चटणी

Submitted by शेफाली on 3 January, 2012 - 00:17

कोथिंबिर, मिरची, आल आले
त्यांचे एकदा भांडण झाले
कश्यावरुन क्श्यावरुन
एका खोबरयाच्या तुकड्यावरुन
तिकडुन आली आई पदर खोचुन
त्यांना घेतले ठेचुन ठेचुन
त्यांची बनवली चटणी
चटणी ठेवली बशीत
बाबा जेवले खुशीत.

गुलमोहर: 

छान आहे.
कोथिंबिर, मिरची, आल आले
त्यांचे एकदा भांडण झाले
कश्यावरुन क्श्यावरुन
एका खोबरयाच्या तुकड्यावरुन
आई भरली रागे
धावत आली आई पदर खोचुन
खोबर्‍यासकट सर्वाना
तिने काढ्ले ठेचुन ठेचुन
त्यांची बनवली चटणी
चटणी ठेवली बशीत
बाबा जेवले खुशीत.

छानच आहे. आई, बाबा, ताई, दादा हे काय करतात याकडे बाळे कुतुहलाने पहात असतात. त्यामुळे बाबा जेवले खुशीत आणि आईने तसे सांगितले की बाळानाही खुशी होते आणि ती टाळ्या पिटतात. तेव्हा ही सुरेख बालकविताच आहे हो प्रद्युम्न.