बालकविता
vidyan git
SCIENCE: Take it easy! Make it easy!!
विज्ञान गीत (SCIENCE SONG)
इंद्र्धनुचा चित्रकार !!
निळ्या निळ्या पटावर सप्तरंगी छटा !!
सांगा पप्पा !चित्रकार असेल किती मोठा ?!?
नाही बाळ,इंद्र्धनुचा चित्रकार मोठा !
तुझ्याहूनही लहानसा तो कितीतरी छोटा !
बागेत फवार्याचे जसे उडती थेंब(droplets) पिटूकले !
तसेच इंद्र्धनुचे चित्रकार चिटूकले !
सरळ सरळ सांगा ना ,हरलो म्हणून साफ !
लहान समजून, मारताय ना, काहितरी थाप ?!?!
नाही बाळा थाप, ही किमया सुर्यकिरण-विकरणाची(dispersion)
अन सात रंग(spectrum) वेगळाले करणार्या थेंब -लोलकांची(prism)
लोलका(prism)सारखे वागती जेव्हा पिटूकले थेंबं
ग्लोबल वॉर्मींग ड्रावं-ड्रांव... ड्रूक...
एक बेडु़क होता करत ड्रांव ड्रावं
"बेडुक दादा असं काय करताय रावं?"
'पाऊस नाही आला, आलाय मला राग
जरा गाऊन बघतो, मी मेघ-मल्हार राग'
"अरे बेडुक दादा, असा चिडुन नको गाऊस
नाहीतर येणार नाही, कधीच पाऊस"
'ढग नाही, वारा नाही, पाऊस पडत नाही
तुमच्या घरी नळ आहे तुमच अडत नाही'
'अरे..
बघ जरा टीव्ही लाऊन, काही बातमी देतात काय?
मासा काल म्हणत होता ग्लोबल वॉर्मींग हाय'
'ग्लोबल वॉर्मींग, ग्लोबल वॉर्मींग....ग्लोबल वॉर्मींग
आता हे आणि काय?'
"अरे दादा, आभाळातला एसी बंद पडला हाय"
"म्हणुन बाबांनी नवा बसवुन घेतलाय एसी"
'पुन्हा तुम्ही तुमचं बघा, आमची ऐशी-तैशी'
कोंबडा आरवतो -
कोंबडा आरवतो
कुकूऽऽच कूऽक
ऊठ बाळा आता
झोप झाली खूऽप |१|
कावळा करतो
काव काव काव
हास बाळा आता
आईला बोलाव |२|
चिमणीची चाले
चिव चिव चिव
सरकत बाळा आता
बाबांना शिव |३|
मोत्या भुंकतो
भो भो भो
बाळ आलं रांगत
बाजूला हो |४|
पोपट बोलतो
मिट्टूऽऽमिया
दुडुदुडु बाळ चाले
बघायला या |५|
मनीमाऊ म्हणते
म्याऊ म्याऊ
बाळाच्या गंमती
बघायला जाऊ |६|
गाढवदादा गाढवदादा -
गाढवदादा गाढवदादा -
माणूस म्हणू का ?
माणूस म्हणताच चिडून
लाथा झाडाल का ? |१|
मासेभाऊ मासेभाऊ -
नापास झाला का हो ?
रडून रडून सगळा
टँक भरला की हो ! |२|
पोपटराव पोपटराव -
शीळ छान घालता राव !
मैनाताईला वाटतं का हो
एकदा तरी वळून बघाव ? |३|
कासवपंत कासवपंत -
लढायला किती हळू जाता ?
