बालकविता

माझी छकुली

Submitted by Suryakant Majalkar on 17 August, 2009 - 08:54

ईवले ईवले डोळे तुझे
ईवले ईवले कान
हो-हो म्हणते, ना-ना म्हणते,
डोलवित आपली मान

हम्मा हवी, तुतू हवा
हवी हिला माऊ
बोट दाखवी दाराकडे
सांगी बाहेर जाऊ

चॉकलेट नको , गोळी नको
नको हिला बिस्किट
कुरकुरे , लेर्यस मात्र
खाते डोळे मिचकावीत

गुलमोहर: 

बनूताईंचा भाऊ

Submitted by एम.कर्णिक on 17 August, 2009 - 03:35

बनूताईंना हवाय आता एक छोटा भाऊ
आईला म्हणतात "आण, त्याचं नाव बंटी ठेऊ.

डोके त्याचे छान चेंडूसारखे दिसावे;
गाल कसे माझ्यापेक्षा गुब्बु असावे;

आई, त्याचे डोळे जरा पिचके असू देत;
जांभई देताना दात नको दिसू देत;

ट्यांहा ट्यांहा भाषेमधे माझ्याशी बोलेल;
काय हवे त्याला मला नक्की समजेल;

हाताशी मी बोट नेता पटकन् पकडू दे;
दोन्ही मुठी तोंडाजवळ घेऊन झोपू दे.

मऊ मऊ दुपट्यात त्याला छान गुंडाळून
देशिल ना ग मांडीवर माझ्या तू ठेऊन?

तुझ्या ओरडण्याने जर जागा होईल बाई
’धुम मचा ले’ गाऊन त्याला करवीन गाईगाई"

गुलमोहर: 

गणपती बाप्पा

Submitted by स्मितागद्रे on 16 August, 2009 - 03:45

बाप्पा तुम्ही यंदा प्लीज लवकर याल का जरा ?
का म्हणून विचारताय ? खाली येऊन तर बघा

यंदा तुमच्या येण्याची काहीच तयारी नाही
मांडव नाही, देखावे नाही, कुठेच गर्दी नाही

सगळी कडे सामसुम, सगळी कडे शुकशुकाट
शाळा बंद, क्लास बंद, फक्त स्वाइन फ्ल्यु सुटलाय मोकाट

दही हंडी, झेंडावंदन, यंदा काहीच झालं नाही
फडकी बांधुन तोंडाला, धड श्वासही घेता येत नाही

घरात नुसत बसुन बसुन खुप आलाय कंटाळा
आठवडाभर आधी येऊन घालाल का ह्याला आळा ?

बघा आता तुमच्यावर सोपवते हे मोठ्ठ् अवघड टास्क
घाबरु नका, तुमच्यासाठीही आणलाय चांदीचा एक मास्क

मग बाप्पा प्लीज ,येताय ना आठवडाभर आधी ?

गुलमोहर: 

पुन्हा एकदा बनूताई

Submitted by एम.कर्णिक on 12 August, 2009 - 03:08

बनूताईंच्या निळ्या फ्रॉकला छान छान लेस
पिवळ्या रिबिनीत बांधले सोनेरी केस

गोर्‍या गोर्‍या पायांसाठी गुढग्यापर्यंत स्टॉकिंग
'पिक् पॉक्' बूट वाजवत करतात त्या वॉकिंग

एका हातात बाबांचे अन दुसर्‍यात आइचे बोट...
...धरून चालतात दुडक्या, मिरवत लालगुलाबी ओठ

फुलपाखरू जर दिसले तर मधेच थप्प्कन थांबतात
हात सोडून त्याच्या मागे पकडायला धावतात

लब्बाड फुलपाखरू जाते कुठल्याकुठे उडून
"द्या ना बाबा पकडुन" म्हणत बनुताई बसतात अडून

