Submitted by sanika11 on 30 July, 2009 - 12:34
नको क्लास, नको त्रास, देऊ अभ्यासाला बुट्टी,
नाचू, बागडू,मजा करू, आज रविवारची सुट्टी
बाबासंगे अंघोळ करू,
फेस शाम्पूचा हाती धरू,
जमवू आज घरी आनंदाची भट्टी,
नाचू, बागडू,मजा करू, आज रविवारची सुट्टी,
आज रविवारची सुट्टी.
आईमागे उगाच धावू,
गडबडगोंधळ करून पाहू,
दणाणून टाकू, गाऊनी वरची पट्टी,
नाचू, बागडू,मजा करू, आज रविवारची सुट्टी,
आज रविवारची सुट्टी.
आजी-आजोबांना हसवू,
ताई-दादाला कधी फसवू,
कट्टी, करू कधी त्यांच्याशी गट्टी,
नाचू, बागडू,मजा करू, आज रविवारची सुट्टी,
आज रविवारची सुट्टी.
गुलमोहर:
शेअर करा
मस्तच
मस्तच सुट्टी.....
आम्ही , सुट्टी ... म्हातारी बुट्टी असं म्हणायचो.
छान आहे
छान आहे सुट्टी .
मस्त मी
मस्त मी सानुला वाचुन दाखवणार आज
कट्टी, करू कधी त्यांच्याशी गट्टी,>>> इथे थोडी लय सुटल्यासारखी वाटतेय. एखादा दोन अक्षरी शब्द घालुन जर वाक्य फेरफार करता आले तर? अस आपल माझ मत
--------------------------------------------
गेला क्षण हा काल असे, उद्या न वेड्या येत असे
नव्या उषेचे गाणे गात, आज आजची करुया बात
धन्यवाद
धन्यवाद
रविवाराय
रविवाराय धमालः
.........................................................................................................................
भेटती अनोळखी चेहरे कधी कधी
आपले जणू नवे चेहरे कधी कधी
कौतुक, धन्यवाद
कौतुक,
धन्यवाद
मस्त आहे सुट्टी !
मस्त आहे सुट्टी !
छान..सुट्टी..
छान..सुट्टी..:)
गोड आहे गं.
गोड आहे गं.
मस्तच ! मुलांबरोबर आपली पण
मस्तच ! मुलांबरोबर आपली पण सुट्टी छान गेली !
छान कविता! लहानपणीचा रविवार
छान कविता!
लहानपणीचा रविवार आठवला!!
पूजा,गणेश धन्यावाद
पूजा,गणेश
धन्यावाद
मस्त
मस्त
स्मिता, धन्यवाद
स्मिता,
धन्यवाद
रविवारची सुट्टी, पण माझ्या
रविवारची सुट्टी, पण माझ्या छकुलीचा गोधंळ वाचा