माहीम चा हलवा (फोटोसह)

Submitted by डॅफोडिल्स on 15 November, 2012 - 14:31
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

100_5889 (640x468).jpg

बारीक रवा किंवा मैदा १/२ वाटी
साजुक तुप १/२ वाटी
साखर १ वाटी
थंड दूध १ वाटी
बदाम पिस्त्याचे काप आणि वेलची दाणे ऐच्छीक
वेगळे स्वाद आणि रंग यासाठी खाण्याचे रंग, मँगो पल्प, चॉकलेट सिरप आवडी प्रमाणे

क्रमवार पाककृती: 

एका जाड बुडाच्या पॅन मध्ये तुप, मैदा, (किंवा बारिक रवा जे घेतले असेल ते) साखर आणी दूध घालून ढवळून, गुठळ्या मोडून चांगले एकत्र करावे.

मग स्टोव्ह मिडियम हाय वर उकळायला ठेवावे. उकळी येताच लगेच आच कमी करून मिश्रण शिजवावे. एकसारखे ढवळावे लागते नाहीतर खाली मिश्रण लागु शकते. साधारण पंधरा विस मिनिटे लागतात.

एकीकडे अ‍ॅल्युमिनियन फॉइल ला तुपाचा हात फिरवून प्लॅटफॉर्म वर पसरवून ठेवावी.

जरा मिश्रण बाजूने सुटून जवळ येउ लागले की त्यात अर्धा चमचा तुप टाकावे. तुम्हाला जर रंगीत हलवा हवा असेल तर ह्या स्टेज ला मिश्रणात रंग अथवा इसेन्स घालावा. मी बदाम पावडर घातली.

मिश्रणाचा गोळा व्ह्यायला लागला की.. म्हणजेच.. ज्या चमच्याने तुम्ही मिश्रण धवळत आहात, त्या भोवती गोळा जमून आला कि स्टोव्ह वरुन पॅन उतरावे.

लगेच तुप लावलेल्या फॉईल वर पसरून. वरुन प्लॅस्टीक शीट टाकून भराभर पापडासारखे लाटून पसरावे.

mahim1.jpg

मध्ये एकदा प्लॅस्टीक शीट उचलून हलव्यावर वेलची दाणे, काजू बदामाचे काप पसरवुन टाकावे. पुन्हा पॅस्टिक टाकून निट लाटून हलवा एकसारखा पातळ करावा.

प्लॅस्टिक काढून थोडा थंड करावा. मग हव्या त्या आकाराचे काप कापून. मध्ये मध्ये बटर पेपर टाकून ठेवावा.

100_5876 (640x486).jpg

वाढणी/प्रमाण: 
५" बाय ५" चे ८ भाग (वाटीच्या आकाराप्रमाणे कमी जास्त)
अधिक टिपा: 

लाटायचे काम भराभर आणि पापडासारखे ताकद लाउन करावे लागते.
असा मस्त हलवा खायला थोडी एक्सरसाईझ हवीच ना Wink

सुरवातीला जरा नरम वाटला तरी थंड झाल्यावर एकदम खुटखुटित मस्त होतो अगदी माहीम सारखा.

वर लिहिल्या प्रमाणे दोन तीन बॅच केल्या तर मॅन्गो, चॉकलेट, किंवा रंगीबेरंगी माहीमचा हलवा बनवता येईल.

माहितीचा स्रोत: 
मायाजाल
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डॅफो _/\_ सुरेख !!

सोन हलवा म्हणजेच सोन पापडी ना?
बदामी हलवा म्हणजे गव्हाच्या चिकाचा लाल हिरवा, पिवळा, केशरी, लुबलुबीत क्युब्जच्या रुपात मिळतो तो.

मला सगळे मिठाईतले हलवे आवडतात Happy

हे मस्त आहे हे ! माझ्या लेकाला भारी आवडतो. आता रविवारी करणार Happy इतका सोपा असेल असे वाटले नव्हते. डॅफो, थॅक्स गं Happy
गरम गरमच लाटावे लागतील ना ? मग किमान १० बाय २० चा पसरट हलवा लाटू? की दोन गोळे करून करू ? कारण एक करे पर्यंत दुसरा गार होईल तर तो लाटला जाईल का ? Uhoh जरा नीट विस्कटून सांग ना ....

अश्विनी ताई अगं तु हा असा =/` आशिर्वाद दे Happy

सो सोनहलवा आणि सोन केक म्हणजे सोनपापडी. तो मउ लिब्लिबित हिरवा लाल पिवळा बदामी Happy
टर्किश डिलाइट मी नाही खाल्ले कधी.

अवल >> एकच कर Happy फर मोठा नाही होणार .. एक फुट बाय दिड फुट म्हणजे लहानच ना आपल्या किचन च्या प्लॅट्फॉर्म वर.

वॉव्.... माझा फेव्हरिट....मला वाटाय्चे फर किचकट रेसिपी असेल व बरेच काय काय घालत असतील्...पण हे तर सगळे घरी सहज असणारे जिन्नस आहेत्.....thanks dafodills!

बायो, इथे ज्या गोष्टीत तुझे मोठेपण आहे ते मान्य करायलाच हवं Happy
बाकी आशिर्वाद असतातच Happy तू येशिल तेव्हा शारदाकडे भेटूच आणि तेव्हा तुझ्या हातची एखादी स्पेशल डिश खाईनच किंवा ठाण्यात भेटलीस तर माझ्या हातचं काहीतरी साधंसं गोड मानून घेशीलच Proud

वा ! मस्त! डॅफोडिल्स, खरंच हा ३० मिनीटात होतो ? तुझा हा हलवा एकदम मस्त दिसतो. पण तो शिजला आहे हे कसे ओळखायचे? काही खुण आहे का ? कि तु सांगीतलेस तसे १५-२० मि. ठेवायचे?

डॅफो, हलवा मस्त दिसत आहे.
कोणत्या मायाजालावर ही कृती आहे ते सांगाल का प्लिज.

भारीच दिसतोय. करून बघण्याचा मोह होतोय Happy

दिनेश, तुम्ही मागच्या पानावर कोळीगीतातला माहिमचा हलवा म्हणालात, तो हा नसावा, माश्यातला हलवा असावा Happy

माशातला, हलवा ते बाहेरून कशाला आणतील, फारतर पकडून आणतील... Happy
हा पदार्थ त्यांच्यात खुप लोकप्रिय आहे, खरा.

Pages