बालकविता

सुर्योबा

Submitted by सावली on 2 July, 2010 - 01:28

सुर्योबा तू कधी भिजलायस का?
पावसात माझ्यासारखा नाचालायस का?
पावसात लपून असा बसतोस काय?
चमचम विजेला घाबरतोस कि काय?
इंद्राचा पूल उतरून खाली ये एकदा
माझ्याबरोबर पावसात भिज बर जरासा.
रंगीत होड्या आणि पाण्यातल्या उड्या
माझ्याशी भरपूर खेळून घे.
पावसाची गंमत बघून घे.

गुलमोहर: 

आटपाट नगरी

Submitted by कविन on 24 June, 2010 - 07:40

ऐक बाळा! तुझ्या साठी रचली कहाणी
आटपाट नगरा मधे रहात होती राणी

आवडायाचे तिला तिथले खळाळते पाणी
खळाळत्या पाण्यासह म्हणायची गाणी

गोड गोड गाणी गात ती चालायची वाट
आवडत मुळ्ळी नव्हता तिला उगा थाटमाट

राणी सारखाच होता अगदी; आटपाटचा राजा
कामाचा ना केला त्याने कध्धी गाजावाजा

आटपाट नगरामधे सारेच होते गोड
कध्धी नाही काढायाचे कुणाचीही खोड

आवडेल का ग फिरायला आटपाट नगरीत?
पण जायच्या आधी शिकून घ्यावी लागेल तिथली रीत

चालत नाही मारामारी, ना हेवेदावे काही
उगा कुरापत करु पहायाची नाही

फुलपाखराला पकडलं तर शिक्षा होते भारी
शिक्षा म्हणून कट्टी घेतात आटपाटची सारी

गुलमोहर: 

कल्लेवाल्या माशाला फुटल्या मिश्या दोन

Submitted by एम.कर्णिक on 23 June, 2010 - 13:45

बनुताई आता मोठ्या झाल्यात. बंटीबाबाला कडेवर घेऊन एंजल मासे असलेल्या फिश टँकसमोर हे गाणं म्हणून त्याला रिझवतात. प्रत्येक कडव्यानंतर "है" म्हणत पहिलं कडवं रिपीट करताना बंटीबाबाला हळूच एक झोका देतात तेव्हाचं बंटीबाबाचं खिदळणंही ऐकण्यासारखं असतं.

कल्लेवाल्या माशाला फुटल्या मिश्या दोन
मनीमाउनं केला त्याला ट्रिंग ट्रिंग फोन
है........

"अरे फिशी फिशी, तुला आली कशी मिशी?
टोचेल न रे मला, मग खाऊ तुला कशी?"
है........

मासा हसला गडगडून म्हटला "द्दे ट्टाळी,
मनीमाऊ, खा आता फुटासची गोळी"
है.......

पाण्यात बुडवुन पंजा बसली मनीमाऊ टपून
चान्स बघता बघता गेली तिथच तशीच झोपून
है.......

गुलमोहर: 

आज्जी आजोबा -बडबड कविता

Submitted by सावली on 15 June, 2010 - 23:35

आज्जी ग आज्जी ग
कसली केलीस भाजी ग?
वरणभात कालवून दे
एक एक घास भारवून दे

आजोबा हो आजोबा
घोडा घोडा करताय ना?
पाठीवर तुमच्या बसेन मी
घरभर फिरेन मी

आज्जी ग आज्जी ग
कसलं चित्र काढू ग?
छानसे रंग आणून दे
एवढ चित्र रंगवून दे

आजोबा हो आजोबा
गोष्ट एक सांगताय ना?
आज्जीची गोधडी पांघरून बसेन
ऐकता ऐकता झोपून जाईन.

गुलमोहर: 

गोगलगाय (बडबड कविता)

Submitted by सावली on 15 June, 2010 - 20:38

गोल गोल गोगलगाय
पानावरून घसरत जाय.
शिंगं डोक्यावर आणि डोळे शिंगावर
का ग तुझ घर पाठीवर?
हात मी लावला कि हरवून जातेस
सांगतरी पुन्हा कधी बाहेर येतेस?
सांग ना माझ्याशी खेळतेस काय?
गोल गोल गोगलगाय

गुलमोहर: 

गोळा गोळा ..सुर्र सुर्र

Submitted by सत्यजित on 12 June, 2010 - 18:26

थंड थंड बर्फाला किस किस किसला
किस किस किसताना खस खस हसला

पाण्यासारखा बर्फ झाला गोरा गोरा पान
गोळेवाला आता त्याचा मेकअप करणार छान

सुर्र सुर्र भुरका मारत मस्त गोळा खाऊ
रंगलेली जिभ मग आरशात पाहू

-सत्यजित.

