बालकविता

पोपटराव पोपटराव

Submitted by पुरंदरे शशांक on 9 January, 2012 - 22:36

पोपटराव पोपटराव

हिरवी शाल, लाल चोच
गळ्याभोती काळा गोफ

कसले भारी दिस्ता राव
पोपटराव पोपटराव

मिरच्या खाता तिखटजाळ
पेरुबरोबर ओली डाळ

शिट्ट्या बडबड कित्ती कित्ती
झोके घेता दांडीवरती

आवाजाची मस्त नक्कल
कुठून एवढी आणली अक्कल

कुण्या गावचे तुम्ही राव
हिरवे पाटील पोपटराव

गुलमोहर: 

गोगलगाय गोगलगाय

Submitted by पुरंदरे शशांक on 9 January, 2012 - 03:55

गोगलगाय गोगलगाय
हळुहळु चालली बाय

गोगलगाय गोगलगाय
दोन शिंगे पोटात पाय

शंख काय तुझे घर
फिरतेस घेऊन पाठीवर

हात लावताच थोडा जरी
लाजून शंखात शिरते स्वारी

खाऊ तुझा छान छान
हिरवेगार पान न पान

एवढा कसला नट्टापट्टा
चमचमता माग ठेवता

गुलमोहर: 

वाघोबा

Submitted by bnlele on 6 January, 2012 - 06:15

वाघोबा

मी नाई छोटी,
टोपि जरी मोठी,
आजोबांची काठी,
जरि हात भर मोठी.
बाबांचे बूट,
नाई फक्त सूट,
काजळाची मिशि,
पुसणार नाई तशी.
बॅग आहे जड,
तरि ध्रली धड,
घड्याळाचे काटे,
खरे कि खोटे ?
हलत नाईए काटा,
अडल्या तुमच्या वाटा !
मुकाट द्या खाऊ-
वाघोबा मी-
तुम्हालाच खाऊ !

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

बंटीची नौटंकी

Submitted by एम.कर्णिक on 3 January, 2012 - 03:51

बंटी आता माझी पाळी, गप्प जरा रहा
भांडं तुझं आबांकडे फोडते कस्सं पहा !

एकेक करून युक्त्या तुझ्या फोडते आबांकडे
कांगावा कर्तोस कसा ते घडघड वाचते धडे

ढक्लून मला ओरडतोस तू, “लाग्लंऽ, लाग्लंऽ, लाग्लंऽ”
आबांकडून म्हण्वायला, “अरेरेरेऽ, कुणी मारलं ?”

फसतात आबा नि घेतात पप्पी, लाग्लं नसलं तरी
कर्तोस तू मग चालू तुझ्या तक्रारींची जंत्री

मी पण आहे ओळ्खुन तुझ्या अस्ल्या सगळ्या युक्त्या
आबाना सांग्ते, “द्या एक चापट भागावरती दुख्त्या”

गरिब बिचारे आबा म्हण्तात, “नाइनाई गं बनुताई,
बंटीबाबा कळ्वळ्ला, तो उगाच रड्णार नाई”

आईच तेव्हा येउन सांग्ते, “लबाड आहे पक्का !

गुलमोहर: 

चटणी

Submitted by शेफाली on 3 January, 2012 - 00:17

कोथिंबिर, मिरची, आल आले
त्यांचे एकदा भांडण झाले
कश्यावरुन क्श्यावरुन
एका खोबरयाच्या तुकड्यावरुन
तिकडुन आली आई पदर खोचुन
त्यांना घेतले ठेचुन ठेचुन
त्यांची बनवली चटणी
चटणी ठेवली बशीत
बाबा जेवले खुशीत.

गुलमोहर: 

बंटीबाबा – ऑस्कर नॉमिनी

Submitted by एम.कर्णिक on 2 January, 2012 - 14:13

ताई, आता चेंज कर भांडायचा मूड.
नाय्तर सग्ळे म्हण्तिल, "ही जोडी नाई गुड"

ताई ग ताई, मोठ्ठी तू, चिड्णं नाई बरं
धाक्ट्या भावाला म्हणावं, ”तुझं म्हण्णं खरं”

म्हणशील तसं तर मीही भांडाय्चा नाई
फक्त म्हणेन, ”थँक्यू, आय टोल्ड यू सो ताई”

आई बाजू तुझी घेते; बाबा माझी घेतात.
आबा नेहमी मध्यस्ती कराय्ला पुढे येतात.

माझ्या चुग्ल्या तू कर्तेस नि तुझ्या कर्तो मी;
पण, अग, खरं ठर्तं माझंच नेहमी.

