Submitted by sanika11 on 25 March, 2010 - 01:11
बागेत बाबा,तू मला नेणार ना?
छकुली राणी मला म्हणणार ना?
खेळू आपण शिवणापाणी,
गाऊ दोघे धम्माल गाणी,
पाणी-पुरी मला तू देणार ना?
बागेत बाबा,तू मला नेणार ना?
खाऊ आपण गोळे रंगीत,
घालू आपण दंगा संगीत,
छानसं कानातलं तू घेणार ना?
बागेत बाबा,तू मला नेणार ना?
अभ्यास करु घेऊन पाटी,
द्या नाहीतर चापट खोटी,
गमभन पुनः शिकवणार ना?
बागेत बाबा,तू मला नेणार ना?
बाबा, तू माघारी येणार ना?
छकुली राणी मला म्हणणार ना?
देवाकडून माघारी येणार ना?
बागेत बाबा,तू मला नेणार ना?
नेणार ना? नेंणार ना?
गुलमोहर:
शेअर करा
आई गं! शेवट एकदम भिडला:(
आई गं! शेवट एकदम भिडला:(
शेवटच कडव वाचून पाणीच आल
शेवटच कडव वाचून पाणीच आल डोळ्यात
खरच शेवट वाचून रडूच आल.
खरच शेवट वाचून रडूच आल.
धन्यवाद.
धन्यवाद.
असलं काहीतरी डोळ्यांत पाणी
असलं काहीतरी डोळ्यांत पाणी आणणारं नको लिहू गं (याला सकारत्मक प्रतिसाद समज )
शेवट असा का केला बाय..
शेवट असा का केला बाय..
छान आहे कविता... शेवट मनाला
छान आहे कविता... शेवट मनाला भिडला. संदिप खरे आणि सलील कुलकर्णीं ची "मी पप्पांचा ढापुन फोन..." कविता आठवली.
खरंच असं का सुचलं हसता हसता
खरंच असं का सुचलं हसता हसता रडवायचं? कविता सुंदरच आहे.
खरच रडवलं.
खरच रडवलं.
कविता चांगली वाटली, शेवट
कविता चांगली वाटली, शेवट पचवायला अवघड गेला.
या कवितेच्या पहिल्या दोन ओळी
या कवितेच्या पहिल्या दोन ओळी जवळजवळ एक महिन्यापूर्वी सुचल्या होत्या.. कविता ५-६ दिवसापूर्वी जन्माला आली.
तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
चटका लावणारं ... शेवटचं कडवं
चटका लावणारं ... शेवटचं कडवं खरचं सर्वांगात थरथर आणतं ... खरचं डोळे पाणावले
देवनिनाद, धन्यवाद.
देवनिनाद,
धन्यवाद.