गुलमोहर: 

आभाळबाबाची शाळा ...

Submitted by विशाल कुलकर्णी on 12 June, 2010 - 08:59

कडाड कड कड कडाड कड
आभाळबाबाची छडी कडकडे
सैरावैरा मग धावत सुटले
छबकडे नभाचे इकडे-तिकडे.....!

नकोच मजला शाळा आता
नकोच अन ते क्लिष्ट धडे
गाऊ गाणी आनंदाची अन्
चल जावू या बाबा भुर गडे ....!

वारा मास्तर शिळ घालती
कवायतींचे अन् देती धडे
वीजबाई शिस्तीच्या भारी
पाहूनी तया हृदय धडधडे...!

निसर्गसरांचा तास मजेचा
रेखाटू चित्रे मिळूनी गडे
वीज घालीते गणिते अवघड
ढगबाळाला मग येइ रडे...!

माय धरित्री वाट पाहतसे
डोळे तियेचे आकाशाकडे
दांडी मारूनी शाळेला मग
ढगबाळ धावती आईकडे...!

माय-पुतांची भेट अनोखी
सुगंध मायेचा जगी दरवळे
पाऊस आला, पाऊस आला
आनंद होई मग चोहीकडे ....!

गुलमोहर: 

वर्षाराणी

Submitted by अलका_काटदरे on 5 June, 2010 - 08:32

हासत नाचत आली वर्षाराणी
लुटूपुटू पावले टाकीत, दुडूदुडू धावत

विशाल गगनाचे पितृवत छत्र
विशाल धरतीचे नातीवर नेत्र

लठ्ठ काळे मेघ जसे अंगरक्षक
बिजली, दाई, तिला दावी मशाल

विदूषक मेघांचे काम रिझवण्याचे
स्वगडगडाटाने हसवून लाड करण्याचे

चालता चालता धावू लागली राणी
अंगरक्षकांच्या तोंडचे पळाले पाणी

पकडतांना तिला देऊ लागले ते भयानक टक्कर
घेऊनी हाती मशाल बिजली टाकू लागली चक्कर

पण राणीला लागलेली आजीला भेटण्याची आंस
भेटल्या दोघी आणि चढली गोष्टींची रास !

गुलमोहर: 

लबाड कोण?

Submitted by अरुण मनोहर on 31 May, 2010 - 05:49

लबाड कोण?

उंदीरमामा ईटुक मिटुक
पळत होता दुडूक दुडूक
कपाटात चिंटुची टोपी लहान
रेशमी गोंडा भरजरी छान

पाहीले हळूच मिचकून बिचकून
येतयं का कोणी चुकून माकून
रात्र होती, सारा वाडा थकला
चिंटु आईच्या कुशीत झोपला

उचलली टोपी चटकन पटकन
पळाला उंदीर फ़ुदकण टुणकन
चढवली टोपी डोक्यात तोऱ्यात
नाचला घरभर अंगणात सज्जात

माझी टोपी झक्क! ढुम ढुम ढुमाक्क
माझी टोपी मस्त! ढुम ढुम ढुमाक्क
ऐटीत बसला होता एक राजा
म्हणला कोण वाजवतो बेंडबाजा?

काढ टोपी बारकुड्या भिकारड्या
फ़ार करतोस खोटारड्या लबाड्या
राजाने हिसकाऊन घेतली टोपडी
उंदीरमामांची वळली बोबडी

राजा नाचला ढॅन्गची ढॅन्गची

गुलमोहर: 

आंधळ्याच नशीब

Submitted by शानबा५१२ on 31 May, 2010 - 03:22

अंधा-या रात्री चालत होता एक आंधळा
भुकेले पोट व घेउन सुका गळा
रात्र की दीवस त्याला न कळे,कसे कळणार होते डोळे आंधळे,
रस्त्यावरच्या वाहनांची गती ना कळली,
गतिमान गाडी त्याच्या देहावर वळली.
"परमात्म्याने ही सजा का दीली?",
कळायच्या आत हे,त्याची प्राणज्योत विझली.
गेला मात्र स्वर्गात्,भेटला परमात्मा,
दु:खी होउन 'त्याने',सोडला धरतीवर आत्मा.
आंधळ्याची ती आत्मा होती तर डोळस,
पाहुन धरतीवरील दु:ख झाला दु:खाचा कळस.
असह्य झाल्या त्या वेदना,गेला तो वरती,
म्हणे "काय पाहु ती दु:खी व लोभी धरती"
परमात्मा म्हणे , "तु दु:खी खाली पण व वरती,
काय कामाची तुझ्या ती सुंदर,रम्य धरती?"

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - बालकविता