ढाल पाठीवरती घेता
तलवार कुठे विसरता ? |४|
विषयांचे गुपित
गणिताचे आकडे पाडतात भारी
विज्ञानाची कोडी सुटतात सारी
भाषा मराठी तर जपा जीवापाड
हिंदी पण चाले हिंदुस्थानात
इंग्रजीचा तोरा जगभर चाले
शब्द पाठांतर माञ डोकेच तोले
अर्थशास्ञ शिकवी पैशाचा खेळ
जीवनी साधा तुम्ही शिक्षणाचा मेळ
इतिहासाचे इ. स. ना होई पाठांतर
इंग्रजीत तर यांचे वेगळेच भाषांतर
भूगोलाचा नकाशा गोलच सारा
डोक्यामध्ये होतो सार्याचा भारा
संस्कृत करते उच्चार स्वच्छ
शिकऊन वेद देते गुलाबाचा गुच्छ
नागरीक शास्ञ शिकवी समाज कसा
उमटवी मनावर सामाजिक ठसा
असे सारे विषय आहे अभ्यासाला
शिकुन सार तुम्हा व्हायचय मोठ
सारी सेना घरात रे
गडगडगडगड गडाट रे
पाऊस आला भरात रे
काऊ, खारू, भू भू, म्याऊ
सारी सेना घरात रे
सळसळसळसळ उठली रे
पाने खेळत सुटली रे
झाड नी वारा झिम्मड जोडी
पाऊस येता तुटली रे
टपटपटपटप टपोर रे
आभाळाची गलोर रे
नाकावरती थेंब मारते
जाता त्याच्या समोर रे
कडकडकडकड कडाक रे
वीज लखलखे लखाक रे
कुशीत घे ना आई लवकर
काळीज धडधड धडाक रे
क्षणात भरभर झरा भरे
खळखळखळखळ नाद करे
बांध तोडूनी अवखळ पाणी
हवी तशी मग वाट धरे
सा॑ग ना आई मी होनार कधी ग मोठा
सा॑ग ना आई मी होणार कधी ग मोठा
सा॑ग सा॑ग आई ,मी कसा ग सर्वात छोटा !!ध्रु !!
सखे सोबती मला चिडवतात,चिडवुनी मला खुप रडवतात
खेळामध्ये ठरवतात खोटा ,मी होणार कधी ग मोठा ,
सा॑ग ना आई मी होणार कधी ग मोठा !!१!!
पप्पा आई तुम्ही मला रागवतात्,अभ्यास करत नाही म्हणतात
करु नका उगाच माझा बोभाटा,मी होणार कधी ग मोठा ,
सा॑ग ना आई मी होणार कधी ग मोठा !!२!!
सध्याकाळी पप्पा घरी येतात्,येतानि आम्हा खाऊ आणतात
थोडा देऊनी म्हणतात तु छोटा,मी होणार कधी ग मोठा ,
सा॑ग ना आई मी होणार कधी ग मोठा !!३!!
दादाचे कपडे मला देतात्,तुझेच आहे मला समजवतात
मला समजु नका नर्मदेचा गोटा,मी होणार कधी ग मोठा ,
आता वाजले बारा -
प्राण्यांचे संमेलन झाले ‘ नाच-धमाका ’ सुरू
लेझिम घेऊन वाघ म्हणाला , ' धमाल मस्ती करू ! '
स्वागत-गाणे म्हणतच केले ट्विस्ट अस्वलाने ,
भरतनाट्यम करीत कौतुक केले जिराफाने !
ता थै तक थै तालावरती झेब्रा नाचत सुटला -
गोरीला गरब्यात गुंगला तोल सावरी कुठला ?
रानगव्याचा डिस्को बघता , नागहि डोलत बसला -
रमला दांडीयात लांडगा , ससाहि ठुमकत हसला !
लबाड कोल्हा कथ्थक करुनी सावज शोधत होता -
हत्तीचा भयचकित भांगडा जंगल तुडवित होता !
फांदीवरती ब्रेक डान्सची धमाल मर्कटलीला ,
रवीवारची शाळा
जंगलातल्या गावी एकदा
रवीवारची भरली शाळा
हिरमुसलेली पिल्ले बघूनी
बाई म्हणाल्या...खुप खेळा !
वाराकाका गातो गाणी
कोरस देती झाडे-वेली
पाऊसदादा ठेका धरतो
नाच करतसे खारुटली...
ससुल्यादादा सराव करतो
फेर्या मारीतो डोंगरावरी
कासवभाऊ खुदकन हसले
माझाच पहिला नंबर तरी...
फुलपाखरे इवली इवली
बागडती आनंदे फुलांवरी
सुट्टी-बिट्टी नकोच मजला
मधमाशीताई व्यस्त भारी ...
कामात गुंतले गाढवदादा
बाई वाटती बिस्कीट पुडे
चुकार कोल्हा आळशी कुठला
डोळा त्याचा बस खाऊकडे...
हत्तीदादा खुतून बसले ...
एवढेसे मज कसे पुरावे?
दिला तुला जर सगळा खाऊ
इतरांना मग काय उरावे?
नेहमीप्रमाणे उशीरा आले