आम्ही लहान असताना काही ग्रामीण कोडी आजी आजोबा घालत असत त्याची आठवण आली म्हणून तुमच्यासाठी काही लिहित आहे, तुम्हाला देखील काही माहित असतील तर इथे लिहा सोड्वायला खूप मज्जा येते.
कान असून बहिरा :
लाल पालखी हिरवा दांडा, आत बसल्या बोड्क्या रांडा
डोळे असून आंधळा
छोटे छोटे ससे कसे
टकमक इंद्रधनू बघती -
बघता बघता कोपऱ्यात ते
रुसुनी मुकाट का बसती !
चुन्यात बुडुनी आलो वाटे,
लाल ना कुणी दिसे निळे -
रंग कुणाचे ना नारंगी
कुणीच ना काळे पिवळे !
एक छडी जादूची घेऊन
तिथेच जादुगार आला -
'हिरमुसलेले तुम्ही दिसता
कोपऱ्यात ह्या का बसला ?'
'आम्ही सारे असे पांढरे -
रंगित नाही, शुभ्र कसे ?'
- एकमुखाने वदले सारे
जादुगार तो मनीं हसे !
मूठ उघडुनी जादुगार तो
रंगित चकती दावितसे
भरभर जादूच्याच छडीने
रंगित चकती फिरवितसे -
फक्त पांढरा रंगच दिसला-
gadreshubhada@gmail.com
चतुर चिंगी आणि टारगट टिंगी
मधाचे पोळं होतं. त्या पोळ्याच्या आत अनेक षट्कोनी खोल्या होत्या. त्यातल्या बर्याच खोल्यात राणी मधमाशीने अंडी घातली होती. एका खोलीत पिटुकल्या बेबी मधमाश्या होत्या. त्यातल्या दोघीजणी एकमेकींशी बोलण्यात इतक्या रंगल्या होत्या की राणीमाशी त्या खोलीत आलेलीही त्यांना कळले नाही. बाकीच्या बेबीमाश्या मात्र राणीमाशीला पाहिल्यावर एकदम गप्प झाल्या.
मनीमाऊ मनीमाऊ दूध कुणी पिलं
मी नाही पिल ते तर भूभू ने नेल
भूभूदादा भूभूदादा दूध कुणी पिलं
मी नाही पिल ते तर काऊ ने नेल
काव काव कावळ्या दूध कुणी पिलं
मी कशाला पिऊ ते तर चिऊ ने नेलं
चिऊताई चिऊतताई दूध कुणी पिलं
मी नाही पिल ते माऊकडे पाहिलं
खर सांग मनीमाऊ दूध कुणी पिल
मारु नका मीच गुपचूप डोळे झाकून पिलं
- किरणकुमार
हळू टाक पाऊले
नको वाजवू कडीही
शांत निश्चिंत
निजली आहे परीराणी
खेळ खेळूनी दमली
चिऊ काऊ बाहुल्यांशी
खळी गालावर खोल
मम मनीही ठसली
आता निजेतही
कोण हसविते हिला
निद्र!राणीलाही काय
भुरळ पडली
दीसभर ठआइ ठआइ
हास्यकल्लोळ मांडला
घरभर विखुरल्या
आनंदाच्या खुणा
धरी आईचा पदर
बाबा घोडा घोडा करी
आजी आजोबांची होई
मुकया पाप्यान्नी चंगळ
खेळ खेळूनी दमलि
गोड माझी सोनुकली
दृष्ट लागो न बाई
तीट गालाला लावली
परीने विचारले, पिंकीच्या कानात -
' यायचं का तुला आंब्याच्या वनात ?
मोराचा पिसारा छान पहायला
मोरासंगे खूप खूप नाचायला ! '
पिंकी परीसंगे गेली पटकन
''पनिशमेन्ट! आता तुला नाऽऽ पनिशमेन्टच मिळणार!!'' आर्या चित्कारली. तिच्या आवाजात विजयाची झाक होती.
''पण मी काहीच केलं नाही!'' हर्षचा स्वर जरा रडवेला वाटत होता.
'' नो, नो.... तूच तर माझा हेअरबॅन्ड वाकवत होतास... मी म्हटलं होतं तुला तो मोडेल म्हणून...''
''ए, मी काय तो जास्त नाही वाकवला...''
''पण मोडला बघ हेअरबॅन्ड.... आता तुला पनिशमेन्ट!!''
आजी आतल्या खोलीतून वर्तमानपत्र वाचता वाचता आपल्या दोन्ही नातवंडांचे संवाद ऐकत होती.
हानाको आणि अकिको या दोघी अगदी जीवाभावाच्या मैत्रिणी. रांगत्या असल्यापासून एकत्र खेळायच्या. एकमेकींच्या अंगणात मस्ती करायच्या. एकत्र खाऊ खायच्या, नाचायच्या. आणि पुढे एकत्र शाळेत जाऊन अभ्यासही एकत्र करायच्या. शाळेत तर त्यांना बहिणी बहिणीच समजत इतक्या त्या बरोबर असायच्या.
(डिस्क्लेमरः ज्यांची मुले अगदी लहान आहेत आणि रोज रात्री आSSई गोष्ट असा तगादा लावतात त्यांनीच वाचण्याचे धाडस करावे :P)
चिंटू पिंटूला नेहमीच बाहेरच्या जगात डोकवून बघायचा मोह होत असतो. सध्या त्याच्या अजेंडावर सानुचं अभ्यासाचं टेबल असतं. पण आई कध्धी कध्धीच त्यांना बाहेर पाठवत नसते. काय तर म्हणे ही माणसं तुम्हाला काठीने धोपटतील नाहीतर काहीतरी खायला देऊन मारुन टाकतील.
"ह्या काहीतरीच बॉ आईचे एकेक तर्क..." चिंटू पिंटूला म्हणतो आणि पिंटूही त्याचीच री ओढतो.
"चिंटूऽऽ आज जायचं का रे आपण तिथे?"
"नऽको रे बाबा, आज आई बाबा दोघपण आहेत घरी. दोघे मिळून ठोकतील आपल्याला"
"उद्या जाऊयात?"
एक होतं गाव.तिथे चार पाच शहाण्या आणी खुळ्या मुलांचं एक टोळकं रहायचं.सुट्टी असली कि एकत्र जमून मस्ती करायला त्यानाही फार आवडायचं. पण ....! त्यांचे आई बाबा खूप खुप बिझी असायचे मग ते एकत्र जमायचे नाहीत तितके..मुलं मग दुखी कष्टी व्हायची.मग एक दिवस त्यांच्या स्वप्नात एक परी आली.गोड गोजिरी परी म्हणाली,"अरे वेड्यानो असं नाही उदास व्हायचं,चुपचाप नाही बसायचं! हसा,उड्या मारा,मस्त गाणी म्हणा,नाचा...भरपूर.!"