बालकविता

उंदीरमामा आणि मनीमावशी -

Submitted by विदेश on 16 January, 2011 - 00:27

ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ट्रिंग
ऐकू आली फोनची रिंग -
कुणीच नाही फोनपाशी
उंदीरमामा बिळापाशी !
उंदीरमामा हसले मिशीत ,
टेबलावरती चढले खुषीत -
फोन लावला कानाला
जोरात लागले बोलायला -
" उंदीरमामा मी इकडे ;
कोण बोलतय हो तिकडे ? "
- विचारले मामानी झटकन
उत्तर आले की पटकन-
" मी तुमची मनीमावशी,
कालपासून आहे उपाशी ."
- मनीमावशी भलती हुषार ,
टुणकन मामा बिळात पसार !!

गुलमोहर: 

पाऊस येता

Submitted by शुभांगी. on 7 January, 2011 - 06:03

रात्र नाही , चांदोबा नाही, का ग झाला अंधार??
पळत येवुन बघतो तर घड्याळात वाजले चार

मला मात्र ओरडू नको, करु नको थयथयाट
ढगांना त्या सांगणार कोण थांबवा गडगडाट?

ढगांच्या त्या आवाजाची, वाटते मला भीती,
दिवे सुद्धा गेले, दादा सांगतो भुताच्या गोष्टी

टपटप टपटप येतो आवाज, अंगणामधुन फार
तिकडे जावे हळुच, तर आज्जी देइल मार

ढग नको ,आवाज नको, हवे नुसते पाणी
डराव डराव बेडकाची, डबक्यामधली गाणी

मला वाटते भिजावे, आणि खेळावे होडी होडी
ताईला मात्र खिडकीत काय, यात आहे गोडी

चंदु आला, पिंकी आली, मी ही मारतो कल्टी
भिजु नको आई म्हणते, होईल मला सर्दी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

फुलपाखराचं गुपीत

Submitted by कविन on 7 January, 2011 - 02:47

आई बघ गं झाडावरती असे काय दिसते?
हिरवी हिरवी अळी बघ ना पान कसे खाते!
सांगना मला बसली कैसी, ती पानावरती,
पंखही नाही तरी कशी गं उडून आली ती?

'अशी कशी ले' उडून येईल ती पानावरती?
बस इथे मी तुला सांगते कुठून आली ती

गोड गोजिरे फुलपाखरु एक दिवस आले
पानावर त्या अंडे घालून भुर्र उडून गेले
अंड्यामधे छोटीशी ही अळीच बसलेली
एके दिवशी अंडे फोडून बाहेर ती आली

अशीच पाने खाऊन आता मोठी ती होईल,
मोठी होता कोष विणून ती आत बसून राहील
कोषामधल्या सुरवंटाचे रुप असे बदलेल,
सुंदरसे बघ फुलपाखरु बनुनी तेची उडेल

गुलमोहर: 

गोष्ट लाकूडतोड्याची

Submitted by कविन on 6 January, 2011 - 02:57

ऐक बाळा तुला सांगते एक कहाणी खरी
लाकडं तोडण्या लाकूडतोड्याची निघाली की स्वारी

लोखंडाच्या कुर्‍हाडीने तो झाड लागला तोडू
पाण्यात पडली कुर्‍हाड आणि आले त्यास रडू

ऐकून त्याचे रडणे बाहेर जलदेवी ती आली
झालं तरी काय अस्सं? त्याला ती म्हणाली

बोले लाकूडतोड्या, आता पोट कसे मी भरू?
पाण्यात पडली कुर्‍हाड, आता काम कसे मी करु?

प्रश्न त्याचा ऐकून देवी जलात त्या गेली
घेवूनी येते कुर्‍हाड वत्सा, हेची ती बोलली

येताना ती सुवर्णाची कुर्‍हाड घेवूनी आली
अता कसा वागतो बघुया, मनात ती वदली

म्हणे ही माझी कुर्‍हाड नाही, क्षमा करावी मला
जुनीच द्यावी कुर्‍हाड माझी, प्रिय असे ती मला

गुलमोहर: 

"क्या नाम ऐ तेला?"

Submitted by एम.कर्णिक on 3 January, 2011 - 12:57

रोज संध्याकाळी प्रॅममधून बंटीबाबांची एक रपेट कॉलनीतल्या क्रिकेट ग्राउंडवरून असते. छोट्या छोट्या मुलांना घेऊन कितीतरी आईवडील तिथे आलेले असतात. दोन तीन रशियन फॅमिलीज देखील असतात त्यांच्यात. बंटीच्या प्रॅमच्या वाटेवरच बाकांवर आईवडील असतात बसलेले आणि त्यांची गोंडस मुलं मजेत आवतीभवती बागडत असतात. बंटीबाबा नेहमी प्रॅममधे बसल्याबसल्या मान वळवून वळवून, कुतुहलाने, काही तरी प्रश्न पडल्यासारखं त्यांच्याकडे बघतात.

