Submitted by विदेश on 25 March, 2012 - 06:42
कावळा करतो कुहू कुहू
कोकिळा करते काव काव
फोडते मांजर डरकाळी
वाघोबा करतो म्याव म्याव
पळे सर सर सर हत्ती
निवांत चाले हळू खार ती
कोल्होबा चिडीचूप बसतो
ससोबा गुरगुरगुर करतो
आरोळी उंदीरमामाची ती
वनराजाला वाटे भीती
माकड चाले जमिनीवर
कासवाची उडी झाडावर
आई छान सांगते गंमत
बंडू ऐके पेंगत पेंगत
रंगुनी जाई बघत बघत
स्वप्नामधली जमाडीजंमत
गुलमोहर:
शेअर करा
(No subject)