बालकविता

बाबा,तू मला नेणार ना?

Submitted by sanika11 on 25 March, 2010 - 01:11

बागेत बाबा,तू मला नेणार ना?
छकुली राणी मला म्हणणार ना?

खेळू आपण शिवणापाणी,
गाऊ दोघे धम्माल गाणी,
पाणी-पुरी मला तू देणार ना?
बागेत बाबा,तू मला नेणार ना?

खाऊ आपण गोळे रंगीत,
घालू आपण दंगा संगीत,
छानसं कानातलं तू घेणार ना?
बागेत बाबा,तू मला नेणार ना?

अभ्यास करु घेऊन पाटी,
द्या नाहीतर चापट खोटी,
गमभन पुनः शिकवणार ना?
बागेत बाबा,तू मला नेणार ना?

बाबा, तू माघारी येणार ना?
छकुली राणी मला म्हणणार ना?
देवाकडून माघारी येणार ना?
बागेत बाबा,तू मला नेणार ना?
नेणार ना? नेंणार ना?

गुलमोहर: 

स्वप्नातली रात्र

Submitted by अर्चना दंडे on 18 March, 2010 - 11:57

चिवचिव चिमणी, सर्वांची लाडकी
येते म्हणते घरात, उघडना खिडकी !

कावकाव कावळा, ओरडतो दारी
पाहुणे येतील म्हणतो आज तुमच्या घरी !

विठु विठु पोपट वाजवतो शिट्टी
दे म्हणतो पेरु नाही तर कट्टी !

काळी काळी कोकिळा, म्हणते कुहु कुहु
कावळ्याचं घर कुठे, कुठे मी राहु ?

बांधते सुन्दर घरटे, तिला म्हणती सुगरण पक्षी,
घर लटकते फांदिला, देव बाप्पा त्याला रक्षी !

गुट् र्र गुम गुट् र्र गुम कबुतराची जोडी
घर करायला हवी त्यांना अडगळीची जागा थोडी !

थुई थुई नाचे मोर फुलवतो पीसारा
घर म्हणजे त्याचे तर जंगलचा परिसर सारा !

गुलमोहर: 

थेंब

Submitted by देवनिनाद on 18 March, 2010 - 04:05

पानाची करून
घसरगुंडी
थेंबाने छान
मारली मुंसंडी

घसरत घसरत
थेंब खाली पडला
सदाफुलीला जाऊन
हलकेच बिलगला

सरकत सरकत
मातीवर पडत
थेंब तो झाला
एकदम गडप

थेंबाची पाहून गंमत सारी
थेंब दुसरा जागीच थबकला
सरकू लागता पानावरून
मनोमनी तो हबकला

- देवनिनाद

गुलमोहर: 

फुला रे फुला

Submitted by एम.कर्णिक on 4 March, 2010 - 00:41

फुला रे फुला
तुला हातांचा झुला
पंखा नाही तरी पण
वारा बघ आला

वार्‍याच्या बरोबर
डोल जरासा
आई आणि बाबांशी
बोल जरासा

"अ अ" नि "ब ब"
"ई गि ग्गि गिक्"
रडु नको सारखं
हसायला शिक

आजोबांचं पोट
घोड्याची पाठ
हो स्वार पण तरी
मान ठेव ताठ

हाताची डावली
जर्राशिच मार
चाल्वु नको पायाची
साय्कल फार

बरऽ आता जरासा
हो उपडा
दाखव उचलुन
नागाची फडा

दमला नं आता?
मऽ मांडीवर या
चिडिचुप गिडगुडुप
झोपुन जा

गुलमोहर: 

नीज नीज बाळा

Submitted by एम.कर्णिक on 1 March, 2010 - 04:59

('बाळांसाठी' आहे म्हणून ही 'बाल'कविता)

कशी येत नाही अजुनी नीज तुला बाळा
गडद रात्र झाली आता तरी पुरे चाळा ॥धृ॥

चिऊ काउ सारे सारे झोपले कधीचे
लावतोस छकुल्या तूही सूर जांभईचे
का रे तरी झोप नाही पांघरीत डोळा ॥१॥

सानुल्या फुला तू आता मीट पाकळ्या या
जरा दे विसावा अपुल्या पंख आणि पाया
आणि पाखरा ये माझ्या बिलगुनी कुशीला ॥२॥

उघड हळुच पापण्याना सकाळी सकाळी
चिमुकल्या मुखाने मजला 'अअ' साद घाली
हसुनि गोडसे बाळा तू पहा एक वेळा ॥३॥

गुलमोहर: 

