कामावर जातांना..

Submitted by निनाव on 26 December, 2010 - 04:24

चाललो ग बाळा मी कामावरी
त्रास देऊ नको बर तुझ्या आईस
येतो मी आज लवकर संध्याकाळी
येताच तुला बागेत फिरवायला मी नेईन

टेरेस वरून करशील ना ग मला 'टाटा'
देशील ना गोड तुझा तो उडणारा 'पापा'
दिवस मग माझा जाईल निघून चटकन
घेईन तुला मिठीत येताच घरी पटकन

सांग तुला काय आणू येतांना कामावरून
माझ्या कडील यादी तर गेली आहे भरून
तू म्हणशील आणीन ग ते तुझ्या साठी
तुझा बाबा आहे फक्त तुझ्झ्याच साठी...

गुलमोहर: 

छान आहे

जमतय जमतय.
जमेल अजूनही..

तुम्ही हल्ली ब-याच्शा कविता बालकविता किंवा काकाक मधे पोस्ट करताय आणि ललित मात्र कविता विभागात पोस्ट केलंय. असं का ?