Submitted by sanika11 on 19 February, 2010 - 07:09
वार्याच्या पाठीला सुटली खाज
आंघोळ केली तरी, जाईना आज
दिसला त्याला माळावरचा आंबा
म्हणतो कसा,''वारेभाऊ, वारेभाऊ ,थोडं तुम्ही थांबा,
कधीपासून खाजते पाठ, ते तरी सांगा,
त्रासून,ओरडून करू नका आवाज"
काय सांगता राव?
वार्याच्या पाठीला सुटली खाज
आंघोळ केली तरी, जाईना आज
दिसली त्याला परसातली केळं
म्हणते कशी,''वारेभाऊ, वारेभाऊ, मला नाही वेळ,
तुमचा नि माझा जमेल कसा मेळ
अव्वा, ईश्श, मला वाटते लाज"
काय सांगता राव?
वार्याच्या पाठीला सुटली खाज
आंघोळ केली तरी, जाईना आज
दिसला त्याला मग काटेरी फणस
म्हणतो कसा," वारेभाऊ,वारेभाऊ, शेजारी बस,
रडणं थांबव,ऊगा जाईल दिवस,
घास मला पाठ, थोडा चहा तरी पाज
काय सांगता राव?
वार्याच्या पाठीची थांबली खाज
वार्याची स्वारी आनंदली आज.
गुलमोहर:
शेअर करा
मस्त वाटली बालकविता
मस्त वाटली बालकविता
धन्यवाद
धन्यवाद
कसली गोड , मस्त आहे
कसली गोड , मस्त आहे
मस्त .
मस्त .
सानिका, मस्त आहे तुझी कवीता!
सानिका, मस्त आहे तुझी कवीता! गार्गीला पण आवडली!
मस्त.
मस्त.
मस्त आहे कविता....
मस्त आहे कविता....
धन्यवाद मित्रांनो,
धन्यवाद मित्रांनो,
मस्त
मस्त
मत्त्त वातली ... खुफ खुफ
मत्त्त वातली ... खुफ खुफ छ्यान ...
संगीतबद्द करावं इतकी सुरेख आहे !!!
वर्षा,देवनिनाद, धन्यवाद.
वर्षा,देवनिनाद,
धन्यवाद.
मी इकडे फिरकलो नव्हतो
मी इकडे फिरकलो नव्हतो आजपर्यंत... आज आलो त्यान बर वाटल...
मस्त लिहिलीय...
माझ्या मुलीकडून गणपती
माझ्या मुलीकडून गणपती उत्सवामध्ये मी ही एक छोटी गोष्ट बसवून घेतली होती. तो एक मिमिक्री करण्याचापण प्रयत्न होता...त्या कल्पनेवर आधारीत ही कविता लिहावी वाटली.
गिरीशजी प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.
छान आहे.
छान आहे.
धन्यवाद
धन्यवाद
क्या बात है! कविता छान
क्या बात है! कविता छान जमली.
आम्हाला दुसरीत होता धडा - ’वार्याच्या पाठीला सुटली खाज’
छान आहे आवडली.
छान आहे आवडली.