Submitted by सुहासिनी on 22 June, 2011 - 04:00
गणिताचे आकडे पाडतात भारी
विज्ञानाची कोडी सुटतात सारी
भाषा मराठी तर जपा जीवापाड
हिंदी पण चाले हिंदुस्थानात
इंग्रजीचा तोरा जगभर चाले
शब्द पाठांतर माञ डोकेच तोले
अर्थशास्ञ शिकवी पैशाचा खेळ
जीवनी साधा तुम्ही शिक्षणाचा मेळ
इतिहासाचे इ. स. ना होई पाठांतर
इंग्रजीत तर यांचे वेगळेच भाषांतर
भूगोलाचा नकाशा गोलच सारा
डोक्यामध्ये होतो सार्याचा भारा
संस्कृत करते उच्चार स्वच्छ
शिकऊन वेद देते गुलाबाचा गुच्छ
नागरीक शास्ञ शिकवी समाज कसा
उमटवी मनावर सामाजिक ठसा
असे सारे विषय आहे अभ्यासाला
शिकुन सार तुम्हा व्हायचय मोठ
---सुहासिनी सुरेश.
गुलमोहर:
शेअर करा
छान आहे, खुप दिवसानी सगळ्या
छान आहे, खुप दिवसानी सगळ्या विषयाची पुन्हा उजळणी झाली.
छान आहे
छान आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)