आभाळबाबाची शाळा ...

Submitted by विशाल कुलकर्णी on 12 June, 2010 - 08:59

कडाड कड कड कडाड कड
आभाळबाबाची छडी कडकडे
सैरावैरा मग धावत सुटले
छबकडे नभाचे इकडे-तिकडे.....!

नकोच मजला शाळा आता
नकोच अन ते क्लिष्ट धडे
गाऊ गाणी आनंदाची अन्
चल जावू या बाबा भुर गडे ....!

वारा मास्तर शिळ घालती
कवायतींचे अन् देती धडे
वीजबाई शिस्तीच्या भारी
पाहूनी तया हृदय धडधडे...!

निसर्गसरांचा तास मजेचा
रेखाटू चित्रे मिळूनी गडे
वीज घालीते गणिते अवघड
ढगबाळाला मग येइ रडे...!

माय धरित्री वाट पाहतसे
डोळे तियेचे आकाशाकडे
दांडी मारूनी शाळेला मग
ढगबाळ धावती आईकडे...!

माय-पुतांची भेट अनोखी
सुगंध मायेचा जगी दरवळे
पाऊस आला, पाऊस आला
आनंद होई मग चोहीकडे ....!

ऋतुंमध्ये श्रेष्ठ ऋतुराज "पावसाळा", त्याच्या आगमनाप्रित्यर्थ पावसात खेळायला आवडणार्‍या प्रत्येक बाळ-गोपाळास या पावसाळ्याच्या खुप खुप शुभेच्छा !

विशाल कुलकर्णी.

गुलमोहर: 

इजारं काढून नाचावसं वाटतयं...>>> आयला म्हणजे घालतोस तर तू. Wink

(म्हणजे मला वाटत होतं तू अजुनही अर्ध्या चड्डीतच असतोस म्हणुन)

बादवे धन्यवाद मंडळी !
कौतुका, तसं होता आलं तर काय बहार येइल Happy

विशल्या , असा विनयभंग इथे नको ! >>>>

अबे, पावसाळयाचे दिवस आहेत, म्हणुन मला बरमुडा म्हणायचं होतं. याला चोराच्या मनात चांदणं असं म्हणतात. Wink

>>तसं होता आलं तर काय बहार येइल

तसं म्हंजी कसं वो भौ? Wink Proud

मजा आली रे वाचून. कॉपी करून ठेवतो. आमच्या पिल्लूला ऐकवायला छान आहे.

किती छान कविता!!!
वाचतानाच वाटले...
चला लहान होऊन परत पावसात जाऊ....!
लहानपणी पत्र्याचा शाळेत होतो ९ वी पर्यंत...
पावासाळ्यात पत्र्याच्या दरात सनकाड्या टाकायचो आणि सगळ्या फरश्या भिजवायचो मित्रासोबत्...आणि सगळ्याच्यां अगोदर शाळेतून पळायचो.
पुन्हा ते दिवस आठवले तुझ्या कवितेने.
धन्यवाद मित्रा...तुझ्या ह्या कवितेबद्द्ल.

मजा आली रे वाचून. कॉपी करून ठेवतो. आमच्या पिल्लूला ऐकवायला छान आहे.>>>>

मंद्या, धन्स रे. दाद मिळाली Happy
अमितजी, सावली, गणुभाऊ आभार.