बाबा,तू मला नेणार ना?

Submitted by sanika11 on 25 March, 2010 - 01:11

बागेत बाबा,तू मला नेणार ना?
छकुली राणी मला म्हणणार ना?

खेळू आपण शिवणापाणी,
गाऊ दोघे धम्माल गाणी,
पाणी-पुरी मला तू देणार ना?
बागेत बाबा,तू मला नेणार ना?

खाऊ आपण गोळे रंगीत,
घालू आपण दंगा संगीत,
छानसं कानातलं तू घेणार ना?
बागेत बाबा,तू मला नेणार ना?

अभ्यास करु घेऊन पाटी,
द्या नाहीतर चापट खोटी,
गमभन पुनः शिकवणार ना?
बागेत बाबा,तू मला नेणार ना?

बाबा, तू माघारी येणार ना?
छकुली राणी मला म्हणणार ना?
देवाकडून माघारी येणार ना?
बागेत बाबा,तू मला नेणार ना?
नेणार ना? नेंणार ना?

गुलमोहर: 

छान आहे कविता... शेवट मनाला भिडला. संदिप खरे आणि सलील कुलकर्णीं ची "मी पप्पांचा ढापुन फोन..." कविता आठवली.

या कवितेच्या पहिल्या दोन ओळी जवळजवळ एक महिन्यापूर्वी सुचल्या होत्या.. कविता ५-६ दिवसापूर्वी जन्माला आली.
तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.