रानमेवा ....!

Submitted by अभय आर्वीकर on 16 July, 2010 - 23:43

रानमेवा खाऊ चला....! (बालकविता)

या झरझर या, जरा भरभर या,
चला रानोमाळी भटकू चला
कुणी अंजीर घ्या, कुणी जांभुळ घ्या,
थोडा रानमेवा खाऊ चला ....॥१॥

(लाला, लरला, लरलल्लरलल्लर ला,
लरलल लरलल लरलल लरलल
लरलल्लरलल्लर ला)

ते उंच-उंच दिसते ते, ते फ़ळ ताडाचे आहे
झाडांच्या डोक्यावरूनी, सूर्याचे किरण ते पाहे
कुणी कळवंद खा, कुणी चिक्कु-पेरू खा,
पाणी नारळाचे पिऊया चला ....॥२॥

ते फ़ुगले डोळे दिसते, ते सिताफळाचे आहे
खोप्यांच्या खिंडीमधुनी, ते चोरुनी पाडस पाहे
कुणी अननस खा, कुणी बोरं-लिंबू खा,
पाड आंबे वेचूया चला ....॥३॥

ही झाडे आहे म्हणुनी, सरसर पाऊस येतो
धरणांचे पोट भरुनी, धरणीला न्हाऊन जातो
कुणी टरबूज खा, कुणी खरबूज खा,
झरा झुळझुळ पाहू चला ....॥४॥

ही झुडपे-झाडे-वल्ली, सजीवांना अभय ती देती
ती सोडती ऑक्सिजनला अन कार्बन शोषूनी घेती
कुणी कलमा घ्या, कुणी रोपटी घ्या
झाडे घरोघरी लावुया चला ......॥५॥

(हाहा, हेहेहे, चिंगचिंगंचिंगचिंगंच्या,
टणणण टणणण ढणणण ढणणण
तारारमपमपमपमपा)
.

. गंगाधर मुटे
.........................................................

गुलमोहर: 

मुटेजी ,
भन्नाट आणि गोड कविता !
इतकी नाव ऐकुनच पोट भरलं !
इतकी निरनिराळी,महागडी फळं खायची असतील तर नक्कीच 'रानोमाळी भटकल्याशिवाय' गत्यंतर नाही !

अनिलजी,
रानोमाळी भटकण्याचा दुसरा पण एक फायदा असतो.

भटकल्यामुळे फळं तर फुकट मिळतातच, पण व्यायाम झाल्यामुळे चांगले पचन होऊन खाल्लेल्या फळातील जास्तीत जास्त सत्व आणि कॅलरिज शरीराला उपलब्ध होतात. Happy

नक्कीच ....
त्याबरोबरच हाताला,पायाला टोचलेल्या काट्यामुळे त्यांची किम्मत देखिल कळते ....
Happy

त्याबरोबरच हाताला,पायाला टोचलेल्या काट्यामुळे त्यांची किम्मत देखिल कळते .

आणि त्यालाच उत्पादनखर्च म्हणायचे असते बरं का.