रामायण

Submitted by monalip on 21 December, 2010 - 04:33

हा माझा मा.बो. वर लिहायचा पहीला प्रयत्न. लेकाशी बोलताना अशी विडंबने बरिच होतात. हा latest प्रयोग, कारण लव-कुश सिनेमा पाहुन हल्लि त्याचा राम झाला आहे. रामाबद्दल तो सगळे सध्या आवडीने पाहतो, ऐकतो म्हणुन हे त्याला ऐकवले. ऐकवायला सोपे वाटले, पण लिहीताना कळाले "त ला त" जोडणे वाटले तितके सोपे नाही. तरीही प्रयत्न केलाय. आवडले / नावडले नक्की कळवा, त्याप्रमाणे पुढिल प्रयत्नाबद्दल ठरवता येईल.

जरा जरा झुकु झुकु झुकु झुकु अगीनगाडी च्या चालित.

राम लक्ष्मण शत्रुघ्न भरत
४ भाऊ अयोध्येत रहातात,
त्यांची गोष्ट पाहुया,
रामायण बघायला जाउया.

रामाचे बाबा दशरथ
कैकेयीचे वचन पाळतात
आपणही वनात राहुया,
रामायण बघायला जाउया, जाउया रामायण बघायला जाउया...

रामाचा भाऊ लक्ष्मण
त्याच्यासवे जाऊ वनात
शुर्पणखेचे नाक कापुया
रामायण बघायला जाउया, जाउया रामायण बघायला जाउया...

रामाची बायको सीता
वनात आहे आता
तिच्यासाठी हरिण आणुया
रामायण बघायला जाउया, जाउया रामायण बघायला जाउया...

रामाचा सेवक हनुमान
आहे तो शक्तीवान
द्रोणगिरी पर्वत उचलुया
रामायण बघायला जाउया, जाउया रामायण बघायला जाउया...

रामाचा शत्रु रावण
सीतेचे करीतो हरण
रावणाला मारायला जाउया
रामायण बघायला जाउया, जाउया रामायण बघायला जाउया...

गुलमोहर: