बालकविता

आणखी काही नर्सरी र्‍हाईम्स

Submitted by एम.कर्णिक on 9 May, 2009 - 10:27

१. (Twinkle twinkle little star , how I wonder what you are
Up above the world so high, like a diamond in the sky)
चम्मक चम्मक चांदणी,
तू दिसतेस माहिताय कशी?
आभाळाच्या खाणीमधला
लख लख हिराच जशी

२. (Humpty dumpty sat on a wall, humpty dumpty had a great fall
All the king's horses and all the king's men, couldn't put humpty dumpty together again)
गोल-मटोल मिस्टर गोळे बसले फळीवर

गुलमोहर: 

पोपटदादा....

Submitted by satish_choudhari on 6 May, 2009 - 02:58

पोपटदादा ....पोपटदादा
सांग ना कुणाची गाणी
गाशील आता...
म्हणशील मिठ्ठू पडो पडो
कि म्हणशील बिट्टु पळो पळो
हं पळायला लावशील आम्हा
अन् खाशील आंबट आंबा...

कवि - सतिश चौधरी

गुलमोहर: 

नर्सरी र्‍हाइम्स - मराठी

Submitted by एम.कर्णिक on 28 April, 2009 - 03:38

काही परिचयाच्या नर्सरी र्‍हाइम्स् चे हे स्वैर मराठीकरण मुलांना आणि तुम्हालाही आवडेल असे वाटते

१ (Jack and Jill)
श्याम आणि सुधा टेकडीवर गेली
पाण्यासाठी बादली नवीकोरी नेली
श्याम पडला घसरून पाय मुरगळुन
सुधा त्याच्यापाठोपाठ गडगडत आली

गुलमोहर: 

स्वप्नात.....

Submitted by स्मिता द on 20 April, 2009 - 02:22

स्वप्नात.....

काल मी स्वप्नात
परीच्या राज्यात गेले
छान छान झाडे
अन उंच उंच झोके
फुलांचे गालीचे
फळांचे घरटे
रंगीबेरंगी फुलपाखरे
पक्षांचे घोळके
हात फैलावुन उडायचे
पायी नाही चालायचे
आईस्क्रिमच्या तळ्यात

गुलमोहर: 

हसरी बाळे

Submitted by jyo_patil25 on 11 April, 2009 - 13:39

चिऊ उडाली भुर्रदिशी
बाळी हसली खुदकशी
काऊ वेचते अन्नकण
बाळ हसते खुदकण
गाय ही चाटते वासरा
बाळ हा दिसतॉ हासरा
झाडावरी फूल फुलते
बाळी माझी गाली हसते

गुलमोहर: 

सुट्टीत या....

Submitted by स्मिता द on 9 April, 2009 - 00:16

सुट्टीत या....

सुट्टीत या..
चांदोमामाच्या गावाला मला जायच आहे
चांदण्यांशी झिम्मा खेळायचा आहे
सोनेरी कडांच्या ढगावर नाचायच आहे
छान छान आकाराचे ढग दिसतात कसे
सावरी सारखे मऊ मऊ लागतात कसे
गावाला त्यांच्या पण मला जायचं आहे

गुलमोहर: 

बॅट आणि बॉल

Submitted by एम.कर्णिक on 1 April, 2009 - 12:01

एक होती बॅट आणि एक होता बॉल
बॅटकडे बघत म्हणाला "हाय् यू क्यूट डॉल"

"येईन तुझ्याकडे तेव्हा देईन तुला किस्"
बॅटने फिरवले तोंड आणि केले त्याला मिस्

विकेटसना मिळाला चान्स त्यानी जवळ त्याला ओढले

गुलमोहर: 

एक बब्बगित

Submitted by सत्यजित on 30 March, 2009 - 15:07

एक मणी दोन मणी
मण्यांवरती ओवले मणी

मण्यांची झाली माळ
चिउला झालं बाळ

माळ दिली बाळाला
चोर घेउन पळाला

मग आले पोलिस
चोर लपला खोलित

खोली मध्ये नव्हतं कोणी
खोली मध्ये होती गोणी

गोणी मध्ये होतं झुरळं
चड्डी मध्ये शिरलं सरळं

गुलमोहर: 

काकांचे गोष्ट सांगणे

Submitted by एम.कर्णिक on 30 March, 2009 - 14:25

काका बसतात सांगायला गोष्ट
विसरतात बंद करायला पोष्ट

काका अहो काका ऽऽ
पोष्ट आहे उघडे खाली बघा जरा
नि चिमणीच्या गोष्टीची सुरूवात करा

एक होती ?? चिमणी ऽऽ
ती गेली जेवायला कावळयाच्या घरांत

गुलमोहर: 

बगळा

Submitted by एम.कर्णिक on 30 March, 2009 - 14:01

डोळयाने तिरळा होता एक बगळा
उंच उंच पाय अन् लांबलचक गळा

एकदा दिला कोणीतरी शर्टपीस निळा
‘शर्ट शीव’ बजावून चारचारदा त्याला

मशीनवर बसलेला शिंपी होता नेक
काळया काळया पाठीचा खेकडा एक

म्हणाला ‘शिवीन फर्स्ट क्लास बिनकॉलरचा शर्ट

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - बालकविता