मुलं आणी आयांचा नाच!

Submitted by नोरा on 4 February, 2011 - 01:19

एक होतं गाव.तिथे चार पाच शहाण्या आणी खुळ्या मुलांचं एक टोळकं रहायचं.सुट्टी असली कि एकत्र जमून मस्ती करायला त्यानाही फार आवडायचं. पण ....! त्यांचे आई बाबा खूप खुप बिझी असायचे मग ते एकत्र जमायचे नाहीत तितके..मुलं मग दुखी कष्टी व्हायची.मग एक दिवस त्यांच्या स्वप्नात एक परी आली.गोड गोजिरी परी म्हणाली,"अरे वेड्यानो असं नाही उदास व्हायचं,चुपचाप नाही बसायचं! हसा,उड्या मारा,मस्त गाणी म्हणा,नाचा...भरपूर.!"

मुलं उठ्ली.आपापल्या आई बाबाना आपलं स्वप्न सांगू लागली.आई म्हणाली,"अगदी बरोबर!आपल्या गावात ना नाचाच्या स्पर्धा होणारेत.तुम्ही जर सगळे मिळून भाग घ्याल तर आपण रोज प्रॅक्टीस करू,मग रोज थोडं खेळता येईल."

मग मुलं,हसली,चिव चिवायला लागली. त्यांना आवडणार्या गाण्यावर नाचू लागली.कित्ती मराठी शब्द कळले.गाण्यातला बिट कसा पकडायचा,एक मेकाना कसे सांभाळून घ्यायचे ,न कंटाळता कशी मेहनत घ्यायची ते कळले.आणी मुख्य म्हणजे खुप खूप एकत्र खेळायला मिळाले. परीने सांगितलेले सर्व खरे झाले.!

आया मात्र दमून जायच्या.रोज चा जॉब,स्वयपाक्,मुलांचे अभ्यास्,मुलांच्याच इतर अॅक्टीविटीज- सगळे करता करता पुन्हा नाचाची प्रॅक्टीस! खुपच धांदल उडायची ! मग आयांच्या स्वप्नात भूत यायचे,"उद्याचा डबा,ग्रो सरी,बिल भरणे,ऑफिसच्या कपड्यांचि इस्त्री हे न ते..दाखवत रहायचे!"

पण लवकरच स्पर्धेचा दिवस उघडला.आता आपण स्टेजवर नाच करणार या कल्पनेनं सगळी मुले खूप खूष झाली.मुलींनी आईचे लिप्स्टीक लावायला मिळ्णार म्हणून आनंदाने आपल्या केजी च्या व ई.दुसरीच्या वर्गात साखर वाटली.मुले स्टेजवर 'ठीकठाक' वागतील का?विशेषतः बॉईज!- असा विचार करून आयांना एंग्झायटी वाटू लागली..

आणी अखेर्,मुले स्टेजवर आली..त्यानी पाहिलं,किंवा त्यानी नाच केला आणी जिंकलं..!(म्हणजे तसं त्यांच्या आई बाबाना वाट्लं!) टाळ्या घेतल्या! आपापल्या आई वडिलांचा जीव भांड्यात पाडला. त्यांना आणी त्यांच्या आई वडिलांना उत्तेजन म्हणुन चक्की चीजचं कूपन मिळालं,तब्बल ४० डॉलरच! परीनं सांगितलेली गोष्ट तर अगदी खरी झाली सगळे मिळून चक्की चिज मध्ये धमाल केली!

आई बाबा मात्र हुश्श,हुश्श करीत होते.का ते परिलाच माहित! मुलाना काय माहित?

गुलमोहर: