Submitted by ग्लोरी on 7 April, 2012 - 04:35
गरगर गरगर
फिरतो पंखा
आजोबांना
येतात शिंका
घरघर घरघर
फिरतो मिक्सर
आजी म्हणते
"आली चक्कर"
शूs शूs शिट्टी
कूकर देतो
"भात शिजला"
मम्मिला म्हणतो
टिंग्टाँग टिंग्टाँग
वाजते बेल
पप्पा येतात
घेऊन भेळ...
सगळे जेव्हा
जातात झोपी
घड्याळ करते
टिकटिक मोठी
- ग्लोरी
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
चांगलं जमलंय बडबडगीत. बालगीतं
चांगलं जमलंय बडबडगीत. बालगीतं लिहीणं वाटतं तितकं सोपं नाही
शूs शूs शिट्टी, टिंग्टाँग टिंग्टाँग - या कडव्यात बदल करायला हवेत