ए आई, सांग ना SSSSS, कधी येइल बाबा घरा ?
ए आई......,सांग ना SSSSS!
आता गोष्ट नको आम्हाला,
गाण्यातला रस संपला!
लुटुपुटीच्या भातुकलीचा,
आला खुप खुप कंटाळा SSSS!
ए आई, सांग ना SSSSS, कधी येइल बाबा घरा ?
नकोच आई मजला,
चॉकलेटचा तो बंगला !
अन बर्फीची ती झाडे,
इथे आहेत, हवी SSSS कुणाला?
ए आई, सांग ना SSSSS, कधी येइल बाबा घरा ?
राजपुत्र अन परीराणीच्या,
गोष्टींचा स्टॉकही संपला !
टॉम अँड जेरी, पापायनेही,
बघ जीव; आमचा SSS उबला !
ए आई, सांग नाSSSSS, कधी येइल बाबा घरा ?
चिवचिव करती चिमणपिले,
चोचीतच घास राहीला !
असेल का गं गेला ?
त्यांचाही बाबा टूरSSS ला?
ए आई, सांग नाSSSSS, कधी येइल बाबा घरा ?
बघ चांदोबा तो रुसला,
चांदण्याही..., बघ धुसफुसल्या !
अंगाई नच रुचे आम्हाला,
आम्हा हवाय बाबा......, थोपटायलाSSSSS !
ए आई, सांग नाSSSSS, कधी येइल बाबा घरा ?
मंडळी बालकविता लिहीण्याचा माझा पहिलाच प्रयत्न आहे, सांभाळुन घ्या. काल "आयुष्यावर बोलु काही" पाहीले आणि राहवले नाही. माझ्या कवितेतील शैली, दर्जा तेवढा उच्च नसेल पण भावना तेवढीच उत्कट आहे. तेव्हा सांभाळुन घ्या.
विशाल.
मला
मला वाटलेलच "आबोका" चा फीव्हर असणार हा
. तरी छान जमलीय पहिलाच प्रयत्न असला तरी ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
-------------------------
गली गली मे फ़िरते है, कई ठोकरें खाते है
जब तुनेही ठुकराया हमे, अब हमको अपनाये कौन?
सही आहे.
सही आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
विश सही रे
विश सही रे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भा.पो एकदम
विशाल , छान
विशाल , छान जमलाय पहिला प्रयत्न , खरच मुलीचा आईपेक्षा वडिलांवर जास्त जीव असतो
****************************************
सर्व मंगलमांगल्ये शिवे सर्वाथ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते
छान आहे रे
छान आहे रे कविता ! पहिला प्रयत्न आहे असं वाटत नाही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मने अगं
मने अगं बालकवितेचा पहिला प्रयत्न आहे. तशा कविता बर्याच पाडल्यात आम्ही! माबोकर साक्ष आहेतच की !![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
***********************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे!
विशल्या
विशल्या थेट ४-५ वर्ष पुढच दिसत होय तुला थेट २०१२-१३ चा तुझ्या घरातला काळ सांगुन राह्यलायस तो ;). छान आहे
भा.पो. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कवे इतक्या
कवे इतक्या लांब?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
तुला काय माहित? ज्यू. ची तयारी सुरू असेल एकिकडे, म्हणून सुद्धा सुचत असतील बालकविता..
असो, भावा, कविता बरी जमलिये,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
----------------------------------------
माणसात राहून एकटं पडण्यापेक्षा,
एकटं राहून; एकटं पडण्यात यातना कमी असतात.
----------------------------------------
दक्स, मी
दक्स, मी बरोबर लिहीलय ४-५ वर्ष म्हणुन. बाळ झाल्या झाल्या बोलायला लागणारे का? येत्या वर्षभरात झाल अस गृहित धरुनच मी ४-५ वर्ष लिहीतेय. म्हणजे सि. केजी तरी असेल बाळ अस काही बोलण सुचायला![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मस्त रे
मस्त रे भावा....
ए आई, सांग ना SSSSS, कधी येइल बाबा घरा ?
मला दु:खी कविता वाटत होती. पण तसं काही नाहीय म्हंटल्यावर हायसं वाटलं...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
तुला काय माहित? ज्यू. ची तयारी सुरू असेल एकिकडे, म्हणून सुद्धा सुचत असतील बालकविता..
दक्स...
ए विशाल, सांग ना$$$$$$, कधी येईल बाळ घरा ?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
------------------------------------------------------
आठवणींच्या मागे धावलो कि माझं असंच होतं.
आठवणीं वेचत जाताना, परतायचं राहुन जातं.
पहिला
पहिला प्रयत्न आहे असं वाटत नाही.
याचा अर्थ तुझ्या बर्याच कविता तिला "बाल्"कविता वाटत असाव्यात![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाकी बरी जमली आहे रे !
******************
जमुना तु ही है, तु ही मेरी मोहीनी !
बाबा, जा रे
बाबा, जा रे घरी लवकर. ईकडे तिकडे उंडारत बसू नकोस. लेकरं वाट बघत्याती.
मस्त रे विशाल. आमच्या पण 'बाल' बुद्धीला आवडली कविता.
..............................................................................
मोठा झाला दादा, मोठी झाली ताई
मोठा झाला 'बाळ', ये ना बघायला आई!
जम्या
जम्या विशाल दा.
उम्या
उम्या सिग्नेचर खास विशाल साठी का ?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
------------------------------------------------------
आठवणींच्या मागे धावलो कि माझं असंच होतं.
आठवणीं वेचत जाताना, परतायचं राहुन जातं.
>>याचा अर्थ
>>याचा अर्थ तुझ्या बर्याच कविता तिला "बाल्"कविता वाटत असाव्यात >> टवाळा![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
----------------------------------------
माणसात राहून एकटं पडण्यापेक्षा,
एकटं राहून; एकटं पडण्यात यातना कमी असतात.
----------------------------------------
टवळ्या,
टवळ्या, एवढं नको काही लगेच सौं.ची बाजु सावरुन धरायला !![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण सगळ्यांचे (यात संदीप खरे आणि सलील कुलकर्णीसुद्धा येतात) मनःपुर्वक आभार !
***********************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे!
माझी दाद
माझी दाद इथे ऐका.
विशाल खुपच
विशाल खुपच छान आहे रे कविता....:)
..................................................................................
"Ours is Essentially a Tragic age, So we refuse to live it Tragically"
मस्त रे..
मस्त रे.. आवडली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चला... तुझा
चला... तुझा पहिला प्रयत्न का असे ना मस्त आहे. अजुन येउ देत..:)