स्वप्नात.....

Submitted by स्मिता द on 20 April, 2009 - 02:22

स्वप्नात.....

काल मी स्वप्नात
परीच्या राज्यात गेले
छान छान झाडे
अन उंच उंच झोके
फुलांचे गालीचे
फळांचे घरटे
रंगीबेरंगी फुलपाखरे
पक्षांचे घोळके
हात फैलावुन उडायचे
पायी नाही चालायचे
आईस्क्रिमच्या तळ्यात
केकच्या होड्या
फिरता फिरता मधेच
खाल्ल्या थोड्या थोडया
कोण्णी कोण्णी तेथे रागावले नाही
इकडे नका जाऊ तिकडे नका जाऊ
म्हणाले नाही
चमचमत्या पोषाखात
पर्‍या भारी छान
खेळतात मस्त मस्त
धमाल आणतात जाम
शाळा नाही, अभ्यास नाही
नुसते खेळा फक्त
खेळ असा रंगात आला
आईचा आवाज कानी आला
उठा आता...झोप झाली जास्त
जायचय शाळेत अन
अभ्यास करायचा फस्त...

गुलमोहर: 

छान आहे पर्‍यांचे राज्य.
..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..