बालकविता
बेडुकराव....
बेडुकराव....
बेडुकराव....बेडुकराव....
शाळा तुमची भारीच राव
पावसाळ्यातच फक्त शाळा
नंतर खुशाल खेळाखिदळा
कसली मस्त शाळा सह्ही
नक्को दप्तर नी वही-बिही
सतत आपले डराव डराव
वा रे व्वा बेडुकराव
शाळेत तुमच्या फक्त पाढे
डराव डराव हेच धडे
प्रॅक्टिसने मला जमेल की
डराव डराव मज्जाच की
आई जरा कटकट करेल
पावसात जाऊ नको म्हणेल
सर्दीतापाची घालेल भिती
असली कोण घेईल धास्ती ?
आई आणि बार्बी डॉल...
आई आणि बार्बी डॉल...
सो नाईस बार्बी डॉल
कित्ती कित्ती फिरले मॉल
आलीये म्हणे स्टेट्सहून
मिरवते सगळ्या शॉपीतून
कसली क्यूट दिसते नं ही
वेगवेगळ्या फॅशन्स सही
मॉम मात्र चिडते फार
"कसली आलीये नटवी नार"
"कसले हिचे लांडे फ्रॉक
तुला कुणाचा उरलाय धाक ?"
चूल बोळकी भातुकली छान !!
जोडीला ते ठकी पुराण !!!
अस्सं बोअर करते ना ही
नव्याचे हिला कौतुकच नाही
"एवढं का गं रागावतेस आई ?
चल, दुसरं खेळू काही...."
हळूच माझा घेउन पापा
म्हणते "सांभाळ रे, देव बाप्पा..."
झोका व बोका
झुल झुल झोका
त्यावर बसला बोका
बोक्यानी मारली उडी
त्याची तुटली तंगडी
तो लागला रडायला
आई लागली समजावयाला
आईने दिले दुध
बोका झाला खूष
चिमूताई, कावळेदादा..
चिमूताई...
चिमूताई चिमूताई किती हा चिवचिवाट
खात नाही दाणेबिणे सतत आपला बडबडाट
सारख्या गप्पा मारता बाई, मैत्रिणींशी कशा
आई कशी म्हणत नाही - चला, अभ्यासाला बसा.....
कावळेदादा..
काळा काळा कावळा
खरवडतो सदा गळा
रंग जरी काळाशार
दिसतो तरी तजेलदार
वाकडी मान करुन करुन
बघतात काय कोण जाणे
पोळी ब्रेड केक दाणे
पळवतात हुशारीने
मुंगीताई..
मुंगीताई..
मुंगीताई , मुंगीताई
तुरुतुरु धावता घाई
पाय कसे दुखत नाही
मज्जा भारी वाटे बाई
शिस्तीत कशा चालता तुम्ही
रांग कधीच मोडत नाही
समोर येता दुसरी ताई
कानगोष्टी करुन जाई
रॅकवर उंच ठेवले जरी
नाव डब्यावर नसले तरी
शोधून काढता केक - खारी
मला गंमत वाटते भारी
उंच स्टुलावर चढते तोच
आईची एकदम जाते झोप
धडपड सारी माझी ऐकून
आई ओरडे पाठीमागून
"हा काय मेला फाजीलपणा
जेवण नको नी खाऊ आणा"
आवाज बिल्कुल न करता
खाऊ तेवढा कसा शोधता
हट्ट गणेशबाळाचा..
हट्ट गणेशबाळाचा....
गणेशबाळाचा आईकडे एकच हट्ट
"मलाही सेलफोन" धरला पदर घट्ट
"चारी हातात तुझ्या काही ना काही
कसा धरणार सेल, काही कळतच नाही"
"पितांबराला ना खिसा, मग कुठे ठेवणार ?
एक हरवल्यावर लगेच दुसरा मागणार"
"सोंड आहेना ही, अशी कानाशीही नेईल
सेल धरायची माझी बघशीलंच स्टाईल..."
बर्थ डे च्या आधीच मिळाला की सेल
गणेशबाप्पांना आता नवीनच खेळ
"हॅलो कार्तिक, गणेश कॉलिंग.."
बाप्पांचे एकदम फुल शायनिंग
(ऐटीत कार्तिकला कॉल लावला
"टचस्क्रीन भारीच आणलाय मला" )
"सुखकर्ता दु:खहर्ता"...ची वाजली धून
चमकून बघतात तर आपल्याच सेलमधून
बाप्पांचे उंदीरमामा........
बाप्पांचे उंदीरमामा.....
बाप्पा आमचे लाडके येणार की उद्याला
उंदीरमामा गडबडीने लागले तयारीला
मामी म्हणे डिवचून "नको तुमचा तोरा
कसली आलीय् तयारी, आता बिळातच घोरा"
"नॅनो ते बेंझ केवढ्या त्या कार्स
कोण आता धरेल उंदरांचा हव्यास ?"
"बाप्पांचे भक्त किती तालेवार
बाप्पा कसले होतात तुमच्यावर स्वार ?"
मामा बसले बिळात रुसुन
बाप्पा थकले शोधून शोधून
मोदकाचे आमिष पुढे करुन
बाप्पा विचारतात समजूत काढून
गोजिरवाणे मामा बसले गाल फुगवून
"काही नको मोदक नी कौतुक वरुन"
"भारी भारी गाड्या आणल्यात म्हणे
आता कशाला माझे लोढणे?"
"अरे, कसल्या भारी गाड्या नी एअरकंडिशन
गम्मत जम्माडी हो हो जम्मत गम्माडी.....
...........गम्मत जम्माडी हो हो जम्मत गम्माडी
आत्याबाईना फुटल्या मिशा आणि फुटली दाढी
गम्मत जम्माडी हो हो जम्मत गम्माडी...........
दाढी मिश्या लागता वाढू ते पाहण्या आले कडू
रागे भरली आत्या पाठी घेऊन लागली झाडू,
पाठी घेऊन लागली झाडू......................
.............................गम्मत जम्माडी....!
वाढत्या दाढी मिश्या पाहण्या झाली पोरे गोळा
दाढी ओढती मिशी ओढती हळूच मारिती डोळा
हळूच मारिती डोळा..........................
............................गम्मत जम्माडी.....!!
दाढी मिश्या काढण्या ईलाज करिती डॉ.पकलू
दाढी गेली मिशीही गेली आत्या झाली टकलू
मुषकराज
वर्षा_म, ह्यांनी केलेल्या कवितेला मी इथे प्रकाशित करतो आहे. त्यांनी माझ्या एका कच्च्या प्रयत्नास खूप सुंदर आधार दिला आणिक ही कविता खूपच सुंदर झाली आहे. तेन्व्हा जुनी कविता काढून ही कविता इथे देत आहे. वर्षां जीं ची पहिलेच क्षमा मागतो कि त्यांच्या पुर्व अनुमती शिवाय हे करत आहे, बरोबरच त्यांचे मना पासून आभार प्रकट करतो. त्या बालकविता सुद्धा इतुक्या सहजतेने लिहू शकता, हे कौतुकास्पदच.
------------------
एक होते बारीक मुषक
हवे त्याला दुध पोषक
पातेल्यात होते डोकावत
दुध होते त्यांना खुणावत
एकदा बुदकन पातेल्यात पडले
तोल कसा गेला हे न कळले
खोल पातेल्यात आली गरारी
Pages
![Subscribe to RSS - बालकविता](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/misc/feed.png)