बाबाना कसलं पळायला येतंय? 'हाफ..हुफ..' करतात
"नाही सापडत मला, बेटा" म्हणत मागे वळतात

बनूताईंच्या गालाचे मग होतात हुप्प फुगे
डोळे येतात डबडबून जर आई भरली रागे

गुलमोहर: 

नक्को चे गाणे

Submitted by poojadiwan on 8 August, 2009 - 09:12

दूध नक्को आई मला
हवा खूप चहा
फुला फुलांच्या कपबशीतुन
पाजव तूच मला

तूप्-साखर नक्को मला
हवी थोडी चटणी
लोणच्याच्या फोडीत पण दे
माझी माझी वाटणी

मोठ्ठी सायकल नक्को मला
स्कूटीच दे घेउन
पाय पुरत नसले तरी
ऐटीत जाइन बसुन

सारखी शाळा नक्को आई
मधून मारू बुट्टी
माझ्याशी खेळ नाहितर
करिन बघ कट्टी

रात्री बाबा नक्को आई
मिशी त्यांची टोचते
तुझ्या कुशित कश्शी मला
छान झोप लागते

गुलमोहर: 

रविवार

Submitted by sanika11 on 30 July, 2009 - 12:34

नको क्लास, नको त्रास, देऊ अभ्यासाला बुट्टी,
नाचू, बागडू,मजा करू, आज रविवारची सुट्टी

बाबासंगे अंघोळ करू,
फेस शाम्पूचा हाती धरू,
जमवू आज घरी आनंदाची भट्टी,
नाचू, बागडू,मजा करू, आज रविवारची सुट्टी,
आज रविवारची सुट्टी.

गुलमोहर: 

जेरी

Submitted by sanika11 on 29 July, 2009 - 02:03

बालकविता(?) लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न. मी माझ्या मुलीसोबत रोज ही सिरीयल लहान होऊन बघतो. मला ती सिरीयल फार आवडते..त्यातूनच ह्या ओळी लिहाव्या असे वाटले.
बरं, TOM हा शब्द माबो वर कसा टाईप करायचा...?

पिटुकले कान, पिटुकली माझी ढेरी

गुलमोहर: 

ए आई, सांग ना SSSSS, कधी येइल बाबा घरा ?

Submitted by विशाल कुलकर्णी on 27 July, 2009 - 05:30

ए आई, सांग ना SSSSS, कधी येइल बाबा घरा ?
ए आई......,सांग ना SSSSS!

आता गोष्ट नको आम्हाला,
गाण्यातला रस संपला!
लुटुपुटीच्या भातुकलीचा,
आला खुप खुप कंटाळा SSSS!
ए आई, सांग ना SSSSS, कधी येइल बाबा घरा ?

नकोच आई मजला,
चॉकलेटचा तो बंगला !
अन बर्फीची ती झाडे,

गुलमोहर: 

प्राण्यांचं सा रे ग म

Submitted by सत्यजित on 26 July, 2009 - 14:53

एकदा जंगलात प्राण्यांनी ठेवलं सा रे ग म
गाणी गात बसले सगळे सोडुन आपली कामं

पहीला राउंड होता पाळीव प्राण्यांचा
मनीला दिला चान्स पहिला गाण्याचा
मनी गायली मन लाउन म्यॅवं म्यॅवं म्यॅवं...
जज म्हणाले बंद करा हीची ट्यॅंव ट्यॅवं...

गुलमोहर: 

फुगे

Submitted by shrishrikant on 7 July, 2009 - 09:12

निळे हिरवे लाल पांढरे
फुगे गुलाबी दूर चालले
निळ्या सावळ्या मेघांमधूनी
घेत भरार्‍या पुढे चालले

बालीचा हा फुगा निराळा
छपरावरचा जसा भोपळा
शिल्पाचा हा फुगा पिटुकला
बाजारातील जसा आवळा

शंभर फुगे छपरावरती
घेउनी मुले खेळत होती

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - बालकविता