हुर्रे.... हुर्रे....
परिक्षा संपली रे
अभ्यासाला बुट्टी रे
सुरु झाली सुट्टी रे
चला लवकर खेळायला
बॅट बॉल काढा चला
घसरगुंडी, झोपाळा
खुणावती चला खेळा
सापशिडी, कॅरम, पत्ते
दुपारचे काम फत्ते
चित्रे काढू छानशी
करु दोस्ती रंगांशी
खेळून सगळे दमले फार
आईस्क्रीम मस्त गारेगार
भेळ - कैरी म्हणून बघा
तोंडाला पाणी धबाधबा
(भेळ-कैरी म्हणताक्षणी
तोंडाला सुटलं पाणीच पाणी)
चांदोबा......
आभाळात आहे का चांदोबाचे घर
घरात कुठे बसतो हा? फिरत असतो रात्रभर
किती याला मित्र! नी किती मैत्रिणी!
खेळत असेल खेळ; नि गात असेल गाणी!
खाऊ काय खात असतील सगळे हे मिळून?
दिसत नाहीत स्टॉल यांचे रस्ते भरभरून...
आई बरी ओरडत नाही याचे बकोट धरुन..
"अभ्यास कोण करणार?... झाले उंडारून ???"
अधूनमधून नक्कीच याची एक्झॅम येत असणार...
तरीच घरी बसतो आणि दिसत नाही आभाळात...
सरसर सर्सर झाडावर
सरसर सर्सर फांद्यांवर
तुर्तुर तुर्तुर पळते खार
शेपूट उडवत झुबकेदार
लुकलुकते काळे मणी
दिसते कशी गोजीरवाणी
पुढचे पाय उंचाऊन
हातात जणू खाऊ धरुन
खाते कशी कुरुम कुरुम
खार बघा जरा दुरुन
जवळ जाताच पळते लांब
खारुताई भित्री जाम
सेतूमधले काम जाणून
श्रीरामाने हात फिरवून
आशीर्वाद दिला भरभरून
मिरवते अजून पाठीवरुन .......
गरगर गरगर
फिरतो पंखा
आजोबांना
येतात शिंका
घरघर घरघर
फिरतो मिक्सर
आजी म्हणते
"आली चक्कर"
शूs शूs शिट्टी
कूकर देतो
"भात शिजला"
मम्मिला म्हणतो
टिंग्टाँग टिंग्टाँग
वाजते बेल
पप्पा येतात
घेऊन भेळ...
सगळे जेव्हा
जातात झोपी
घड्याळ करते
टिकटिक मोठी
- ग्लोरी
झूss प झूss म... झूss प झूss म...
वर्वर वर्वर गेला झोका
उंच उंच हा झोका
झूss पकन आला खाली
मजेमजेचा हा झोका
वरखाली झुलतो हा
त्याचा सुरेलसा ठेका
छान लयीचा झोका
गाणे गाई हा झोका
आभाळात नेता नेता
जमिनीवर आणतो हा
झुलताना याच्यावर
मनात झुलतो तो झोका
कावळा करतो कुहू कुहू
कोकिळा करते काव काव
फोडते मांजर डरकाळी
वाघोबा करतो म्याव म्याव
पळे सर सर सर हत्ती
निवांत चाले हळू खार ती
कोल्होबा चिडीचूप बसतो
ससोबा गुरगुरगुर करतो
आरोळी उंदीरमामाची ती
वनराजाला वाटे भीती
माकड चाले जमिनीवर
कासवाची उडी झाडावर
आई छान सांगते गंमत
बंडू ऐके पेंगत पेंगत
रंगुनी जाई बघत बघत
स्वप्नामधली जमाडीजंमत
कूकरच्या शिट्टीचा आवाज कसा लिहावा हे कुणी सांगेन का ? कृपया.
पाऊस आला..... गारांचा गारांचा
वारा सुटला...... जोराचा जोराचा
पाऊस आला..... गारांचा गारांचा
होड्या माझ्या...... गमतीच्या गमतीच्या
लाल पिवळ्या...... रंगांच्या रंगांच्या
एक एक होडी ...... सोडली रे सोडली रे
हाले डुले .......... मागे पुढे मागे पुढे
एक एक होडी ...... तरली रे तरली रे
गिरकी घेऊन ....... बुडली रे बुडली रे
भिजता किती....... बास रे बास रे
आईची हाक ....... आली रे आली रे
चला घरात जाऊ रे..... जाऊ रे
गरम चहा पिऊ रे...... पिऊ रे....
बडबड गाणे - ताईचे
थेंब थेंब पाss णी
बोल बोल राss णी.....
चल चल जाss उ
गाऊ गाss णी
खेळू दोss घी
छानसे काssही ......
गोल गोल चेंss डू
छोटीशी भावss ली
झोका देss ते
तुझी गं ताss ई .....
मोठी होss तू
खेळू लंगss डी
आत्ता एss वढंच
अपडी थss पडी ....
थेंब थेंब पाss णी
बोल बोल राss णी.....
वाद्यवृंद - विविधतेत एकता म्हणजेच Unity in Diversity
पेटी म्हणते सा रे ग
तबला म्हणतो धाक धिक ध
शिळ घाले बासुरी अन
ढोल म्हणतो धडाम ध
धुम तना धिंदिंत ननाना
धुम तना धिंदिंत ननाना
धुम तना धिंना धिना
गिटार म्हणतं डिंग डींग डिंग
मेंडॉलीनची टींग टींग टींग
वायोलिन करे कूईं-कूईं कुई-कुई
तान घेते सतार गं
टींन टींन टिडी टीडी टिडी टीडी टींन
टींन टींन टिडी टीडी टिडी टीडी टींन
पैंजण करती छन छन छन
टाळ करती खण खण खण
घुंगरांची रुणझूण चाले
ताशा वाजे ढडाम ढं
ढींकचिका ढींकचिका ढींकचिका ढींकचिका
ए.. ए.. ए... ए.. ए.. ए.. ए... ए..
ट्रंपेट काढतो रे भोंगा
सेक्साफोनचा रे दंगा