आशीर्वाद

Submitted by एम.कर्णिक on 24 December, 2010 - 01:11

माझे मोठे भाऊ श्री.यशवंत कर्णिक हे प्रथितयश कादंबरीकार आणि कथाकार आहेत. त्यांच्या तीन कादंबर्‍या आणि ५ कथासंग्रह 'आजपर्यंत' प्रकाशित झाले आहेत. आजपर्यंत म्हणतो एव्हढ्यासाठी की आज वयाची ८५ वर्षे पुरी झालेली असूनही त्यांचे लेखन अजूनही अव्याहत चालू आहे. आणखी तीन पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. त्यांनी 'बनुताई आणि बंटीबाबा' हे माझे पुस्तक वाचून बनुताईना पुढील आशीर्वाद दिला. तुम्ही सर्व वाचकही बनुताईंच्या प्रेमात आहात म्हणून तुम्हाला वाचायला इथे देतो.

"I send my personal blessings to Banutai and Buntybaba in the following rhyme :

" बनुताई बनूताई, मोठं व्हायची नका करू घाई
अशाच गोड, लहान रहा, आजोबांच्या कडे पहा
तुमचा सहवास त्यांचं सुख, दुसरी नाही त्यांना भूक
बंटीबाबा तुमचा भाऊ, त्याला तुम्ही भरवा खाऊ
आजोबांच्या मांडीवरती भरेल तुमची रोजच शाळा
आयुः भर मग दोघे मिरवा बुद्धी नि ज्ञानाच्या माळा "
Love
Bhaikaka ajoba"

गुलमोहर: