वर्षाराणी

Submitted by अलका_काटदरे on 5 June, 2010 - 08:32

हासत नाचत आली वर्षाराणी
लुटूपुटू पावले टाकीत, दुडूदुडू धावत

विशाल गगनाचे पितृवत छत्र
विशाल धरतीचे नातीवर नेत्र

लठ्ठ काळे मेघ जसे अंगरक्षक
बिजली, दाई, तिला दावी मशाल

विदूषक मेघांचे काम रिझवण्याचे
स्वगडगडाटाने हसवून लाड करण्याचे

चालता चालता धावू लागली राणी
अंगरक्षकांच्या तोंडचे पळाले पाणी

पकडतांना तिला देऊ लागले ते भयानक टक्कर
घेऊनी हाती मशाल बिजली टाकू लागली चक्कर

पण राणीला लागलेली आजीला भेटण्याची आंस
भेटल्या दोघी आणि चढली गोष्टींची रास !

(संदर्भ -जुनी वही . दहावी-अकरावी दरम्यान लिहिलेली, म्हणूनही बालकविता! )

गुलमोहर: 

सुंदरच झालीय कविता.. आवडली

खरं तर बालकविता लिहीणं महाकठीण काम आहे... !!!