बालकविता

मी परी...

Submitted by सत्यजित on 25 March, 2009 - 09:49

परी गं परी तू आहेस का खरी?
कधी तरी येशील का माझ्या पण घरी?

येशील का सांग तू माझ्या बर्थडेला?
करशील का सांग तू मला सिंड्रेला?

चमचमता ड्रेस अन काचेचे बूट
जादूच्या कांडीने खेळण्यांची लूट

असंच एकदा रात्री, काय गंमत झाली

गुलमोहर: 

अंगाई...

Submitted by गणेश कुलकर्णी on 17 March, 2009 - 10:45

झोप झोप रे बाळा!|| धृ||

वासरे आली गायीच्या पोटाशी...
तशी डोळ्यांच्यां पापण्यांची
मिटण्याची घाई! ||१||

झोपली धरणी माय...
आभाळात चांदोबाचां
दिसतोय गाव ||२||

काजव्यांचा येतोय थवा...
तुला पाहण्यासाठी,
पारिजातकाने केव्हाच टाकलाय

गुलमोहर: 

हनुमॅन माझा मित्र...

Submitted by सत्यजित on 16 February, 2009 - 06:39

Hanuman.jpgसुपरमॅनला स्पाईडरमॅनला नाही अनुमान
सर्वात शक्तीशाली आहे माझा हनुमान

सुपरमॅनला दिली जर त्यानी एक फाईट
चड्डी वरची चड्डी पण होउन जाईल टाईट

गुलमोहर: 

माझं काय चुकलं??.

Submitted by प्राजु on 12 February, 2009 - 23:01

एका छोटीचे मनोगत..

कशाला गं आईनं असं मला माललं..
ललून ललून नाक माझं लाल लाल झालं..
खलं खलं शांग आजी माझं काय चुकलं???

अंगणामध्ये गेले होते बिश्किट खात खात..
टॉमी तिथे बसला होता त्याचा खाऊ खात..

गुलमोहर: 

बाळराजे

Submitted by कौतुक शिरोडकर on 8 February, 2009 - 23:18

बाळराजे रुसले आणि खिडकीत जाऊन बसले
काय झाले, काय घडले, कुण्णा नाही कळले

मोठ्या मोठ्या डोळ्यांमध्ये, राग मोठा मोठा
लाल नाक, गुबरे गाल, शब्द नाही ओठा
सोन्या, राजा, बाळा, सारे समजूत काढून हरले

आई, बाबा, आज्जा, आजी, सारे पडले कोड्यात

गुलमोहर: 

फूगेवाला

Submitted by mitthu on 3 February, 2009 - 00:34

आई बघ गल्लित आपल्या आला आहे फूगेवाला
घेना सुंदर फुगा मला तु पैसे देऊन त्याला

गल्लिमधे फिरतो आहे तो सायकल वरून
समोर आणी मागे लावलेत फुगे हवा भरून

रंग आहेत छान बघण्या सारखे खास
दूरून बघता होई इन्द्रधनुश्याचा भास

गुलमोहर: 

गंमतशीर काय काय घडले!

Submitted by मानुषी on 31 January, 2009 - 03:19

एकदा मला स्वप्न पडले
आणि गंमतशीर काय काय घडले!

चिउताई लागली पोहायला
आणि मासे लागले उडायला
इकडून तिकडे अस्से उडले...
आणि गंमतशीर काय काय घडले!

वेफर्स, चिप्स माडाला
चॉकोलेट गोळ्या झाडाला
खिसे भरभरून भरपूर तोडले....

गुलमोहर: 

अशी असावी माझी शाळा ...

Submitted by सत्यजित on 28 January, 2009 - 01:44

अशी असावी माझी शाळा यावा न मजला कंटाळा
समुद्र तळाशी वर्ग भरावेत मधली-सुट्टी आभाळा

पुस्तक वाचे धडे धडाधड
गोष्टी सांगे छानच छान
प्रष्णच देती उत्तरे भराभर
पेनच काढे अक्षर छान

मिक्की डोनाल्ड शिक्षक अमुचे,

गुलमोहर: 

बोलणार नाही...

Submitted by स्मिता द on 19 January, 2009 - 04:53

बोलणार नाही..

मी किनई बाबांशी
आता बोलणारच नाही
जाउ नको म्हणाले तरी
निघुन गेले लांब
कसलं अस ऑफिस
आणि कसलं अस काम
सारखं सारखं
जायचं लांब
जायच नाही म्हणुन
कडी हळुच मी घातली
मी उठायच्या आत
कोणी गं काढली?

गुलमोहर: 

जशास तसे म्हणजे Tit For Tat

Submitted by सत्यजित on 13 January, 2009 - 02:20

जशास तसे म्हणजे Tit For Tat (टीट फॉर टॅट)
कोल्होबाची करकोचाची सांगतो तुम्हा fact (फॅक्ट)

कोल्होबा करकोचा होते सख्खे मित्र
दोघांनाही दोघांवाचुन नव्हत कुणी तिसरं

करकोचा कोल्होबाला रोज देई मासे
कोल्होबाच्या शिकारीतले खाई तो जरासे

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - बालकविता