मायबोली गणेशोत्सवाच्या धूमधामीतही तिचं मन थाऱ्यावर नव्हतं. कारणही तसंच होतं. १०० आकडा तिच्या नकळत गाठलाच होता. त्याच विचारात तिने संयोजकांच्या धाग्यावर नो मैदा, नो शुगरचा संकल्प लिहून टाकला. ‘त्या निमित्ताने शंभरातले काही तरी कमी होतील’’ तिने विचार केला.
——
नीट चाललेल्या संकल्पाला ग्रहण लावण्यासाठीच की काय आज नवऱ्याने तिच्या आवडीच्या करंज्या आणल्या. ‘प्रसाद म्हणून खाव्याच लागणार’ असा विचार करत पाच सहा करंज्या ताटलीत घेत ती मायबोली चाळू लागली.
तो एक वाटाड्या होता. प्रवाशाला पुढचा रस्ता दाखवणं कामच होतं त्याचं. पुर्वी सठीसहामाशी हाताला काम मिळायचं, येतच कोण होतं मरायला इतक्या आडगावी.
आत्तापर्यंत ९९ जणांना त्याने वाट दाखवायचं काम केलं होतं. नियमाप्रमाणे शतक झाले की तो करार मुक्त होणार होता.
सद्गतीच्या वाटेवर नेणे हे कामच होते त्याचे. गोंधळलेल्या, घाबरलेल्या वाटसरूला या सुंदर शाश्वत वाटेची ओळख करुन द्यायला त्याला मनापासून आवडायचे. या वाटेवरचा तो एक वाटाड्याच तर होता. आणि आज तर मुक्तीचा दिवस होता. आज शतक पुर्ण होण्याचे संकेत त्याला कधीचे मिळाले होते.
२०२२ जुलैची एक सायंकाळ -
खंडाळ्याच्या घाटात मेघ मल्हारच्या नादात सरी झेलत अनिकेची विकांताची धम्माल सुरू होती. लाँग राईड वर एकट्यानेच जायला आवडायचं त्याला. मस्त धुवांधार पाऊस, पल्सर आणि एक निसर्गवेडा.
२०२२ जुलैची ती रात्र -
चिंताग्रस्त होऊन सर्वजण डॉक्टरांची प्रतीक्षा करत ओटीच्या बाहेर उभे. ऑपरेशन संपले आणि अनिकेत कोमात गेल्याचे कळल्यावर आई बाबा शून्यात हरवून बसलेले.
माझे स्थित्यंतर... केवढा व्यापक विषय आहे हा.. माझ्यासाठीच कशाला, तुम्हा आम्हा सर्वांसाठीच हा व्यापक विषय असेल. लिहायला घेतले तर जवळपास आत्मचरीत्र तयार होईल. कारण बदल हेच तर आयुष्य आहे. माणूस बदलायचा थांबला तर तो तिथेच थिजला आणि संपला. तसेही कोणीतरी म्हटलेच आहे (बहुतेक संयोजकांनीच) की जगात सगळ्यात काही शाश्वत, कायमस्वरुपी असेल तर तो म्हणजे बदल!
मागे वळून पाहताना दोनचार चांगले बदल जाणवतात ज्यांनी माझ्या व्यक्तीमत्वात उल्लेखनीय बदल घडवला आणि आयुष्यावर फार मोठा फरक पाडला आहे.
-------------------------------------------
विजयालक्ष्मी: वय ७ वर्षे
आवडती गाडी... ट्रॅक्टर
.
ट्रॅक्टरवर
घरचे/सोसायटीमधील गणपती गेल्यावर मायबोली उपक्रमासाठी एखादे कार्टून काढशील अशी लेकीशी सेटिंग लाऊन ठेवली होती. कारण स्पष्ट आहे. तेवढेच माझ्या धाग्यांच्या संख्येत एकाची भर तरी ती लहरी असल्याने फार अपेक्षा ठेवल्या नव्हत्या.. पण आज ऑफिस मधून आल्यावर असे सरप्राईज मिळाले. एक सोडून चार चार.. आवडेल ते घ्या
अरे ए! शुंभासारखा तिला बघत काय उभा राहिलायस? असा पुढे ये आणि समोर नजरेला नजर देऊन बोल घडाघडा.
छे! पालथ्या घडावर पाणी आहे
आज दोन महिने झाले तालीम करतोय ना आपण? प्रयोग चार दिवसांवर आलाय आणि तरी एकेकाची ही तऱ्हा. तुम्हा पोरांची नाटकं बसवणं म्हणजे माझ्याच संयमाची परिक्षा आहे.
ओरडून ओरडून माझा घसा दुखला आणि प्रॉंप्टिंग करुन या वामन्याच नरडं सुजलं तरी सुधारणा नाही.
अंत: अस्ति प्रारंभ: - 3 - {संयम} - {SharmilaR }
मुळात ती शांत प्रवृत्तीची!
लेकरांना अंगा खांद्यावर खेळवणारी ती. तिच्याजवळ चार घटका निवांत बसलेल्या जीवांना शांतवणारी ती. माहेरवाशीणीचं गुपित ऐकणारी अन् लेकुरवाळीची आसवं स्वत:त रिचवणारी ती.. कुशीत आलेल्याचं तन-मन निर्मळ करणारी ती..
पण.. पण.. ज्यांना तिने आंघोळी घातल्या, त्यांनीच तिला मलिन केलं. ज्यांचा ती विसावा होती, त्याच लोकांनी तिला गृहीत धरलं.. आक्रसून तिने जगायचं कसं..? जायचं तरी कुठे?
“माझा जरा छान फोटो काढून दे ना”
“जसा आहे तसाच येणार ना?”
“टोमणे मारण्यापेक्षा फोटो काढ”
“बरं! हा घे काढला”
“ईss किती जाड आलेय यात. परत काढ”
“बरं!”
“अरे हे काय? पोट विचित्र दिसतय यात.”
“आता बघ!”
“श्शी! बाई तुला नीट काढताच येत नाही फोटो. हा असा फोटो लावू मी डिपीला?”
“मग तुझा तू काढ ना सेल्फी”
“होsत्तर! सगळं मीच करते आता. घर आवरते, तुमची गिळायची सोय करते. नातेवाईकांनाही एंटरटेन मीच करते. तू फक्त मीम्स धाग्यावर पडीक रहा wfh च्या नावाखाली.”
खरं तर लिहिणे हा माझा प्रांत नाही. पण हा विषयच इतका मोहक वाटला की म्हटलं, आता लिहूनच टाकूया. तसं म्हटलं तर हे लेखन १००% नवीन नाही, पण विषयाला अनुरूप आहे म्हणून परत या लेखात लिहितोच. कुणी सांगावे, जर कुणाला याचा उपयोग झाला तर आनंदच होईल.
माझे वडील गेले अनेक वर्षे तंबाखू खात असत, पण मला ते कधीच आवडले नाही. त्यामुळे तंबाखू चघळायचे प्रकार मी कधीच केले नाहीत म्हणजे पान, तंबाखू-चुना, गुटखा, पानमसाला वगैरे.