सरसर सर्सर झाडावर
Submitted by पुरंदरे शशांक on 9 April, 2012 - 05:53
सरसर सर्सर झाडावर
सरसर सर्सर फांद्यांवर
तुर्तुर तुर्तुर पळते खार
शेपूट उडवत झुबकेदार
लुकलुकते काळे मणी
दिसते कशी गोजीरवाणी
पुढचे पाय उंचाऊन
हातात जणू खाऊ धरुन
खाते कशी कुरुम कुरुम
खार बघा जरा दुरुन
जवळ जाताच पळते लांब
खारुताई भित्री जाम
सेतूमधले काम जाणून
श्रीरामाने हात फिरवून
आशीर्वाद दिला भरभरून
मिरवते अजून पाठीवरुन .......
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा