आटपाट नगरी

Submitted by कविन on 24 June, 2010 - 07:40

ऐक बाळा! तुझ्या साठी रचली कहाणी
आटपाट नगरा मधे रहात होती राणी

आवडायाचे तिला तिथले खळाळते पाणी
खळाळत्या पाण्यासह म्हणायची गाणी

गोड गोड गाणी गात ती चालायची वाट
आवडत मुळ्ळी नव्हता तिला उगा थाटमाट

राणी सारखाच होता अगदी; आटपाटचा राजा
कामाचा ना केला त्याने कध्धी गाजावाजा

आटपाट नगरामधे सारेच होते गोड
कध्धी नाही काढायाचे कुणाचीही खोड

आवडेल का ग फिरायला आटपाट नगरीत?
पण जायच्या आधी शिकून घ्यावी लागेल तिथली रीत

चालत नाही मारामारी, ना हेवेदावे काही
उगा कुरापत करु पहायाची नाही

फुलपाखराला पकडलं तर शिक्षा होते भारी
शिक्षा म्हणून कट्टी घेतात आटपाटची सारी

हे सारे नियम पाळतात राणी आणि राजा
म्हणून तर नियम पाळते इथली सारी प्रजा

अशी आहे आटपाट नगराची कहाणी
आवडले का आटपाटचे राजा आणि राणी?

गुलमोहर: 

कविता, कविता मस्त आहे Happy
ही कविता 'दमलेल्या बाबाची कहाणी' च्या चालीवर म्हणता येतेय. मी म्हणून पाहिली Happy

Happy

सुकी, तिला काल दाखवली एकदा मी आणि एकदा तिच्या बाबाने. पण माझी चाल म्हणजे काय दिव्य Proud
पण सध्या ती दुसरी कविताच "आईची हाक आली पळा पळा" ही म्हणत असते आवडीने. तिला वास्तववादी वाटत असावी ती Proud

आईची हाक आली पळा पळा<<<<<<<बाबाचं अनुकरण करते सानु >>>>

तोषा, ती बाबासाठी सुचना असते, वैधानिक इशारा म्हण हवं तर Wink

कवे, कव्ता लै आवाडाली, झ्याक येक्दम ! Happy

कविता
मस्त!!!!!!!!!!!! इशिकाला (माझ्या लेकीला) फार आवडली.
आईची हाक आली पळा पळा............ मला ही कविता विपू मध्ये पोस्ट करशील का?
अग लेकीला भयंकर आवड आहे गाणी , गोष्टी ऐकण्याची. रोज नवनवीन गाणी , गोष्टी शोधून मी मात्र दमते.

Pages