म्हट्लं तर नेहमीच अस्तो माझा कांगावा.
खरं ठर्वून घ्याय्ला अ‍ॅक्टर तयारीचाच हवा.

गुलमोहर: 

बनुताई आणि बंटीतला तंटा

Submitted by एम.कर्णिक on 26 December, 2011 - 11:23

बनुताई:
बंटी, कबूल कर हं, की मीच आहे जिंक्ले
सग्ळे माझे फॅन्स मी वळवून पुन्हा घेत्ले.
आता पैजेचं चॉक्लेट दे, होताच तसा करार.
जा जा पाय्जे तर कर आईकडं तक्रार.

बंटीबाबा:
ताई, घे हे चॉक्लेट, जादा भाव नको मारू.
पैला डाव भुताचा असच आम्ही धरू.
दुसया डावात बघशिल तू आमची करामत,
मला हरू देतील? नाई आबांची शामत.

बनुताई:
टिव्टीव नको करू जास्त, सिनीयर मी आहे,
तुझ्यासारख्या चिट्मुर्‍याला नक्की भारी आहे.
उडवू नकोस नाक, आधीच आहे येवढुस्ससं.
माझ्याकड्नं धडे घे तू लिहायचं कसं.

बंटीबाबा:
आबा, हिला दाख्वू नका कविता पुढची.
कॉपी करून म्हणेल ती आहे बनूची.
तीऽऽऽ, जिच्यात आहे बंटीची गीतमाला,

गुलमोहर: 

बनुताईंची री-एंट्री

Submitted by एम.कर्णिक on 25 December, 2011 - 08:50

आबा, सांगू नका मला मायबोलीवर जायला
पार गुलमोहरचा, काबिज बंटीने आहे केला

कानामागून आला आणि झाला आहे तिखट
पारावर बघ्घा कस्सा बस्ला आहे चिक्कट

काक्या, माम्या, आत्या मावश्या फितुर त्याला झाल्या
बंटी बंटी करताना, बनूला विसरल्या

भेटले नाही थोडे दिवस म्हणून काय झालं?
कित्ती दिवस नाई का त्याना मी आनंदी केलं?

बंटी यायच्या आधी, सांगा, मीच होते ना?
सांगितल्यात नं कित्ती माझ्या गोष्टी तुम्ही त्याना?

मुलगा असला म्हणून इत्कं डोक्यावर घ्याय्चं?
आणि बनू मुल्गी म्हणून विसरुन तिला जाय्चं?

थिस इज नॉट फेअर, तुम्ही सांगा सगळ्याना
द्यायला लागेल म्हणाव त्याना याचा जुर्माना

गुलमोहर: 

चिऊताई चिऊताई

Submitted by विदेश on 25 December, 2011 - 00:38

चिऊताई चिऊताई
नकोस फिरकू अंगणात ग -
मम्मी-डॅडीचा गुडबॉय
कधीच तुला विसरला ग !

बोकेभाऊ बोकेभाऊ
टपून बसला ना तुम्ही -
मोठ्ठा गोळा लोण्याचा
कधीच मटकावला आम्ही !

बोकडदादा बोकडदादा
किती अजागळ दिसता हो -
तुमची दाढी पाहुन बायको
भांडत नाही का हो ?

हत्तीराव हत्तीराव
ब्रश कसा हो वापरला -
दोन दात दोन दिशांना
नीट का नाही धरला ?

गुलमोहर: 

बंटीबाबांची गीतमाला

Submitted by एम.कर्णिक on 24 December, 2011 - 13:30

आबा, तुमच्या वेळी होती 'बिनाका गीतमाला' *
सोळा गाणी मिळायची ऐकाय्ला तुम्हाला
पायरीला 'पाएदान' म्हणायचे अमिन सयानी
शेवट व्हाय्चा मालेचा 'सरताज' गाण्यानी

आइबाबाना सांग्ता तेव्हा मी पण हे ऐक्तो
गुंगुन जाता बोल्ताना ते देखिल ओळख्तो
आता ऐका माझी पण गाण्यांची ही लिस्ट
सग्ळी गाणी आहेत माझी ऑल टाइम फेव्हरीट

पहिल्या पायरीवर आहे 'भोलानाथचं गाणं'
दुसरीवरती आहे 'पळत्या झाडांना पहाणं'
त्या गाण्याच्या वर 'शाळा सुटली पाटी फ़ुटली'
नंतर 'छडी लागे छमछम' चा लागे नंबर

पाचवे पाएदानपर आएगी 'नानी तेरी मोरनी'
सल्लुभाईचं 'डिंका चिका' साहव्या पाएदानी
'नाचरे मोरा' येतंय नंतर पायरीवर सात्व्या

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - बालकविता