हनुमॅन माझा मित्र...

Submitted by सत्यजित on 16 February, 2009 - 06:39

Hanuman.jpgसुपरमॅनला स्पाईडरमॅनला नाही अनुमान
सर्वात शक्तीशाली आहे माझा हनुमान

सुपरमॅनला दिली जर त्यानी एक फाईट
चड्डी वरची चड्डी पण होउन जाईल टाईट

स्पाईडरमॅनच्या छातीतुन निघेल एक कोळी
एकच फाइट देता घेईल जुलाबाची गोळी

एक उडी घेउन जातो साता समुद्राच्या पार
डोंगर उचलू शकतो त्याला शक्ती आहे फार

एकटाच गेला उडून नी लंका आला जाळून
रावण गेला घाबरुन, सगळे राक्षस गेले पळून

भक्ती त्याची शक्ती, नी भक्तीच त्याचं काम
छाती फाडुन दाखवेल तो अंतरातले राम

बोलो सियावर रामचंद्र की जय !!
बोलो हनुमान की जय.. !!

संकट येता कुठलेही तो करतो माझी रक्षा
मी सकाळ संध्याकाळी म्हणतो रोज रामरक्षा

मी दर शनिवारी म्हणतो मारुतीचं स्तोत्र
हनुमान झाला आहे खरंच माझा मित्र...

बोला बंजरंग बली की जय !!!
बोला हमुमान की जय.. !!!

-सत्यजित.

गुलमोहर: 

सहीच. Happy
----------------------
एवढंच ना!

मस्त रे सत्या,

भक्ती त्याची शक्ती, नी भक्तीच त्याचं काम
छाती फाडुन दाखवेल तो अंतरातले राम

हे तर खुप छान !!

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

रातराणीचा सुगंध पलंगावर पडल्या पडल्यादेखील घेता येतो. पण तुळस वृंदावनातच राहते, तिच्यापुढे आपल्याला उभंच राहावं लागतं.

http://maagevalunpahataana.blogspot.com

Happy सही!

सत्यजीत खुप दिवसांनी,कविता वाचायला मिळाली , सही फारच छान. मस्त

छान!

शरद

मस्तच रे मित्रा !
पण न राहवून संदिपच्या 'superman'ची आठवण झाली.

आता परत शोधायला हवं गाणं

--स्वस्ति
!!!*************************!!!
तुहा गूज अंतरीचे हे कथावे व्यथांनी !

बोलो बंजरंग बली की जय !!!

सत्यजित मस्तच आहे कविता!

बालसुलभ....सुबोध .....सुरेल.....गोड Happy

सत्या, नेहमीप्रमाणेच छान
बोलो बंजरंग बली की जय !!!
बोलो हमुमान की जय.. !!!

सत्या मस्तच रे Happy

वैभवची 'हनुमान' आठवली Happy

    -------
    स्तब्ध आहे केवढे पाणी तुझ्या डोहातले
    स्वप्न एखादे जणू आतून आहे गोठले

      मस्तच लिहिलेय! Happy

      मी सकाळ संध्याकाळी म्हणतो रोज रामरक्षा>> ह्म्म्म्म खरय Happy
      Donnn Complain ... Either Do Something About it or Shut-Up !!! Wink

      काय बात है सत्याभाय..
      बोलो हनुमान की जय.> > बोलो हनुमॅन की जय.

      - अनिलभाई
      It's always fun when you connect.

      जय जय बली बजरंगबली !!!

      धन्यवाद मंडळी ... लोभ असावा!

      मस्तच रे!
      ************
      हा देहच जेथे नाही आपुला, एकदा जो साईचरणी वाहिला |
      मग तयाच्या चलनवलनाला, काय अधिकार आपुला ||

      ए आज हनुमान चा बर्थडे आहे.. तुम्ही विश नाही केल?

      हॅप्पी बर्थडे हनुमान !!!! मी केल Happy

      हॅप्पी बर्थडे हनुमान !!!! Proud मी पण केलं
      **********************************************
      /@#%^&*#@#@@!!#?\ - शंभरातील नव्व्याणवांस Proud

      खूप गोड आहे ही कविता. फारच आवडली.
      बाकी कवितांच्या गदारोळात बहुतेक वाचायची राहीली. Happy
      मराठी मंडाळाच्या गुढीपाडव्याच्या किंवा इतरही कार्यक्रमात लहान मुलांचा नाच बसवायला गाणी शोधत असतात लोक. ही कविता (तुमच्या नावासगट) दिली तर चालेल का?

      छान

      Pages