Submitted by एम.कर्णिक on 17 August, 2009 - 03:35
बनूताईंना हवाय आता एक छोटा भाऊ
आईला म्हणतात "आण, त्याचं नाव बंटी ठेऊ.
डोके त्याचे छान चेंडूसारखे दिसावे;
गाल कसे माझ्यापेक्षा गुब्बु असावे;
आई, त्याचे डोळे जरा पिचके असू देत;
जांभई देताना दात नको दिसू देत;
ट्यांहा ट्यांहा भाषेमधे माझ्याशी बोलेल;
काय हवे त्याला मला नक्की समजेल;
हाताशी मी बोट नेता पटकन् पकडू दे;
दोन्ही मुठी तोंडाजवळ घेऊन झोपू दे.
मऊ मऊ दुपट्यात त्याला छान गुंडाळून
देशिल ना ग मांडीवर माझ्या तू ठेऊन?
तुझ्या ओरडण्याने जर जागा होईल बाई
’धुम मचा ले’ गाऊन त्याला करवीन गाईगाई"
(’धूम मचाले, धूम मचाले, धूम’ हे बनूताईंचे फार आवडते गाणे आहे आणि ते त्या आवाज टिपेला नेऊन गातात.)
-मुकुंद कर्णिक
गुलमोहर:
शेअर करा
बनुताई ---’धुम मचा ले'
बनुताई ---’धुम मचा ले'
मस्त आहे हे पण , पण आमच्या
मस्त आहे हे पण :), पण आमच्या बनुताईंना वाचुन दाखवायची सोय नाही
आमच्याकडे पण तोच फतवा निघालाय
आमच्याकडे पण तोच फतवा निघालाय बनुदादांकडून.
(No subject)
बनुताईंनी डिक्टेट
बनुताईंनी डिक्टेट केल्याप्रमाणे:-
सूर्यकांतकाका, छकुलीला घेऊन या मग हम सब मिलें और धूम मचा लें.
कविताआत्या, चान्स घ्या .... तुमच्या बनुताईला वाचून दाखवायचा.
अमितमामा, फतवा कपाळाला लावून तो काढणार्या बनुदादाला कुर्निसात करा आणि फतव्याची तामीली करा.
चिन्नूमावशी, बंटीचं डोकं असंच दिसेल का हो? छानाय.
मस्त आहे
मस्त आहे