काकांचे गोष्ट सांगणे

Submitted by एम.कर्णिक on 30 March, 2009 - 14:25

काका बसतात सांगायला गोष्ट
विसरतात बंद करायला पोष्ट

काका अहो काका ऽऽ
पोष्ट आहे उघडे खाली बघा जरा
नि चिमणीच्या गोष्टीची सुरूवात करा

एक होती ?? चिमणी ऽऽ
ती गेली जेवायला कावळयाच्या घरांत
कावळिणबार्इने केला होता मसालेभात

जेव ऽ जेव ?? जेवली ऽऽ
पोटभर प्याली सोलाची कढी
तोंडी लावून अळूची वडी

कावळयाने आणले ??
गुलकंद वाले पानाचे विडे
पण चिमणीने फोडली सुपारीची खांडे

ओ ऽऽ काका, काय तरी काय सांगताय ??
फेकू नका बंडल मारू नका बात
चिमणीच्या तोंडात कधी दात असतात ?

गुलमोहर: