बनू आणि बंटीची जुगलबंदी
Submitted by एम.कर्णिक on 28 December, 2010 - 11:10
आई, बघ नं बंटीनं पुस्तक माझं फाडलं
रेघोट्यांचं जाळं सगळ्या पानांवर खरडलं
कशी वाचू सांग मं मी जॉग्रुफीचे धडे ?
म्हणून आता वाचायला मी हॅरी पॉटर काढलं
बंटी, नको ना रे आता हे पण पुस्तक फाडू
आणि माझ्या चष्म्याची काडी नको तोडू
नको का दिसाय्ला तुझं एवढुस्ससं नाक?
कशाला चढवतोस रे ते? ओढू? ओढू? ओढू?
जा ना इथुन घेऊन तुझे फ्रॉगी आणि रॅट
नाय्तर घे ते मऊ मऊ कापूस भरलं कॅट
जा, बघ केली आईने खीर तुझ्यासाठी
खाऊन ये मग शिकविन तुला धरतात कशी बॅट
ज्जा, ज्जा, ज्जा ना बंटी, पेन्सिल नको घेऊ
ज्जा नाय्तर बघ! पाठित रपाटा एक देऊ?
बघा बघा कांगावा ! मी नुस्तं बोलले तरी !
गुलमोहर:
शेअर करा