भटकंती

कोकणवारी..

Submitted by डीडी on 21 April, 2013 - 02:17

दर वर्षी भारतात येणं होतं, पण ह्या वर्षी मार्च-एप्रिल मध्ये घरी जाण्याचा योग आला. कोकणांत ह्या दिवसांत म्हणजे नुसती धम्माल. ह्या वेळी बाहेर खूप फिरणं नाही झालं, बहुतेक वेळ घरीच गेला. त्यातूनही घरी आणि आजूबाजूला काढलेली काही छायाचित्रं टाकत आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

स्वप्नवत सह्यभ्रमंती::: पाच दिवसांची खडतर, भन्नाट अन् कसदार भ्रमंती (उत्तरार्ध)

Submitted by Discoverसह्याद्री on 19 March, 2013 - 20:28

चावंड - कुकडेश्वर - ढाकोबा - दुर्ग - आहुपेघाट - गोरखगड - सिद्धगड - नारीवली घाट - भीमाशंकर

स्वप्नवत सह्यभ्रमंती::: पाच दिवसांची खडतर, भन्नाट अन् कसदार भ्रमंती (पूर्वार्ध)

Submitted by Discoverसह्याद्री on 11 March, 2013 - 19:55

चावंड - कुकडेश्वर - ढाकोबा - दुर्ग - आहुपेघाट - गोरखगड - सिद्धगड - नारीवली घाट - भीमाशंकर

...चला निसर्ग व अध्यात्माच्या सान्निध्यात हाडशीला

Submitted by ferfatka on 26 February, 2013 - 09:36

24 Feb. 2013

शब्दखुणा: 

‘तोरण्या’चं हरवलेलं दुर्गस्थापत्य गवसतं, तेंव्हा...

Submitted by Discoverसह्याद्री on 19 February, 2013 - 10:42

कधी वाटतं, दोन-चार दिवस फुरसत काढून, निवांत एखाद्या जुन्या-जाणत्या गडावर शोधयात्रा काढावी..
..वा-यां-वादळांत टिकाव धरून राहण्यासाठी गडावरच्या शिबंदीची, पाण्याची, चोरवाटांची, संरक्षणाची कशी व्यवस्था असेल, याचे आडाखे बांधावेत..
..माचीवरच्या कारवीतून, तिरपांड्या घसा-यावरून घुसत जाताना जीव मेटाकुटीला यावा, अन् अवचितंच पहा-यासाठी खोदलेली विवरं सापडावीत...
..खो-यात उतरणारी दुर्घट वाट सुगम करावी, अन् झाडीत दडलेलं देवीचं ठाणं गवसावं..
..एखादं बुजलेलं वैशिष्ट्यपूर्ण टाकं तास न् तास खपून श्रमदानानं मोकळं करावं, अन् टाक्यावरच्या कोरीव कामानं अचंबित व्हावं..

लिंगाणा प्रदक्षिणा – निसणीची नाळ आणि सिंगापूर नाळ (उत्तरार्ध)

Submitted by Discoverसह्याद्री on 30 January, 2013 - 20:18

दुर्ग रायगडाच्या दुर्गमत्वाचं कोडं सोडवण्यासाठी, आसपास दाटीवाटी केलेल्या अजस्र सह्यरांगांतून आडवाटेच्या घाटवाटांचा वेध घेण्यासाठी भटकंती चालू होती. पहिल्या दिवशी काळ नदीच्या खो-यातील पाने गावातून ट्रेकर्सना अनोळखी अशी ‘निसणी’ची वाट चढून, सह्याद्रीच्या अस्पर्शित भागांना देत घाटमाथ्यावर सिंगापूर गावी पोहोचायला तब्बल एक दिवस लागला होता. रायलींग पठारावरून दिसणा-या विराट दृश्यानं खुळावलो होतो..
वाचा पूर्वार्ध: http://www.maayboli.com/node/40397

मालवण चित्र-स्वरूपात.

Submitted by Sano on 24 January, 2013 - 09:55

'काय रे, कधी निघाचय ?' राहुल चा फोन वरचा प्रश्न.

