बालकविता

''आजी''

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 14 August, 2010 - 03:17

एक होती आजी
चिरत होती भाजी

भाजीतून निघाली आळी
आजी होती आंधळी

आळीने घेतला चावा
आजी म्हणाली धावा

मुले आली धावून
आळी काढली पाहून

आळी फेकली लांब
आजीचे झाले काम

मुले म्हणाली ''जाऊ''?
आजीने दिला खाउ

डॉ. कैलास गायकवाड

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मोरा मोरा नाच रे (बडबडगीत)

Submitted by अभय आर्वीकर on 14 August, 2010 - 01:31

मोरा मोरा नाच रे (बडबडगीत)

मोरा मोरा नाच रे
अंकलिपी वाच रे
वाचता वाचता बोल रे
पृथ्वी कशी गोल रे

गोल चेंडू उडला
सुर्यावरती पडला
कान त्याचा कापला
म्हणून सुर्य तापला

ऊन, हवा आणि
गरम झाले पाणी
पाणी गरम झाले
वाफ़ होऊन आले

सोडूनिया धरती
वाफ़ गेली वरती
आभाळात मगं
तिचे झाले ढगं

ढग वाजे गडगड
वीज चमके कडकड
वारा सुटला सो-सो
पाऊस आला धो-धो

मोरा मोरा नाच रे
श्रावणाचा मास रे
नाचता नाचता सारा
फ़ुलवून दे पिसारा

गुलमोहर: 

चांदोमामा आणि मामी

Submitted by आशिष पवार on 10 August, 2010 - 01:06

ढगांच्या पाठी
घर आहे माझे
तुम्ही सारे म्हणती
मला चांदोमामा.................

रुसली तुमची मामी
बसली जाउन दुर
तिला माझ्या तुम्ही
आता जवळ आणा

कसला करते हट्ट
किती ती निगरगठ्ठ
तिची मला काळजी वाटते
जाउन सांगा

रुसली तर रुसो
पणं माझ्यासमोर बसो
पाहुन तिला वाटेल बरे
माझ्या जिवाला.

गुलमोहर: 

आई मला लागलीये भूक खूप खूप

Submitted by एम.कर्णिक on 9 August, 2010 - 13:32

आई मला लागलीये भूक खूप खूप
वरणभातावर घाल खूप सारं तूप

आजोबा भरव्तिल करून गोलगोल घास
अग त्यांच्या घासाना चव अस्ते खास

किती छान कुस्करून मऊ कालवतात
मज्जा येते जाताना गुट्टुक्क पोटात

मधनंच लाव्तिल घासाला लोणच्याचं बोट
खाताखाता होऊन जाईल टुम्म माझं पोट

देईन बर का नंतर मी ढेकर "ओब्ब्बा"
हसून "शाब्बास बंटीबाबा" म्हण्तिल आजोबा

गुलमोहर: 

वार्‍या वार्‍या ये ये

Submitted by सावली on 20 July, 2010 - 20:26

हि माझी कविता नाही,मुलीने सुचवलेली आहे.
काल शाळेतून तिला घेऊन घरी येताना फारच गरम होत होत. तिला चालवत नव्हत म्हणून जरा गम्मत करावी अस वाटून तिच्याबरोबर म्हणून चिमणी चिमणी वारा घाल , कावळ्या कावळ्या पाणी दे अस गाण म्हणत होते. मग त्यात जरा बदल करून नुसतच "वार्‍या वार्‍या ये ये " अस म्हणायला लागले.
तर तिने त्यात अजून एक वाक्य स्वत:च जोडलं. "आमचा घाम सुकव रे"! मग आमची दोन वाक्याची कविताकच झाली.
"वार्‍या वार्‍या ये ये
आमचा घाम सुकव रे"
त्याला जरा आणखी रूप देण्यासाठी मी काही वाक्य टाकली आणि आम्ही दोघी रस्त्यातून उन्हात चालताना हि कविता म्हणायला लागलो. उन जरा सुसह्य झालं.

गुलमोहर: 

बाल बाराखडी-१

Submitted by आशिष पवार on 17 July, 2010 - 01:52

अ म्हणता आईला दे बाळा आवाज
ब म्हणता बाबांचा, धर बाळा तु हात

ग म्हणता गणपती देवता विद्येची
व म्हणता वाणीशी वसते सरस्वती

श म्हणता शिवाजी राजा होते महान
स म्हणता संस्क्रुतीचा राखला त्यांनी मान

च म्हणता चांदोबा दिसतो किती सुंदर
ढ म्हणता ढगांच्या पाठी त्याचे घर

भ म्हणता भावाची बहीण मी धाकटी
घ म्हणता घरात सर्वांचीच लाडकी

द म्हणता देवाला आवडती मुले
म म्हणता मुले म्हणजे देवा घरची फुले

गुलमोहर: 

रानमेवा ....!

