बनुताई, इरा आणि 'हडिप्पा'
काही दिवसांपूर्वी मित्रवर्य श्री. प्रकाश काळेल यांना कन्यारत्नाची प्राप्ती झाल्याचे समजले आणि त्याच सुमारास त्यांनी काढलेले 'Father and Daughter' हे अप्रतिम स्केचही बघायला मिळाले. त्या दिवसापासून ही कविता मनात घोळायला लागली होती. नंतर बनुताईंकडून 'इरा'ला दसर्याची भेट म्हणून मी ही प्रकाशना पाठवली. आज त्यांच्या अनुमतीने येथे तुम्हाला वाचायला देत आहे. तुम्हालाही आवडेल अशी आशा आहे.
मॉलमध्धे काय झाली गम्मत, आजोबा, माइताय का?
अहो आम्हाला भेट्लं तिथं कोण ओळखा?…प्रकाशकाका !!
काकांच्या पोटावर बांधलेली कांगारूची पोटली
पोटलित होती एक छान अन गुटगुटीतशी गठली