रात्र नाही , चांदोबा नाही, का ग झाला अंधार??
पळत येवुन बघतो तर घड्याळात वाजले चार
मला मात्र ओरडू नको, करु नको थयथयाट
ढगांना त्या सांगणार कोण थांबवा गडगडाट?
ढगांच्या त्या आवाजाची, वाटते मला भीती,
दिवे सुद्धा गेले, दादा सांगतो भुताच्या गोष्टी
टपटप टपटप येतो आवाज, अंगणामधुन फार
तिकडे जावे हळुच, तर आज्जी देइल मार
ढग नको ,आवाज नको, हवे नुसते पाणी
डराव डराव बेडकाची, डबक्यामधली गाणी
मला वाटते भिजावे, आणि खेळावे होडी होडी
ताईला मात्र खिडकीत काय, यात आहे गोडी
चंदु आला, पिंकी आली, मी ही मारतो कल्टी
भिजु नको आई म्हणते, होईल मला सर्दी
मोठ्यांना का नसते हौस, पाण्यामधे खेळण्याची?
आईला मात्र सदा घाई, बाबांना भजी करण्याची
मी मोठा होईन तेव्हा, पावसाला पाहिन सांगुन
खेळायला मला मिळत नाही, ये ना सुट्टी बघुन
पाणी नको लाल लाल, अक्वागार्ड लावु
कपड्याची मग काळजी नको, सारे खेळुन घेवु
डबक्यामधली माझी उडी, असेल खुप मोठी
पाणी उडता अंगावर, हसतील सगळे फिदीफिदी
(No subject)
छान
छान
शेवटचे कडवे जमले
शेवटचे कडवे जमले नाही
डबक्यामधली माझी उडी, असेल खुप मोठी
नकळत येतील वा वा उद॑गार आईच्या ही ओठी
छान आहे.
छान आहे.
मोठ्यांना का नसते हौस,
मोठ्यांना का नसते हौस, पाण्यामधे खेळण्याची?
आईला मात्र सदा घाई, बाबांना भजी करण्याची
त्यांना कसे सांगणार मोठ्यांना पण पाण्यात खेळावाटते पण नाही खेळु शकत?
मस्त