वार्‍याला खाज

Submitted by sanika11 on 19 February, 2010 - 07:09

वार्‍याच्या पाठीला सुटली खाज
आंघोळ केली तरी, जाईना आज

दिसला त्याला माळावरचा आंबा
म्हणतो कसा,''वारेभाऊ, वारेभाऊ ,थोडं तुम्ही थांबा,
कधीपासून खाजते पाठ, ते तरी सांगा,
त्रासून,ओरडून करू नका आवाज"
काय सांगता राव?
वार्‍याच्या पाठीला सुटली खाज
आंघोळ केली तरी, जाईना आज

दिसली त्याला परसातली केळं
म्हणते कशी,''वारेभाऊ, वारेभाऊ, मला नाही वेळ,
तुमचा नि माझा जमेल कसा मेळ
अव्वा, ईश्श, मला वाटते लाज"
काय सांगता राव?
वार्‍याच्या पाठीला सुटली खाज
आंघोळ केली तरी, जाईना आज

दिसला त्याला मग काटेरी फणस
म्हणतो कसा," वारेभाऊ,वारेभाऊ, शेजारी बस,
रडणं थांबव,ऊगा जाईल दिवस,

गुलमोहर: 

डांग डिंग डिंगा

Submitted by एम.कर्णिक on 17 February, 2010 - 01:32

डांग डिंग डिंगा, पाणीभरला फुगा
बंटीनं केलं टुश्श, फुगा झाला फुश्श

बंटीचा आंगा ओला, म बम् बम् बोला
म बम् बम् बोला, की बम् बम् बोला ऽऽ

डांग डिंग डिंगा, बंटी आता नंगा
भुडभुडगंगा घाला नाय्तर चालू करील दंगा

मालिशवाल्या आंटीला कामं पाय्जेत प्लेंटी
म्हणुन तिला कारंज्याने भिजवी* रोज बंटी

अग अग आई, टेबल** मांड बाई
बंटीला लागली भूक त्याला लौकर दुदु देई

बंटीचे बाबा, ओ लौकर लौकर चला
नाईटड्रेस, डाय्पर नि सॉक्स त्याला घाला

आजोबा या, नि बंटीला घ्या
हातावर खांद्यावर झोपवायला न्या

बंटीबाळ आता झोपायच हं लौकर
नाय्तर दुखेल म आजोबांची कंबर

नको नको बंटी आता लावू नको भोंगा

गुलमोहर: 

बेस्ट फ्रेंड

Submitted by sanika11 on 7 February, 2010 - 11:41

शोधा पाहू, माऊ माझी कशामागे दडते
कोपर्‍यातील चेअरवरून फेल होऊन पडते

soft-soft टेल तिची सोफ्याला घासते
मिल्क नाही दिलं म्हणून रुसून बसते

small-small फिशसाठी लाडीगोडी करते
पायाभोवती माझ्या round-round मारते

टिव्हीतल्या जेरीकडे रागावून कशी बघते
eat त्याला करण्या jump करण्या निघते

मांडीत बसता-बसता, thumb माझा चाटते
स्कूलमधली ती माझी बेस्ट फ्रेंडच वाटते

गुलमोहर: 

चला शिकुया अंक दहा

Submitted by वर्षा_म on 29 January, 2010 - 01:00

मी आहे एकटा एक
बाकी सगळे अनेक

मनी माऊला डोळे दोन
हळुच बघतेय आलय कोण

पळसाला ह्या पाने तीन
शंकराला नेऊन वाहीन

घोड्याला पाय चार
मी झालेय एटीत स्वार

हाताला बोटे पाच
बोट ठेवुन शब्द वाच

फुलपाखराला पाय सहा
त्याचे सुंदर रंग पहा

इंद्रधनुष्यात रंग सात
कोकीळ बघ बसलाय गात

आजीची उलटी काठी आठ
पाढे श्लोक तिचे तोंडपाठ

गुलमोहर: 

सानुची तक्रार आणि मागणी

Submitted by कविन on 19 January, 2010 - 23:20

सकाळची थंडी;
नी अंगात बंडी

उबदार दुलईत गुडुप्प व्हाव
जादुने घड्याळच गायब कराव

वाटत फार;
वारंवार

पण घड्याळाची टिकटिक
आईची किटकिट; थांबतच नाही
मनासारख झोपता येतच नाही

उठ ना रे बाळा;
आहे तुझी शाळा

आईचा धोशा चालुच राही
मनासारख झोपता येतच नाही

नको नको उठते;
शाळेत मी जाते

बाईंना तिळगुळ द्यायचाय ना आई?
चल आटप; बस माझी जाईल ना ग आई

उद्या आहे सुट्टी;
घड्याळाला बुट्टी

उद्या मला लवकर उठवायच नाही
घड्याळाला गजर लावायचा नाही

उशिरा मी उठणार;
लोळत मी पडणार

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - बालकविता