमाणे दोन तीन बॅच केल्या तर मॅन्गो, चॉकलेट, किंवा रंगीबेरंगी माहीमचा हलवा बनवता येईल.
वॉव....नक्की करणार
वॉव....नक्की करणार![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कसला सुरेख, नाजूक दिसतोय हलवा
कसला सुरेख, नाजूक दिसतोय हलवा __/\__ !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला करायला जमेल असं वाटत नाही. खायला आवडतो
मला लहानपणी भयानक आवडायचा
मला लहानपणी भयानक आवडायचा माहिम हलवा.
मला खूप आवडतो हा खायला,
मला खूप आवडतो हा खायला, मुंबईला बाबा कामासाठी गेले की आणायचे.
शूम्पी +१ .. रेसिपी, फोटो
शूम्पी +१ ..
रेसिपी, फोटो मस्तच ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जबरीच!!! सह्ही दिसतोय एकदम!
जबरीच!!!
सह्ही दिसतोय एकदम! ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शूम्पी ++१
धने ग !!!! किती छान आणि सोपी
धने ग !!!! किती छान आणि सोपी रेसिपी आहे याची, मी नक्की करुन बघेण![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लहानपणी आवडायचा की नाही
लहानपणी आवडायचा की नाही कल्पना नाही पण मोठेपणी वरचा फोटो बघायला आवडतोय.
जबरी दिसतोय.
पणशीकरांचा हलवा आठवला
पणशीकरांचा हलवा आठवला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
याला माहिमचा हलवा का
याला माहिमचा हलवा का म्हणतात... एनी हिस्टॉरिकल रेफरन्स????
फोटो सुंदर! सुबक प्रकार
फोटो सुंदर! सुबक प्रकार आहे.
शेवटला फोटो बघून हॅलापिन्योयुक्त माँट्रेजॅ़क चीजस्लायसेसची आठवण झाली.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
याला माहिमचा हलवा का
याला माहिमचा हलवा का म्हणतात... एनी हिस्टॉरिकल रेफरन्स???? >> आधी मूळात हलवा का म्हणतात हेही कोडेच आहे.
वॉव!! सुग्रणीचेच काम दिसतेय!
वॉव!! सुग्रणीचेच काम दिसतेय! मला लईच्च आवडतो पण जमेल असं वाटत नाहीये!![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
रच्याकने, मा ह गव्हाच्या चिकापासुन बनवतात असं काहीतरी मला आठवतयं! खखो दिनेशदा जाणोत!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आधी मूळात हलवा का म्हणतात
आधी मूळात हलवा का म्हणतात हेही कोडेच आहे.>>>> सिक्सर![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
साध्या गोड शिर्याला हे लोक सुजीका हलवा म्हणतात ! तसेच कुणीतरी ठेवले असेल ह्याचे नाव.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आला का... वा. मस्तच झालाय
आला का...
वा. मस्तच झालाय गं. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त फोटो !
मस्त फोटो !
याला माहिमचा हलवा का म्हणतात.
याला माहिमचा हलवा का म्हणतात. >>> दादा कोंडकेंना विचारावं लागेलं .![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मस्त टेश्टी दिसतोय .
वा ! मस्त दिसतोय हलवा. मला
वा ! मस्त दिसतोय हलवा.
मला भयंकर आवडतो त्यामुळे एक ट्राय नक्की![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वॉव हा प्रकार घरी करता येतो
वॉव हा प्रकार घरी करता येतो हे माहित नव्हते, मला प्रऽचंऽड आवडतो माहीमचा हलवा.
डॅफो फोटो एकदम मस्त आले आहेत. लगेच तुकडा तोंडात टाकावासा वाटतोय.
डॅफो, कुफेहेपा? आता पार्सल
डॅफो,![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
कुफेहेपा? आता पार्सल पाठव इथे पुण्यात.
मस्त जमलाय गं. मी जामच आळशी अशा बाबतीत.
मला अजिबातच आवडत नाही पण
मला अजिबातच आवडत नाही पण पाककृती मस्तच!
मला वेगळा हलवा वाटला होता, आता जागूच्या लेखनात शोधून येतो.
मस्त.. मला खूप आवडतो. लहानपणी
मस्त.. मला खूप आवडतो. लहानपणी अॅसॉर्टेड मिठाई बॉक्समधे आवर्जून असायचा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एकदम वॉव दिसतोय...दिवाळीची
एकदम वॉव दिसतोय...दिवाळीची मिक्स मिठाई यायची त्यात हमखास असायचा.
मला एक प्रश्न आहे गरम मिश्रणावर प्लास्टिक ठेऊन लाटायचं तर प्लास्टिक थोड्फार वितळून त्याचं केमिकल पोटात जाणार नाही का? त्याला पर्याय म्हणून काय वापरता येईल? बटर पेपर?
वॉव !! खतरा फोटो!! मस्तच
वॉव !! खतरा फोटो!!
मस्तच दिसतोय. उचलुन तोंडात टाकावासा वाटतोय.
हा हलवा फक्त माहिम मधे मिळतो
हा हलवा फक्त माहिम मधे मिळतो का?
छान डॅफो. तुझ्यात हातात जादू आहे बुवा.
जबरदस्त.. बी, या हलव्याला
जबरदस्त..
बी, या हलव्याला माहिमचा हलवा असे फक्त नाव आहे. या परिसरातील कोळी समाजात तो फार लोकप्रिय आहे.
त्यांच्या लोकगीतात पण याला स्थान आहे. ( दोन पैसे दोन पैसे दे गो मला, माहीमचा हलवा आणीन तूला... )
सपाट लाकडावर पण लाटता येतो.
खूप हलवाव लागतं.. परतावं
खूप हलवाव लागतं.. परतावं लागतं.. जळु नये.... म्हणून असेल हे नाव.. 'हलवा'
पाककृती मस्तच!...........
पाककृती मस्तच!...........
वॉव मस्तच आहे कृती. फोटो लै
वॉव मस्तच आहे कृती. फोटो लै खतरा दिसताहेत.
सोनहलवा पण साधारण असाच करतात का? सोनहलवा म्हणजेच टर्किश डिलाईट का? तो ही मस्त लागतो आणि त्याहूनही मस्त दिसतो, एकदम रंगीबेरंगी!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मामी, तो तर बदामी हलवा ना??
मामी, तो तर बदामी हलवा ना?? कॉर्नफ्लावर चा करतात बहुतेक... लाल/ हिरव्या रंगात मिळतो... अजिब्बात आवडत नाही....चिक्कट चिक्कट चिकटतो....
टर्किश डिलाईट त्याचाच भाऊ / बहिण![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
Pages