हल्ली त्याचा फोन आला की पहिला प्रश्ना हाच आसतो. बरेच दिवस आमचा मलवाणला जायचा प्लान चालू होता (इथे 'बरेच दिवस' म्हणजे शुद्ध मराठीत 'बरेच महीने'). पण सगळ्यांचे जुळुन येत नव्हते. जिप्सी, मी आणि जीवेश च्या ह्या ना त्या कारणाने प्लान पूढे जात होता. 31st चा वीकेंड पण जवळ आला होता आणि राहुल ची आतुरता शीगेला पोहोचलेली.

लिंगाणा प्रदक्षिणा – निसणीची नाळ आणि सिंगापूर नाळ (पूर्वार्ध)

Submitted by Discoverसह्याद्री on 20 January, 2013 - 08:06

...सह्याद्रीच्या पश्चिम घाटाच्या माथ्यावरून असंख्य डोंगरवळया, घळी, ओढे, झुडपं, कारवीचे टप्पे अश्या मार्गावरून खडतर भटकंती चालू होती. ६-७ तासांच्या सलग चालीनं, चढ-उतारानं पाय कुरकुरताहेत, पाठीवरच्या हॅवरसॅकचं वजन चांगलंच जाणवतंय आणि आजच्या मुक्कामाच्या जवळपासही पोहोचलो नाहीये. अश्यावेळी पुढच्याच वळणाआड दडलेला एक ओहोळ खळाळत सामोरा येतो. थंड पाण्यानं, दाट झाडो-यानं आणि सगळा आसमंत प्रसन्न करणा-या रंगीबेरंगी फुलपाखरांनी आम्ही सुखावतो. जुन्या ट्रेक्सच्या आठवणी निघतात, हास्यकल्लोळात स्थळ-काळ-वेळेचं फारसं भान राहत नाही अन भटकंतीची रंगत वाढतच जाते...

एका अपरिचित किल्ल्याचा शोध::: कोराई अन् अनघाई घाटाचा टेहेळणी नाका – ‘दुर्ग अनघाई’

Submitted by Discoverसह्याद्री on 11 January, 2013 - 11:17

.... कोकणातल्या वर्‍हाड गावी पोहोचलो तर समोर सह्यधारेमागचा कोरीगड-तेलबैला, उत्तरेला नागफणी अन् दक्षिणेला सरसगड असे सारे तालेवार दुर्ग-डोंगर होते. पण, सह्यधारेच्या डोंगरांच्या गराड्यात ‘अनघाई’चा डोंगर लपून गेला होता - नेहेमीप्रमाणेच उपेक्षित. म्हणूनच, आजची खास मोहीम होती, कोणीच ट्रेकर्स कधीच न गेलेल्या ‘अनघाई’ या डोंगराच्या शोधाची. पडताळून पहायचं होतं की, हा एक सामान्य डोंगर आहे, की विस्मृतीच्या आड गेलेला अपरिचित दुर्ग!!!

विषय: 

गोष्ट माकडाची !

Submitted by Yo.Rocks on 2 January, 2013 - 14:18

समोर 'हडसर' किल्ल्याच्या अप्रतिम पायर्‍या बघण्यात दंग झालो होतो.. किल्लेबांधणीचे एक अप्रतिम उदाहरण समोर होते.. एकसंध पाषाण फोडून केलेल्या पायर्‍या अगदी छप्परवजा बोगदयासदृश मार्गातून जाताना वाटत होत्या.. त्याचेच फोटो घेत असताना पोटात भूकेची चळवळ सुरु झाली.. आता नाश्ता बनवायला हवा म्हणून एकीकडे 'डबा ऐसपैस' खेळायला गेलेल्यांची (मायबोलीकर इंद्रा व रोहीत एक मावळा आणि रोहीतचा मित्र) आठवण झाली.. आम्ही (मी व सौ. रॉक्स) दोन डोंगराच्या घळीमध्ये होतो.. अगदीच अरुंद नव्हती.. इथेच आम्ही सोबत आणलेले सॅकसामान ठेवले होते..

विषय: 

Pages

Subscribe to RSS - भटकंती