Submitted by अभय आर्वीकर on 16 July, 2010 - 23:43

रानमेवा खाऊ चला....! (बालकविता)

या झरझर या, जरा भरभर या,
चला रानोमाळी भटकू चला
कुणी अंजीर घ्या, कुणी जांभुळ घ्या,
थोडा रानमेवा खाऊ चला ....॥१॥

(लाला, लरला, लरलल्लरलल्लर ला,
लरलल लरलल लरलल लरलल
लरलल्लरलल्लर ला)

ते उंच-उंच दिसते ते, ते फ़ळ ताडाचे आहे
झाडांच्या डोक्यावरूनी, सूर्याचे किरण ते पाहे
कुणी कळवंद खा, कुणी चिक्कु-पेरू खा,
पाणी नारळाचे पिऊया चला ....॥२॥

ते फ़ुगले डोळे दिसते, ते सिताफळाचे आहे
खोप्यांच्या खिंडीमधुनी, ते चोरुनी पाडस पाहे
कुणी अननस खा, कुणी बोरं-लिंबू खा,
पाड आंबे वेचूया चला ....॥३॥

ही झाडे आहे म्हणुनी, सरसर पाऊस येतो

गुलमोहर: 

अंगाई

Submitted by वैशाली. on 16 July, 2010 - 00:43

ये ग गाई अंगाई
स्वप्नांमध्ये घेवुन जाई
स्वप्नात भेटली परीराणी
बाळासाठी गाते गाणी
स्वप्नात भेटला टिल्लू जोकर
म्हणतो मी तर बाळाचा नोकर
स्वप्नात भेटले दोन चित्ते
म्हणाले चल खेळुया पत्ते
स्वप्नात भेटली मनीमाउ
म्हणते खुप सारे दुध पिउ
स्वप्न संपले झोपी जाउ
सकाळी उठुन नाचु गाउ.

गुलमोहर: 

अ‍ॅडमीनदाsss,अ‍ॅडमीनदाssss

Submitted by के अंजली on 13 July, 2010 - 00:50

अ‍ॅडमीनदाssss,अ‍ॅडमीनदाsss
अ‍ॅड्मीनदाssss अ‍ॅडमीनदाsss
सांग सांग अ‍ॅडमीनदाsss
हौस फिटेल काय?
काव्य करुन लेख लिहून
मन भरेल काय?
सांग सांग अ‍ॅडमीनदाsss

काय करतो दिवसभर तू
इतका असतो बिझी?
एकदा ये ना सांगून जा ना
सगळी स्टोरी तुझी..
अ‍ॅडमीनदाssss, अ‍ॅडमीनदाsss

अ‍ॅडमीनदा कधीतरी
जरा इथे ये ना
पाऊस,स्वप्न,राधा,कृष्ण
पाहून जरा जा ना
अ‍ॅडमीनदाssssअ‍ॅडमीनदाsss

अ‍ॅडमीनदा, अ‍ॅडमीनदा
खर सांग एकदा..
आठवड्यातून वविवार
येतील कारे तीनदा?
अ‍ॅडमीनदाsss, अ‍ॅडमीनदाsss

गुलमोहर: 

सुर्योबाचा रुसवा

Submitted by सावली on 4 July, 2010 - 21:14

सुर्योबा रुसले आणि लपूनच बसले
ढगांच्या उशीत डोके खुपसून रडले
उशीचा कापूस भिजला फार
थांबेचना मग पावसाची धार

आवडतात तुम्हाला चांदोबाच्याच गोष्टी
चांदोबाच्या कविता आणि त्याचीच गाणी
मी रोज रोज येतो कधी हसता का?
मला हात हलवून हॅलो तरी म्हणता का?

म्हणाले आता येणारच नाही.
छान छान इंद्रधनु दाखवणारच नाही.
सोनेरी ढगपण दिसणारच नाहीत.
सूर्यास्त सुद्धा असणारच नाही.

नको रे सुर्योबा रागावू असा,
हा घे तुला खाऊ देते माझा.
आतातरी गट्टी करशील ना?
ढगातून बाहेर येशील ना?

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - बालकविता