बनुताई आणि बंटीतला तंटा

Submitted by एम.कर्णिक on 26 December, 2011 - 11:23

बनुताई:
बंटी, कबूल कर हं, की मीच आहे जिंक्ले
सग्ळे माझे फॅन्स मी वळवून पुन्हा घेत्ले.
आता पैजेचं चॉक्लेट दे, होताच तसा करार.
जा जा पाय्जे तर कर आईकडं तक्रार.

बंटीबाबा:
ताई, घे हे चॉक्लेट, जादा भाव नको मारू.
पैला डाव भुताचा असच आम्ही धरू.
दुसया डावात बघशिल तू आमची करामत,
मला हरू देतील? नाई आबांची शामत.

बनुताई:
टिव्टीव नको करू जास्त, सिनीयर मी आहे,
तुझ्यासारख्या चिट्मुर्‍याला नक्की भारी आहे.
उडवू नकोस नाक, आधीच आहे येवढुस्ससं.
माझ्याकड्नं धडे घे तू लिहायचं कसं.

बंटीबाबा:
आबा, हिला दाख्वू नका कविता पुढची.
कॉपी करून म्हणेल ती आहे बनूची.
तीऽऽऽ, जिच्यात आहे बंटीची गीतमाला,
नाई का मी डिक्टेट काल केली तुम्हाला ?

गुलमोहर: 

आम्ही दोघांच्याही बाजुने आहोत बरे... आधी बनुताईने जीव लावला आणि नंतर बंटीबाबाने.

आता बंटीबाबाची गीतमाला बनुताईकडुन वाचुन घेणार Happy

सग्ळे माझे फॅन्स मी वळवून पुन्हा घेत्ले.

बनुताई हुशार आहे Happy

नाई का मी डिक्टेट काल केली तुम्हाला ?>>>> बनुताई, बंटीबाबा काय काय डिक्टेट करतील कळत नाही.....
कविता खूपच क्यूट....

मस्तच Happy

Pages