बंटीची नौटंकी

Submitted by एम.कर्णिक on 3 January, 2012 - 03:51

बंटी आता माझी पाळी, गप्प जरा रहा
भांडं तुझं आबांकडे फोडते कस्सं पहा !

एकेक करून युक्त्या तुझ्या फोडते आबांकडे
कांगावा कर्तोस कसा ते घडघड वाचते धडे

ढक्लून मला ओरडतोस तू, “लाग्लंऽ, लाग्लंऽ, लाग्लंऽ”
आबांकडून म्हण्वायला, “अरेरेरेऽ, कुणी मारलं ?”

फसतात आबा नि घेतात पप्पी, लाग्लं नसलं तरी
कर्तोस तू मग चालू तुझ्या तक्रारींची जंत्री

मी पण आहे ओळ्खुन तुझ्या अस्ल्या सगळ्या युक्त्या
आबाना सांग्ते, “द्या एक चापट भागावरती दुख्त्या”

गरिब बिचारे आबा म्हण्तात, “नाइनाई गं बनुताई,
बंटीबाबा कळ्वळ्ला, तो उगाच रड्णार नाई”

आईच तेव्हा येउन सांग्ते, “लबाड आहे पक्का !
त्यानंच मारला असेल बिचार्‍या बनुताईला धक्का.

अहोऽ, मला ठाउक आहेत या त्याच्या नौटंकी
आकांडतांडव का हे माइताय? चॉक्लेट हवाय नक्की

काही केलं तरि नाइ मिळणार आज दुसरं चॉक्लेट
जोवर नाही संप्वत ब्रेकफास्ट ब्रेड आणि ऑम्लेट

नाय्तर देईन मीच आता रट्टे सप्पासप्प !"
लग्गेच कस्सा होतोस मग तू शाह्ण्यासारखा गप्प ?

एक्दम कोठे जाते तेव्हा मारलेल्याची दुखी?
आबा, ठेवा लक्शात्त बरं का ही पैली नौटंकी

गुलमोहर: 

छान Happy

Happy

सर्वांचे मनःपूर्वक आभार. बंटीबाबांचं यावर काय म्हणणं आहे ते लवकरच ते मांडतील असा त्यांचा निरोप आहे.

"तक्रारी करून आणि नौटंक्या करून जीवनात आनन्द देणार्‍या चैतन्य निर्माण करणार्‍या सर्वांच्या
बंटी बनुताईंना हे वर्षच नाही तर त्यांच्या आयुष्यातील पुढील सगळी वर्षं सुखाची, समृद्धीची आणि आनंदाची जावोत.."

छान कविता.

पुन्हा एकदा आभार. यापुढची कविता 'बंटीबाबा - ऑस्कर नॉमिनी' ही या कवितेशी, बंटी आणि बनू यांच्यातली एकमेकावर कुरघोडी करायच्या प्रयत्नांची निदर्शक अशा स्वरुपाने जोडलेली आहे. दोन्ही एकत्र वाचल्यास जास्त मजा येते म्हणून या कवितेला रिव्हाइव्ह करत आहे. क्षमा असावी.