पोपटराव पोपटराव

Submitted by पुरंदरे शशांक on 9 January, 2012 - 22:36

पोपटराव पोपटराव

हिरवी शाल, लाल चोच
गळ्याभोती काळा गोफ

कसले भारी दिस्ता राव
पोपटराव पोपटराव

मिरच्या खाता तिखटजाळ
पेरुबरोबर ओली डाळ

शिट्ट्या बडबड कित्ती कित्ती
झोके घेता दांडीवरती

आवाजाची मस्त नक्कल
कुठून एवढी आणली अक्कल

कुण्या गावचे तुम्ही राव
हिरवे पाटील पोपटराव

गुलमोहर: 

वा !! मस्त आहेत पोपटराव.
एक बदल करतो, बघा आवडतो का.

मिरच्या खाता तिखट जाळ
अन पेरु बरोबर ओली डाळ

सुरेख. श्रीकांत यांनी सुचवलेला बदलही चांगला आणि चपखल असा आहे. स्वागतार्ह मानावा.

वा श्रीकांत - काय सुरेख व चपखल बदल सुचवलात - तुमच्या रसिकतेला मनापासून दाद..
येस कर्णिकसर - हा बदल करत आहे.
अशाच योग्य सुधारणा रसिक मान्यवरांकडून येणे अपेक्षित - कविता पूर्णपणे रसिकांचीच झाली असे होईल.