प्राण्यांचे संमेलन झाले ‘ नाच-धमाका ’ सुरू
लेझिम घेऊन वाघ म्हणाला , ' धमाल मस्ती करू ! '
स्वागत-गाणे म्हणतच केले ट्विस्ट अस्वलाने ,
भरतनाट्यम करीत कौतुक केले जिराफाने !
ता थै तक थै तालावरती झेब्रा नाचत सुटला -
गोरीला गरब्यात गुंगला तोल सावरी कुठला ?
रानगव्याचा डिस्को बघता , नागहि डोलत बसला -
रमला दांडीयात लांडगा , ससाहि ठुमकत हसला !
लबाड कोल्हा कथ्थक करुनी सावज शोधत होता -
हत्तीचा भयचकित भांगडा जंगल तुडवित होता !
फांदीवरती ब्रेक डान्सची धमाल मर्कटलीला ,
वाटे हरणीसंगे कुचिपुडी करुया काळविटाला !
गेंडा तांडव करीत असता लाथ लागली हत्तीला -
उचलुन फेकू म्हणतो हत्ती सोंडेवरून गेंड्याला !
गोंधळ गडबड करू लागले प्राणी जमिनीवरती
चीं चीं करुनी सावध झाले माकड झाडावरती –
अफवा गोंगाटात कळेना कुठे काय ते घडले ,
संमेलन वा करण्या भांडण - सगळे तुटून पडले !
ऐकू आली सिंहगर्जनाss , वळल्या तिकडे नजरा -
प्राणी म्हणती , धूम ठोकुया - आता वाजले बारा !!
वाह
वाह
(No subject)