बाबा, तुम्मी बनुताईला शांगा काऽय तली
भूऽऽल नाई नेत मला आल्यावल घली
तुम्मी आनि आबा कशे नेता लगेच उचलुन
तिलाच फक्त लावायलाऽ लागते लालीगोली

नेते जेव्वा, तेव्वा नेते एकाच थिकानी

गुलमोहर: 

बनू आणि बंटीची जुगलबंदी

Submitted by एम.कर्णिक on 28 December, 2010 - 11:10

आई, बघ नं बंटीनं पुस्तक माझं फाडलं
रेघोट्यांचं जाळं सगळ्या पानांवर खरडलं
कशी वाचू सांग मं मी जॉग्रुफीचे धडे ?
म्हणून आता वाचायला मी हॅरी पॉटर काढलं

बंटी, नको ना रे आता हे पण पुस्तक फाडू
आणि माझ्या चष्म्याची काडी नको तोडू
नको का दिसाय्ला तुझं एवढुस्ससं नाक?
कशाला चढवतोस रे ते? ओढू? ओढू? ओढू?

जा ना इथुन घेऊन तुझे फ्रॉगी आणि रॅट
नाय्तर घे ते मऊ मऊ कापूस भरलं कॅट
जा, बघ केली आईने खीर तुझ्यासाठी
खाऊन ये मग शिकविन तुला धरतात कशी बॅट

ज्जा, ज्जा, ज्जा ना बंटी, पेन्सिल नको घेऊ
ज्जा नाय्तर बघ! पाठित रपाटा एक देऊ?
बघा बघा कांगावा ! मी नुस्तं बोलले तरी !

गुलमोहर: 

कामावर जातांना..

Submitted by निनाव on 26 December, 2010 - 04:24

चाललो ग बाळा मी कामावरी
त्रास देऊ नको बर तुझ्या आईस
येतो मी आज लवकर संध्याकाळी
येताच तुला बागेत फिरवायला मी नेईन

टेरेस वरून करशील ना ग मला 'टाटा'
देशील ना गोड तुझा तो उडणारा 'पापा'
दिवस मग माझा जाईल निघून चटकन
घेईन तुला मिठीत येताच घरी पटकन

सांग तुला काय आणू येतांना कामावरून
माझ्या कडील यादी तर गेली आहे भरून
तू म्हणशील आणीन ग ते तुझ्या साठी
तुझा बाबा आहे फक्त तुझ्झ्याच साठी...

गुलमोहर: 

एक होते...

Submitted by निनाव on 26 December, 2010 - 04:04

एक होते हत्ती
त्यास नाही भीती
चाले तोः धुन्धीत
पाणी उडवे सोन्डीत

एक होती मुंगी
कधी न थांबणारी
कंटाळा तिला अज्ञात
अविरत काम करणारी

एक होता ससा
मारायचा तो उड्या
खाल्ले इतके गवत
झालाय त्याचा फुग्या

एक होता कोल्हा
ठिपके पाठीवर सोळा
करेल कष्ट जगण्या साठी
नव्हता तोः इतका भोळा

गुलमोहर: 

आशीर्वाद

Submitted by एम.कर्णिक on 24 December, 2010 - 01:11

माझे मोठे भाऊ श्री.यशवंत कर्णिक हे प्रथितयश कादंबरीकार आणि कथाकार आहेत. त्यांच्या तीन कादंबर्‍या आणि ५ कथासंग्रह 'आजपर्यंत' प्रकाशित झाले आहेत. आजपर्यंत म्हणतो एव्हढ्यासाठी की आज वयाची ८५ वर्षे पुरी झालेली असूनही त्यांचे लेखन अजूनही अव्याहत चालू आहे. आणखी तीन पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. त्यांनी 'बनुताई आणि बंटीबाबा' हे माझे पुस्तक वाचून बनुताईना पुढील आशीर्वाद दिला. तुम्ही सर्व वाचकही बनुताईंच्या प्रेमात आहात म्हणून तुम्हाला वाचायला इथे देतो.

"I send my personal blessings to Banutai and Buntybaba in the following rhyme :

" बनुताई बनूताई, मोठं व्हायची नका करू घाई

गुलमोहर: 

रामायण

Submitted by monalip on 21 December, 2010 - 04:33

हा माझा मा.बो. वर लिहायचा पहीला प्रयत्न. लेकाशी बोलताना अशी विडंबने बरिच होतात. हा latest प्रयोग, कारण लव-कुश सिनेमा पाहुन हल्लि त्याचा राम झाला आहे. रामाबद्दल तो सगळे सध्या आवडीने पाहतो, ऐकतो म्हणुन हे त्याला ऐकवले. ऐकवायला सोपे वाटले, पण लिहीताना कळाले "त ला त" जोडणे वाटले तितके सोपे नाही. तरीही प्रयत्न केलाय. आवडले / नावडले नक्की कळवा, त्याप्रमाणे पुढिल प्रयत्नाबद्दल ठरवता येईल.

जरा जरा झुकु झुकु झुकु झुकु अगीनगाडी च्या चालित.

राम लक्ष्मण शत्रुघ्न भरत
४ भाऊ अयोध्येत रहातात,
त्यांची गोष्ट पाहुया,
रामायण बघायला जाउया.

रामाचे बाबा दशरथ
कैकेयीचे वचन पाळतात
आपणही वनात राहुया,

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - बालकविता