आबा, तुमच्या वेळी होती 'बिनाका गीतमाला' *
सोळा गाणी मिळायची ऐकाय्ला तुम्हाला
पायरीला 'पाएदान' म्हणायचे अमिन सयानी
शेवट व्हाय्चा मालेचा 'सरताज' गाण्यानी
आइबाबाना सांग्ता तेव्हा मी पण हे ऐक्तो
गुंगुन जाता बोल्ताना ते देखिल ओळख्तो
आता ऐका माझी पण गाण्यांची ही लिस्ट
सग्ळी गाणी आहेत माझी ऑल टाइम फेव्हरीट
पहिल्या पायरीवर आहे 'भोलानाथचं गाणं'
दुसरीवरती आहे 'पळत्या झाडांना पहाणं'
त्या गाण्याच्या वर 'शाळा सुटली पाटी फ़ुटली'
नंतर 'छडी लागे छमछम' चा लागे नंबर
पाचवे पाएदानपर आएगी 'नानी तेरी मोरनी'
सल्लुभाईचं 'डिंका चिका' साहव्या पाएदानी
'नाचरे मोरा' येतंय नंतर पायरीवर सात्व्या
'लक्कडीकी काठी' हे पाएदानावर आठव्या
आणि आता ऐका बरंऽऽ 'चोटीपर'चं साँग
ओळख्लत का? अग्दी कर्रेक्ट! नाही तुम्ही राँग
’चिल्लर पार्टी’ आय्टम साँगची गोडीच अफ़्लातून
'आजा रे छोकरे, भेजा न ठोक रे आरएलाए आपून' **
-आबा, स्टार द्यायला सांगितले तिथल्या लिंका द्यायला विसरू नका. नाय्तर ते काय ते कुणाकुणाला कळणार नाई आणि माझ्या कवितेची मज्जाच जाईल.
-ठीकाय बंटीबाबा, या बघा दिल्या.
* http://www.youtube.com/watch?v=PSSZxw4K9cY&feature=related
** http://www.youtube.com/watch?v=Aa889-1IRcM
छान.
वा बंटीबाबांची चतुरस्त्रता
वा बंटीबाबांची चतुरस्त्रता जबरदस्तच आहे - जुनी - नवीन दोन्ही गाणी माहितीएत......
मस्त कविता.....
मस्त!!! बंटीबाबा या क्षेत्रात
मस्त!!!
बंटीबाबा या क्षेत्रात छान करियर करू शकतील नै ?..........नेक्स्ट टू अमिन सयानी साहब!!
झक्कास
झक्कास
झक्कास्स मुकुंददा, सॉलीड आहे
झक्कास्स
मुकुंददा, सॉलीड आहे बर्का तुमचा बंटीबाबा !!
(तेवढा शिर्षकात एक अनुस्वार राहीलाय तो देवुन टाका ना)
छान
छान
विशाल, थँक्स. दिला हो.
विशाल, थँक्स. दिला हो.
कविता झकास. नऊच गाणी झाली की
कविता झकास.
दहावं गाणं कोणतं, याची मोठी उत्सुकता लागून राहिली हो. 
पहिल्या पायदानवरचं गाणं 'चोटीवर' असतं. पैला नंबर नाही का आला त्याचा?
नऊच गाणी झाली की पण बंटी बाबा.
शिवाय दहाव्या पायदानवरचं गाणं 'चोटीवर' नस्तं.
प्राची मावशी, आमच्या बाबानी
प्राची मावशी,
आमच्या बाबानी घरी शिडी आणले नं तिला आठच पायर्या आहेत. नववा टॉप, बसायला असतो. मी आत्ताआत्ताच शिडी चढायला शिकलो नं तेव्हा आईनं तळातल्या पायरीला पयला नंबर सांगितला होता आणि मग दुसरीवर पाय ठेव, आता तिसरीवर ठेव असं सांगत वर चढव्लं. अमीन सयानींच्या आईनं त्याना टॉपपास्नं उतरायला सांगित्लं होतं का ग मग? काय कळत नाई नं?
-बंटीबाबा
अश्शं झालं होय.
अश्शं झालं होय.
मस्तय
मस्तय
वा वा बंटीबाबा बहोत खुब.
वा वा बंटीबाबा बहोत खुब.
गाणे ऐकते आता यूट्युब वर 
कविता छान बंटीबाबांची
कविता छान
बंटीबाबांची गाण्यांची लीस्ट एकदम भारी........
(No subject)
सुंदर!
सुंदर!
मस्तच
मस्तच
मस्ताय की बंटीबाबाची लिस्ट.
मस्ताय की बंटीबाबाची लिस्ट.
बंटीबाबानी बिनाका गीतमालेलाही
बंटीबाबानी बिनाका गीतमालेलाही further अजरामर करून टाकलं.
आवडली गीतमाला! रच्याकने,
आवडली गीतमाला!
रच्याकने, आमच्या लिस्टवर 'कोलावरी डी' उच्चतम पायरीवर आहे!
बंटीबाबा रॉक्स 'आजा रे
बंटीबाबा रॉक्स
'आजा रे छोकरे, भेजा न ठोक रे आरएलाए आपून' **>>>>>सह्हिए!!!
बंटीबाबा, बनुताई आणि आबांनाही नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!
मस्ताच आहे बंटीबाबाची लिस्ट.
मस्ताच आहे बंटीबाबाची लिस्ट.
भारी आहे
भारी आहे
बंटीबाबा जोरात आहेत. लिस्ट
बंटीबाबा जोरात आहेत. लिस्ट आवडेश.