Submitted by एम.कर्णिक on 25 December, 2011 - 08:50
आबा, सांगू नका मला मायबोलीवर जायला
पार गुलमोहरचा, काबिज बंटीने आहे केला
कानामागून आला आणि झाला आहे तिखट
पारावर बघ्घा कस्सा बस्ला आहे चिक्कट
काक्या, माम्या, आत्या मावश्या फितुर त्याला झाल्या
बंटी बंटी करताना, बनूला विसरल्या
भेटले नाही थोडे दिवस म्हणून काय झालं?
कित्ती दिवस नाई का त्याना मी आनंदी केलं?
बंटी यायच्या आधी, सांगा, मीच होते ना?
सांगितल्यात नं कित्ती माझ्या गोष्टी तुम्ही त्याना?
मुलगा असला म्हणून इत्कं डोक्यावर घ्याय्चं?
आणि बनू मुल्गी म्हणून विसरुन तिला जाय्चं?
थिस इज नॉट फेअर, तुम्ही सांगा सगळ्याना
द्यायला लागेल म्हणाव त्याना याचा जुर्माना
तुम्हाला पण सांगते, आज वेळ नाई मला
कार्टून शो ला जायचंय घेऊन बंटीबाबाला
गुलमोहर:
शेअर करा
कर्णिक साहेब १) तुमच्या
कर्णिक साहेब
१) तुमच्या बंटीला आता कधीतरी माबो वर घेउन या, इथल्या थोरामोठ्याना भेटवा
२) त्याच्या सोबत त्याचे काही मित्रमैत्रिणी आहेत का? त्यानाही घेऊन या.........
३) बनी -बन्टॅच्या भान्डणाचा एखादा किस्सा अहे का हो.........
उद्देश : बंटी या पात्रास अजरामर करावे त्याचे आयुष्यातील असे छोटे मोठे किस्से कहाण्या तुमच्या कवितातून नक्कीच अजरामर होणार तेसेच बंटीमाबोवर येवून , इथल्या थोरामोठ्याना भेटून
माबोकरानाही अमर करू शकतो असे मनोमन वाटत आहे .खूप धमाल येईल नै.!
पुलेशु !!!!!
सह्हिए बनुताईची री-एन्ट्री
सह्हिए बनुताईची री-एन्ट्री
काक्या, माम्या, आत्या मावश्या फितुर त्याला झाल्या>>>>>यात काका, मामा, दादा पण बरं का?
री-एंट्री झोकदार
री-एंट्री झोकदार
जिप्सीकाका, काका, मामा, दादा
जिप्सीकाका,
काका, मामा, दादा हे सग्ळे मुल्गे आहेत नं ! त्यांचं काय, असणारच ते बंटीच्या बाजूनं. पण काक्या, माम्या, आत्या, मावश्या या तर मुलग्या ! त्यानी पण तसं कराय्चं? म्हणून मी त्याना फितूर म्हट्लंय.
-बनुताई
नाही हो बनूताई. आम्ही नाही
नाही हो बनूताई. आम्ही नाही विसरलो तुम्हांला. बंटीबाबांना भेटलो की तुमची नक्की आठ्वण निघायची. तेव्हा न रागावता अश्याच येत रहा आमच्या भेटीला.
काका, मामा, दादा हे सग्ळे
काका, मामा, दादा हे सग्ळे मुल्गे आहेत नं ! त्यांचं काय, असणारच ते बंटीच्या बाजूनं. पण काक्या, माम्या, आत्या, मावश्या या तर मुलग्या ! त्यानी पण तसं कराय्चं? म्हणून मी त्याना फितूर म्हट्लंय.

-बनुताई>>>>>>सह्हीए
बनुताईंची री एंट्री जोरदार
बनुताईंची री एंट्री जोरदार झालेय.
बनुताई वेलकम बॅक बरका
बनुताई
वेलकम बॅक बरका
मस्त! प्राची, +१
मस्त! प्राची, +१
वा कर्णिकसर,.... मस्त, गोड,
वा कर्णिकसर,.... मस्त, गोड, क्यूट कविता.......
फारच रागावलेल्या दिसतात बनुताई.........
मस्तच !!!! बनुताई स्वागत
मस्तच !!!! बनुताई स्वागत तुमचे
बनुताई चांगल्याच रागावलेल्या
बनुताई चांगल्याच रागावलेल्या दिसतायत.
फार गोड तक्रारी आहेत पण त्यांच्या.
(No subject)
मस्तच
मस्तच
वा वा.. बनुताई आलात, छान..
वा वा.. बनुताई आलात, छान.. आता बंटी बाबाच्या आणि तुमच्या गमती सांगा बरे
मस्त वेलकम बॅक बनुताई!
मस्त
वेलकम बॅक बनुताई!
वेलकम बॅक बनुताई
वेलकम बॅक बनूताई. मोठ्ठ
वेलकम बॅक बनूताई.
मोठ्ठ डेअरी मिल्क घ्या आबांकडून आमच्यातर्फे. 
मस्त कमबॅक बनुताई. अगदी खरे
मस्त कमबॅक बनुताई. अगदी खरे आहे तुझे; जुर्माना आता मुकुंदजींकडूनच घे मोठ्ठा.
हा हा मस्त
हा हा मस्त
(No subject)
मस्त
मस्त
वेलकम बॅक बनुताई! आणि या
वेलकम बॅक बनुताई!
आणि या बनीला जवळ घेऊन एक गालगुच्चा.
मस्तच आहे.
मस्तच आहे.
वा! वा! मस्त एंट्री बनुताई!
वा! वा! मस्त एंट्री बनुताई!
मित्रानो, बनुताई, बंटीबाबा
मित्रानो,
बनुताई, बंटीबाबा आणि मी आ(जो)बा, सगळेच तुमचे ॠणी आहोत. खूप खूप आभार.
खुपच छान
खुपच छान
काक्या, माम्या, आत्या मावश्या
काक्या, माम्या, आत्या मावश्या फितुर त्याला झाल्या
बंटी बंटी करताना, बनूला विसरल्या
नाही विसरले गं तुला छकुले, बंटी आला की त्याच्याबरोबर तुझीच आठवण येत होती.
आता दोघेही एकत्र येत जा.....
तुम्हाला पण सांगते, आज वेळ नाई मला
कार्टून शो ला जायचंय घेऊन बंटीबाबाला
काय भाव खातेय बनुताई... नाकावरचा राग दिसतोय स्पष्ट.
बनुताईंचे रागाने फुगवलेले गाल
बनुताईंचे रागाने फुगवलेले गाल आणि लाल झालेल नाक डोळ्यासमोर आलं, कविता वाचल्यावर....ही देखील कविता मस्तच!